खेळाऐवजी पैसा हेच हिंदुस्थानी क्रिकेटचे मर्म आणि धर्म बनला आहे. राहुल द्रविडसारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूने एका तळमळीने याच मर्मावर बोट ठेवले आहे.
‘द्रविडी’ मात्राहिंदुस्थानी क्रिकेटचा ‘भस्म्यारोग’!कुणी निंदा कुणी वंदा, खराब खेळणे हाच आमचा धंदा अशीच सध्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाची अवस्था झाली आहे. ‘टीम इंडिया’ असे बिरुद मोठ्या अभिमानाने आपला संघ मिरवतो, मात्र गेल्या काही महिन्यांतील या संघाची कामगिरी या बिरुदाच्या आसपासही जाणारी नाही. हिंदुस्थानी क्रिकेट संघात सध्या ‘टीम’ही दिसत नाही आणि ‘इंडिया’देखील. दिसतो तो फक्त पैसा आणि पैसा. हिंदुस्थानचा माजी कर्णधार राहुल द्रविड यानेही नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवले आहे. द्रविड हा हिंदुस्थानीच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट जगतात अत्यंत संयमी, सौम्य स्वभावाचा आणि सुसंस्कृत क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. हिंदुस्थानी क्रिकेटची ‘वॉल’ असाच त्याचा लौकिक होता. मात्र त्याचाही संयम सुटतो आणि अत्यंत परखडपणे तो टीम इंडियाचे पोस्टमार्टेम करतो यातच धोनी ब्रिगेडच्या लायकीची लक्तरे दिसतात. पैशाने आपल्या क्रिकेटची आणि क्रिकेटपटूंची वाट लावली आहे हे ‘नागडे सत्य’ आहे. ते द्रविडसारख्या संयमी खेळाडूसही स्पष्टपणे बोलावे लागले याचाच अर्थ पैसा आणि प्रसिद्धीचे पाणी आता टीम इंडियाच्या डोक्यावरून गेले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन यानेही हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या बांधिलकीवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. म्हणजे द्रविडने जे सांगितले तेच नासीर हुसेन यानेही सांगितले. आपल्या देशातील अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूही संघाच्या कामगिरीवर परखड टीका करीत आहेत. तरीही टीम इंडिया, क्रिकेटपटू, निवड समिती आणि बीसीसीआय ढिम्म आहेत. खेळात जय-पराजय होतच असतात; मात्र मुंबई आणि पाठोपाठ कोलकाता येथील सामन्यात इंग्लंडच्या संघाने
धोनी ब्रिगेडची जी वाताहत केली ती फक्त लाजिरवाणीच नाही, तर कठोर परीक्षण करायला लावणारी आहे. अर्थात त्यासाठी ना व्यक्तिगत पातळीवर सातत्याने अपयशी ठरणारे ज्येष्ठ ‘विक्रमवीर’ तयार आहेत ना अपयशी ठरत असलेला कप्तान. तुमचे ते हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ किंवा बीसीसीआय याबद्दल काय बोलावे? बीसीसीआय तर धंदेवाईक संस्थाच बनली आहे. त्यांना फक्त पैशाचीच भाषा कळते. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटमध्येही आता फक्त पैशाचाच बोलबाला आहे. ‘आयपीएल’सारख्या स्पर्धांत खेळाडूंचे जाहीर लिलाव होतात, त्यांच्यावर ‘बोली’ लावल्या जातात, कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगपती, सिने कलाकार शेकडो कोटींना ते संघ विकत घेतात. या धनवर्षावात संपूर्ण हिंदुस्थानी क्रिकेटच मनसोक्त न्हाऊन निघत आहे आणि या पैशाच्या महापुरात ‘क्रिकेटची भाषा’ वाहून गेली आहे. खर्या क्रिकेटची भाषा आज ना कुणाला माहीत आहे ना कुणाला शिकण्याची वा शिकविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच मागील १३ कसोटी सामन्यांत दहा पराभव पत्करूनही टीम इंडिया काय किंवा बीसीसीआय काय, दोघांचीही कातडी लागोपाठ दोन लाजिरवाण्या पराभवांनीही थरथरली नाही. क्रिकेट हा पूर्वी सभ्य गृहस्थांचा खेळ होता. नंतर तो बदमाशांचा खेळ झाला. आता तर तो फक्त पैशाचाच खेळ झाला आहे. त्यामुळेच द्रविडला हवी असलेली गुणवत्ता, योग्यता, कौशल्य किंवा शारीरिक तंदुरुस्ती आणि नासीर हुसेन म्हणतो ती बांधिलकी टीम इंडियात अभावानेच दिसत आहे. हिंदुस्थानी राजकारणाचे जसे गजकर्ण झाले आहे तसे
हिंदुस्थानी क्रिकेटचेही अजीर्ण झाले आहे. आपल्या देशात राजकारणासाठी पैसा आणि त्या पैशातून पुन्हा राजकारण याचीच सध्या चलती आहे. हिंदुस्थानी क्रिकेटचीही अवस्था तशीच आहे. क्रिकेटमधील ‘क्रिकेट’ आणि खेळाडूंमधील ‘क्रिकेटपटू’ कधीच इतिहासजमा झाले आहेत. अनेक अनुभवी, गुणवान खेळाडू निवृत्त झाले आहेत. काही जसे मैदानावर चाचपडत आहेत तसेच निवृत्तीच्या वाटेवरही अडखळत आहेत. कॅप्टन ‘कूल’बद्दल काय बोलावे! इंग्लंडच्या ‘कॅप्टन कूक’कडून तो सांघिक विजयाची ‘रेसिपी’ निदान उर्वरित एकमेव कसोटी सामन्यासाठी शिकला तरी खूप आहे. आपल्याकडे होतकरू, गुणवान खेळाडू नाहीत असे नाही, मात्र क्रिकेटचा बाजार मांडलेल्या बीसीसीआयला पैशापुढे गुणवत्ता दिसायला तर हवी! आयपीएल, चॅम्पियन्स लीग, ट्वेण्टी-२०, वनडे या भाऊगर्दीत हिंदुस्थानचे क्रिकेट दिसेनासे झाले आहे. ते शोधावे, जोपासावे असे कुणालाच वाटत नाही. क्रिकेटपटूंनी पैसा कमवू नये असे कुणी म्हणणार नाही. मात्र त्या नादात क्रिकेट, संघ आणि देशाशी असणारी बांधिलकी विसरून कसे चालेल? ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ असे वागणार्यांचा सध्याचा जमाना नाही. मात्र देशाशी सोडा, निदान ज्या खेळाच्या जोरावर तुम्ही गब्बर होतात त्या क्रिकेटशी तरी इमान राखा! खेळाऐवजी पैसा हेच हिंदुस्थानी क्रिकेटचे मर्म आणि धर्म बनला आहे. राहुल द्रविडसारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूने एका तळमळीने याच मर्मावर बोट ठेवले आहे. अर्थात, हिंदुस्थानी क्रिकेटला जडलेला पैशाचा ‘भस्म्यारोग’ या ‘द्रविडी’ मात्रेने तरी बरा होतो का, हे येणारा काळच सांगेल

No comments:
Post a Comment