बांगलादेशीकडे आधार कार्ड
-गोवंडीतील छाप्यात मिळाला धोक्याचा इशारा -दिनेश कानजी, मुंबई अनेक सरकारी योजनांचा दुवा ठरणारे आधार कार्डचीही आता बनवाबनवी होऊ लागल्याची घटना गोवंडीत उघडकीस आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्सपासून पासपोर्टपर्यंत सरकारी पातळीवर ओळखपत्रासाठी 'आधार' ठरलेले हे कार्ड चक्क एका बांगलादेशी घुसखोराकडे आढळून आले आहे. या घटनेमुळे मुंबईत बस्तान बसवण्यासाठी आधार कार्डचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गोवंडी शिवाजी नगर येथे ३० नोव्हेंबरला पोलिसांची विशेष शाखा आणि शिवाजी पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध संयुक्त कारवाई केली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हा भाग पिंजून काढत १४ पुरुष, सहा महिला आणि आठ मुलांसह २८ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींच्या नागरिकत्वाचे पुरावे तपासण्यात आले, तेव्हा मुंबईतील सरकारी कारभाराची लक्तरेच टांगली गेली. यातील काही बांगलादेशींकडे रेशनकार्ड तसेच पॅनकार्डही आढळली. पोलिसांसाठी धक्कादायक प्रकार मात्र पुढेच होता. एका बांगलादेशीकडे चक्क अनेक सरकारी योजनांसाठी दुवा ठरणारे आधार कार्डच आढळले. या घुसखोराने ते आपले ओळखपत्र म्हणून सादर केल्याने पोलिसही चक्रावले. अख्तर निजामुद्दिन शेख असे त्याचे नाव असल्याची माहिती आय ब्रँचचे इन्स्पेक्टर वसंत वखारे यांनी दिली.
आधार 'पॅनकार्ड'चा
बांगलादेशी घुसखोर अख्तरने हे आधार कार्ड मिळवण्यासाठीही नामी शक्कल लढवली होती. सुरुवातीस त्याने आपल्या नावावर पॅनकार्ड मिळवले. पॅनकार्ड काढताना त्याने शिवाजीनगर येथील एका शाळेच्या दाखल्याचा वापर केला. मात्र पोलिसांच्या उलटतपासणीत त्याचे बिंग फुटले. भारताचा नागरिक असल्याचा पुरावा म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जन्माचा दाखला मागितला. मात्र तो सादर न करू शकल्याने त्याच्यावर संशय बळावला व बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने आधारकार्ड मिळवल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे आधार कार्डच्या वितरण प्रक्रियेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.cslavekar, vashi
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 04:40 PM आधार कार्ड वाटताना पुरावे योग्य आहेत किवा नाही हे देणारे पहात नसतील असे वाटते
Madhav, Pune
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 02:35 PM त्याने शाळेचा दाखला कसा मिळवला? याची चौकशी झालीका? आधार काऱ्ड पॅन काऱ्ड व SSC सऱ्टिफिकीटच्या आधारेच तर दिल ज़ात. म्हणजे आधारचाच आधार गेल्यासारखे झाले.
Neelam V.Shinde, Andheri (West)
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 02:18 PM Please aata navin konate card kadhu naka,Sarkar la vinanti, ashya nalayak lokanchya mastimule aani fasavnukimule samanya mansana khup trass hoto.
avinash, mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 02:00 PM it is very serius news i hope our goverment take action agaist all froad & cheeters
Sajjay R. Kulkarni, Mumbai (Bhandup)
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 01:42 PM सारकारी योजना सुरू करताना अनेक अडचणी येतात,पण सुजाण नागरिक त्याचा फायदा मिळयातत.
anilsutar, sangli
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 01:10 PM हा देश कधी ही सुधारनार ना ही....
archna , Hyderabad A. P. India
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 12:53 PM भारतात काहीही शक्य आहे , फक्त पैसा पाहिजे
abhijit, kolhapur
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 12:17 PM देशाला लागलेली किड म्हणजे कांग्रेस पक्षाला चे सरकार
नितीन कुंजीर, मुंबई यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 12:13 PM
पासपोर्टसाठी आधार कार्ड स्वीकारले जात नाही.
श्रीधर ग.वष्ट , कोल्हापूर यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 11:55 AM
पैसे खाउन कामे करतात,असेच होणार. कोणी अशी आधार कार्ड दिली याचा शोध घेउन त्याना शिक्षा करा.
c.m.hatode, mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 11:38 AM सरकारच्या तोंडात शेन घाला
aditya , mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 11:19 AM आधार कार्ड ही एक बोगस प्रक्रिया आहे. आज एक बांग्लादेशी माणुस आणि भैया भोगस पॅन कार्ड बनवतो ५०० रुपयात आणि आमदार नवाब मलिक आणि अबू आजमी यांचे लेटर ५०० रुपयात विकले जातात. ह्या मुले आधार कार्ड १००० रुपयात म्हणजे सोप्या प्रमाणे मिळते आणि ह्या मध्ये जे आधार मध्ये ओपरेतोर आहे ते हि कामे करतात. म्हणून मी अशी विनंती करतो कि लवकरात लवकर तुम्ही एक ओपरेतिओं करून ह्याचा निकाल लवकरात लवकर लावला आणि ह्यामध्ये माझी मदत पाहिजे असेल तर मी मदत करायला तयार आहे. ह्या मध्ये मानखुर्द मुन्सिपल शाळा आणि शिवाजी नगर ची शाळा.
sanjay, mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 11:00 AM Our Goverment & police is nice b'cos they are following gandhis rule Dont see anything ,Dont say any thing ,Dont listen any thing, Aisi sarkar kis kaam ki ?
J. Godbole, Mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 10:54 AM In Vasai-Virar Mahanagarpalika area, many Bangaladeshi nationals are working as construction workers. No body bother to check that. In fact in Takipada area of Nallasopara area, many Bangaladeshi are staying and now having all the documents with the help of local politicians. It is know fact to all the concerned, but due to vote politics, no party is ready to open their mouth.
Deepak Shevade, Mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 10:38 AM आता सरकार किती कड़क कारवाई करते ते बघुया कारण आता 2014च्या निवड्नुका आहेत. ह्या सर्व प्रकरणात नक्कीच राजकारणी लोकांचा हात आहे हे नक्की.
ravindra, mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 10:32 AM आम्ही 2 वर्ष झाली तरी आमचे आधार कार्ड आले नाही आणि यांचे कार्ड बनून आले पण... खर्यची दुनिया नाही
Anil, Navi Mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 10:02 AM यात काहीच आश्चर्या वाटॅन्या सार्खे नाही जर पासपोर्ट 4-5 असूशक्तता तरयात काय नवीन...आधार कारडछे पन एलेक्षन कार्ड सारखेच 3-13 होणार आहेत है मात्र नक्की...अनिल नवी मुम्बई
suhas, Mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 09:53 AM जय सोनिया ,जय कॉंग्रेस
ch, mum
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 09:50 AM आमचे आधार कार्ड अजुन आलेले नाहिये. सरकारी नोकर असून देखिल. असो. चालायचेच. मोठ्या मोठ्या देशान्मधे............. !!!!!
mangesh, pune
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 09:18 AM कांग्रेस आज सत्तेत आहे ते बांग्लादेश आणि पाकिस्तानी घूसखोर मतदार लोकन्मुले
Harishchandra S. Ghuge, Nashik
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 09:14 AM अहो साहेब हे तर काहीचनाही आता तर फक्त बांग्लादेशी कड़े "आधारकार्ड" मिलाले भविष्यात एखाद्या पाकिस्तानी कडे सुद्धा "अधारकार्ड" किंवा आणि कही तत्सम सरकारी पुरावे मिलण्याची शक्यता नकारता एनर नाही कारण आपले सरकार तेवढ़े निर्धवलेले आहे, तुम्ही जर मतदान नॉंदनीचा फार्म जर पहिला तर त्यात स्पष्ट लिहिले आहे कुठलाही एक (घरभाड़े पावती सुद्धा चालेल) पुरावा आणा व अखंड हिंदुस्तान चे टुकड़े करण्यासाठी मतदार व्हा हॅव असल्यास त्या कामी कॉंग्रेस सरकार तुम्हाला पाहिजे टी मदत केरल. अन्याय फक्त हिन्दुवरचत्यातल्या त्यात मराठी बाना पहिला की सरकारी सर्वच अधिकार्यंना माज येतो, मराठी माणसाने कितिहि पुरावे नेले तारी अमुक कागद आणा अन्यथा मिळणार नाही असे उत्तर ऐक्न्यास मिलते, आता बोला!
sandipkumar gunjal, mumbai
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 09:12 AM वाहरे सरकार!!!!
dilip kulkarni , indore
यांचे म्हणणे आहे :
13 Dec, 2012 08:17 AM सारे जहासे .... हिंदुस्तान हमारा अर्थात कोणीः यावे टिकली मारूँ जावे
No comments:
Post a Comment