तरुणींनो, ड्रिंक
घेताना जरा जपून.. |
पब, डिस्को थेक, हॉटेल अथवा मित्रांबरोबर प्रायव्हेट पाटर्य़ा करणार्या तरुणींनी ड्रिंक घेताना खबरदारी घ्यायला हवी. मित्र म्हणणारेच तरुणींच्या ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार करतात. त्यामुळे तरुणींनी मित्रांसह थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशन टाळावे, असे आवाहन पोलीस आणि सामाजिक संस्थांनी केले आहे.?मुंबई : शहरात मोठय़ा प्रमाणात थर्टी फर्स्टचा जल्लोष दरवर्षी केला जातो, मात्र यंदा या जल्लोषावर दिल्लीतील सामूहिक बलात्काराचा, मुंबई आणि राज्यात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा परिणाम होण्याचे चित्र दिसत आहे. थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग घराबाहेर पडतो. अशावेळी महिला-तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला रात्री दीड वाजेपर्यंतच सेलिब्रेशन करण्याची परवानगी दिली होती, मात्र राज्याच्या गृह मंत्रालयाने ती पहाटे 5 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना शहरातील रस्त्या-रस्त्यांवर, सार्वजनिक स्थळी डोळय़ात तेल घालून तैनात राहावे लागणार आहे. दिल्लीतील सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या तरुणीचा शनिवारी मृत्यू झाल्याने देशभरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून नववर्षाचे सेलिब्रेशन न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन काहीसे फिके पडणार आहे, मात्र मुंबई पोलिसांनी अशाही परिस्थितीत सकाळी 5 वाजेपर्यंत थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी परवानगी दिल्याने हॉटेल, पब, बीयर बार, रिसॉर्ट मालक खूश झाले आहेत. या निर्णयामुळे पोलिसांची दमछाक होणार असून महिलांची छेडखानी, विनयभंग असे प्रकार रोखण्यावर पोलिसांची मदार असणार आहे. रोडरोमियोंना घटनास्थळीच जायबंदी करून त्यांना प्रसाद देण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिला पोलिसांची विशेष पथके तयार केली आहेत. साध्या कपडय़ातील पोलीस हॉटेल, पब, डिस्को थेक, रिसॉर्ट आदी ठिकाणी होणार्या पार्टय़ावर नजर ठेवून असणार आहेत. त्याचबरोबरच गेटवे, कुलाबा अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार असल्याने येथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीचा फायदा घेत रोडरोमियो तरुणींशी छेडखानी, विनयभंग करतात. अशा घटना या ठिकाणी घडल्या असल्याने गेटवे ऑफ इंडियासारख्या गर्दीच्या ठिकाणी जमावावर सीसीटीव्ही कॅमेर्यांतून लक्ष ठेवले जाणार आहे. या दिवशी मद्य प्राशन करून वाहन चालविणार्यांची संख्या बरीच असते. त्यामुळे अपघातांतही वाढ होऊन काही घटनांत प्राणांवर बेतले जाते. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाच्या तीन हजार पोलिसांची फौज रस्त्यावर उतरणार आहे. त्यांच्याकडे हॅण्डीकैम दिले जाणार आहेत, जेणेकरून वाहनांसह पळून जाणार्या वाहनांचे चित्रीकरण करून वाहनांच्या नंबरप्लेटवरून त्यांना पकडता येईल. थर्टी फर्स्टच्या रात्री अनेक लोक रस्त्यावर गाडय़ा लावून मद्यपान करतात. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार AAHE. |
SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 29 December 2012
31 DCEMBER BE CAREFUL
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment