आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान
खान यांनी सरकारी तिजोरी भक्कम करण्यासाठी नागरिकांपुढे हात जोडले आहेत. त्यांनी
सोमवारी संपत्ती घोषणा योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत सर्व नागरिकांनी 30 जूनपर्यंत आपल्या अघोषित संपत्तीची माहिती द्यावी आणि
कर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
सद्यस्थितीत पाकिस्तानची आर्थिक घडी मोठय़ा प्रमाणावर
कोलमडून गेली आहे. देशाच्या डोक्यावरील कर्ज गेल्या दहा वर्षांत 6 हजार कोटींवरून 30 हजार कोटींवर गेले आहे. यातून सावरण्याची कसरत इम्रान
खान सरकार करीत असून मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. एका अहवालानुसार
पाकिस्तानमध्ये 20 कोटी नागरिकांपैकी केवळ 14 लाख लोक आपल्या उत्पन्नाची माहिती देतात. याच
पार्श्वभूमीवर इम्रान यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर आपण कर भरला नाही तर आम्ही देशाला पुढे घेऊन जाऊ
शकणार नाही. सर्वांनी संपत्ती घोषणा योजनेत सहभागी व्हावे. 30 जूननंतर आपणाला ही संधी मिळणार नाही. कर भरून आपल्या
मुलांचे भविष्य सुरक्षित करा, देशाला आपल्या
पायावर उभे करण्यासाठी मदत करा, देशातील गरिबी
हटवण्यासाठी मदत करा, अशी कळकळीची विनंती इम्रान खान
यांनी केली आहे.
पाकिस्तानच्या
डोक्यावर 30 हजार कोटींच्या कर्जाचे ओझे आहे.n
केवळ 14 लाख लोक उत्पन्नाची माहिती देतात.n
नागरिकांना संपत्ती जाहीर करण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदत 30 जूनला संपणार आहे.n
केवळ 14 लाख लोक उत्पन्नाची माहिती देतात.n
नागरिकांना संपत्ती जाहीर करण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदत 30 जूनला संपणार आहे.n
आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला
पुन्हा मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'मालमत्ता घोषणा योजना' लागू केली असून, बेनामी मालमत्ता येत्या ३० जूनपर्यंत
जाहीर करण्याचे आणि वेळेत कर भरण्याचे आवाहन पाकिस्तानी नागरिकांना केले आहे. ३०
जूनपर्यंत मालमत्ता घोषित न केल्या कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेशवजा इशाराही खान यांनी सोमवारी
दिला आहे.
आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला
पुन्हा मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'मालमत्ता घोषणा योजना' लागू केली असून, बेनामी मालमत्ता येत्या ३० जूनपर्यंत
जाहीर करण्याचे आणि वेळेत कर भरण्याचे आवाहन पाकिस्तानी नागरिकांना केले आहे. ३० जूनपर्यंत
मालमत्ता घोषित न केल्या कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेशवजा इशाराही खान यांनी सोमवारी दिला आहे.
पाकिस्तानचे २०१९-२०चे वार्षिक बजेट आज, मंगळवारी सादर होणार असून, देशाला संबोधताना इम्रान खान यांनी ही
घोषणा केली.
खान या वेळी बोलताना म्हणाले, 'पाकिस्तानला सामर्थ्यवान देश बनवायचे
असेल तर आपल्याला स्वत:मध्ये बदल करायला हवेत. त्यामुळे मी सर्व देशाला आवाहन करतो, की देशासाठी लागू करण्यात आलेल्या 'मालमत्ता घोषणापत्र योजने'मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. जर आपण
नियमितपणे कर भरला नाही, तर आपल्या देशाची आर्थिकदृष्ट्या
प्रगती होऊ शकणार नाही. त्यासाठी ३० जूनपर्यंत प्रत्येकाने आपली बेनामी मालमत्ता, बेनामी बँक खाते आणि जो पैसा परदेशातील
बँकेत ठेवला आहे तो जाहीर करावा,' अशी
विनंती त्यांनी केली.
'३० जूननंतर मालमत्ता जाहीर करण्याची
संधी मिळणार नाही. आपल्या एजन्सीजना कोणाची कोणती बेनामी मालमत्ता आहे, किती आहे, याची माहिती आहे,' असेही त्यांनी सांगितले.
'पाकिस्तानवर तीस हजार अब्जाचे कर्ज'
'आपल्या देशावरील कर्ज गेल्या दहा
वर्षांत सहा हजार अब्जावरून तीस अब्जावर गेला आहे. त्या तुलनेत केवळ चार हजार अब्ज
वार्षिक कर गोळा होतो. त्यामुळे देशातील अर्धा पैसा कर्ज फेडण्यावर खर्च झाला,' असेही इम्रान खान त्यांनी सांगितले. 'पाकिस्तान जगातील असा देश आहे, की जिथे सर्वांत कमी कर गोळा होतो.
प्रत्येकाने जर कर भरण्याचे ठरवले तर आपल्या देशाकडे दर वर्षी १० हजार अब्ज
वार्षिक कर गोळा होऊ शकतो,'
अशीही इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या
आर्थिक व्यवस्थेची माहिती दिली.
मालमत्ता घोषणा जाहीर
इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ
यांच्या सरकारने देशातील काळा पैसा पांढरा करण्याच्या हेतूने तसेच बेनामी मालमत्ता
उघड करण्यासाठी मे महिन्यातच 'मालमत्ता
घोषणा योजना' जाहीर केली होती. त्यासाठी ४५ दिवसांची
मुदत देण्यात आली होती. या योजनेसाठी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंजुरी
दिल्यानंतर ती जाहीर करण्यात आली. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी
यांना बनावट बँक खात्याप्रकरणी अटक करण्यात आली. इस्लामाबाद हायकोर्टाने सोमवारी
जरदारी यांची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळून लावली.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली
जरदारी यांना बनावट बँक खात्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
इस्लामाबाद हायकोर्टाने सोमवारी जरदारी
यांची अंतरिम जामिनाची याचिका फेटाळून लावली. कोर्टाच्या निर्णयानंतर काही तासांनी
पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोच्या (नॅब) १५ सदस्यीय टीमने जरदारी
यांना बेड्या ठोकल्या. जरदारी यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे(पीपीपी)
अध्यक्ष आणि जरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांनी समर्थकांना शांततेचं आवाहन
केलं आहे.
बनावट बँक खात्यातून तब्बल ४.४ अब्ज
रुपयांचा व्यवहार केल्याच्या आरोपात जरदारी यांचं नाव पुढे आलं आहे. 'मेसर्स ए वन इंटरनॅशन'ल नावाच्या बनावट बँक खात्यात ४.४ अब्ज
रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील ३ कोटी रुपये आसिफ जरदारी यांच्या मालकीच्या 'जरदारी ग्रुप'ला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला
आहे.
No comments:
Post a Comment