झारखंडमधील भारताच्या एका खेळाडू महिलेने तिच्या आयुष्यात आलेल्या एका दाहक अनुभवाला जाहीरपणे वाचा फोडल्याने देशातील तमाम मल्टिकम्युनल मंडळीची चांगलीच गाळण उडाली आहे. मात्र, सोयीस्कररीत्या तथ्य मान्य न करता उलटा चोर कोतवाल को डॉंटे अशा आविर्भावात ही सगळी मंडळी बुद्धिभेद करण्याची आपली सगळी क्षमता पणाला लावून हिंदुत्ववादी संघटनांवर तुटून पडू लागली आहेत. वास्तविक, या प्रकरणात ज्या राष्ट्रीय खेळाडूने आपला दाहक अनुभव जगजाहीर केला, ती काही कोणत्या हिंदुत्ववादी संघटनेची कार्यकर्ता नाही की भारतीय जनता पक्षासारख्या राजकीय पक्षाची सदस्य नाही. तारा शाहदेव या राष्ट्रीय पातळीवर खेळणार्या महिला खेळाडूचा एका युवकाशी परिचय झाला. त्याने हिंदू पद्धतीचे नाव सांगून या महिला खेळाडूशी जाणीवपूर्वक मैत्री वाढविली. दोघांमध्ये प्रेम जमल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न होताच या तरुणाने या महिलेला आपण मुस्लिम असल्याचे सांगितले. तेवढ्यावर प्रकरण थांबले नाही, तर तिला मुस्लिम पद्धतीने निकाह करण्यासाठी आग्रह धरला. या प्रसिद्ध खेळाडू महिलेला मारहाण करणे, छळ करणे सुरू झाले. अखेर या तारा शाहदेव यांनी आपल्यावर आलेले हे संकट जगजाहीर करून टाकले. हे धक्कादायक प्रकरण बाहेर आल्यानंतर महिलांचा सन्मान, महिलांवरचे अत्याचार या बाबतीत एरवी किंचाळणारे, पोटतिडिकीने या प्रश्नासाठी आपले जीवन समर्पित करण्याची तयारी असल्याचे दर्शविणारे तथाकथित समाजवादी विचारवंत, कार्यकर्ते, स्त्रीवादी, सेक्युलॅरिस्ट हे सगळे आधी मूग गिळून गप्प बसले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात प्रावीण्य मिळविलेल्या एका खेळाडूच्या जीवनात केवळ धर्मवेडेपणामुळे कसे संकट आले, त्यावर आता या सर्व लोकांची बोलती बंद आहे. विश्व हिंदू परिषदेने व काही संघटनांनी या महिलेला न्याय मिळावा आणि झारखंड सरकारने या महिलेची फसवणूक करणार्या, तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपीला अटक करून शासन करावे, या मागणीसाठी रांची बंदचे आवाहन केले. रांची बंदचे आवाहन करणार्या कार्यकर्त्यांवर तेथील राज्य सरकारच्या पोलिसांनी कठोरपणे लाठीमार करत बेदम झोडपले. त्याचे चित्रण बातम्यांमध्ये वाहिन्यांनी दाखविले. लगेच या देशातील कथित डाव्या, पुरोगामी विचारवंतांना आणि मल्टिकम्युनलांना कंठ फुटला. या लोकांनी टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत लव्ह जिहादवर चर्चा करत लव्ह जिहादची शिकार झालेल्या त्या महिला खेळाडूच्या बाजूने नव्हे, तर लव्ह जिहाद या नावापासून ते हिंदुत्ववादी संघटना या विषयाला कसे चुकीचे वळण देत आहेत, यावर टीका करण्यासाठी हिरिरीने आपली बुद्धी पाजळली.
कोणत्याही प्रकारे दार ऊल हरब चे दार ऊल इस्लाममध्ये रूपांतर करणे यातच सगळे शौर्य आणि मोक्ष आहे, अशा कल्पनेने अन्य मार्गाने प्रार्थना करणार्यांना मारूनमुटकून मुसलमान करणे किंवा न झाल्यास त्यांना मारून टाकणे, अशा प्रकारची शिकवण, इच्छा, कृती करण्यालाच जिहाद हे नाव देण्यात आलेलेे आहे. मध्ययुगीन काळापासून तलवारीच्या टोकावर आपला धर्म इतरांवर लादण्याचे प्रकार ही मंडळी करत आली आहेत. आता भारतात या प्रकारची कारस्थाने करणार्या लोकांनी आपला धर्म, आपली प्रार्थनापद्धती इतरांवर लादण्यासाठी लव्ह जिहाद नावाचा एक प्रकार सुरू केला आहे. नाना लटपटी, खटपटी करून अन्य धर्माच्या, विशेषत: हिंदूंच्या मुलींना फूस लावायची. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून न्यायचे. बर्या बोलाने त्यांनी इस्लाम पंथ स्वीकारला तर चांगलेच, नाही तर त्यांच्यावर जबरदस्ती करायची. त्यांना धर्म बदलण्यासाठी दबाव टाकायचा. छळ करायचा. या मुलींनी धर्म बदलला तरी त्यांचे दुर्दैवाचे फेरे संपत नाहीत. त्यांची सुटका नाही. धर्म बदलल्यानंतरही काहींना मोलकरणीसारखी कामे करावी लागली, असा अनुभव आहे. चित्रपटातून, प्रेमकथांमधून स्वप्नाळू प्रेमाच्या गोड गुलाबी कल्पनेत या मुली या लोकांनी लावलेल्या जाळ्यात फसतात. या मुलींनी घर सोडून बाहेर पडेपर्यंत या मुलींच्या भोवती सर्व प्रकारचे जाळे विणले जाते. कथित प्रेमाच्या आणाभाका, मुलींना आवडणारे सर्वकाही, चित्रपट पाहणे, बाईकवरून हिंडवणे, त्यांना मोहात पाडणे असे केले जाते. या कामासाठी या तरुणांना हवे ते साहाय्य पुरविले जाते. पैसे, बाईक, पाठिंबा, यंत्रणा सर्व काही पुरविले जाते. भारतात गावोगावी अशी प्रकरणे घडू लागली आणि केवळ इस्लामीकरणाचा एक मार्ग म्हणून ही प्रेम प्रकरणे ठरवून केली जात आहेत, असे लक्षात आले तेव्हा त्याला लव्ह जिहाद असे नाव देऊन त्या विरोधात जनजागरण, मुलींमध्ये जागृती असे प्रयत्न सुरू झाले. अशा प्रयत्नात जर प्रेम नसताना फसवणूक असेल, तर इस्लाम त्याला मान्यता देत नाही, असे एका मौलवीनी टीव्हीवरच्या चर्चेत सांगितले. मात्र, या चर्चेत भाग घेणारे तथाकथित बुद्धिवंत, मल्टिकम्युनल कार्यकर्ते यांनी लव्ह जिहाद हा शब्द चुकीचा आहे इथपासून ते सगळ्याच जातीत, पंथात प्रेम केले जाते, मग विशिष्ट पंथातल्या मुलांशी केले म्हणून हा विरोध कशाकरता, असे प्रश्न विचारत वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार अगदी संभावितपणे केला. एका महाभागाने तर लव्ह आणि जिहाद हे एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, असे तारे तोडले. हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत आणि ही विसंगती एकत्र करून या देशात फूस लावून मुलींचे आयुष्य बरबाद करण्याचे कारस्थान चालले आहे, हाच तर प्रश्न आहे. या विषयात आधी प्रेमाचे जाळे फेकून, तसे न जमल्यास धमक्या देऊन, मुलींना जबरदस्तीने अपहरण करून त्यांच्यासोबत निकाह लावण्याचेही प्रकार घडलेले आहेत. नावानिशी तसे तपशील उपलब्ध आहेत.
तारा यांच्या या प्रकरणात हे कारस्थान उघड झाले आहे. अगदी नियोजित पद्धतीने नाव बदलून या खेळाडूला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यात आले आणि एकदा फसल्यानंतर त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी आग्रह, छळ सुरू झाला. या खेळाडूने हे जगजाहीर केले, तरी मानवता, मानवी हक्क याबाबत एरवी किंचाळणारे आता सोयीस्कर मौन पाळून आहेत. नव्हे, लव्ह जिहाद हा शब्द निघताच जणू हे सर्व जिहादचे संरक्षक असल्यासारखे आपली बुद्धिमत्ता पाजळत किंचाळू लागले आहेत.
प्रत्येक घरात आपापल्या मुलींवर चांगले संस्कार करणे, समाजातील गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि इतरांवर येनकेनप्रकारे आपली प्रार्थनापद्धती लादण्याची राक्षसी आकांक्षा ठेवणारे यांची जाणीव करून देणे, हा सर्वात चांगला आणि मूलभूत उपाय आहे. मात्र, अशा प्रकारे नियोजित कारस्थान केले जात असेल आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये अशा समस्या उभ्या राहात असतील, तर सरकार आणि प्रशासन यावर काही कारवाई करणार की नाही? एरवी समाजाचे भले करण्याचा आव आणत आपली बुद्धिमत्ता पाजळणारे कथित विचारवंत या अविचाराला विरोध करणार की नाही? की ते दुतोंडीपणा करत सोयीने बोटचेपी भूमिका घेत शब्दच्छल करत राहणार? शहाबानो प्रकरणासारख्या प्रकरणात अशा प्रकारच्या विषयात सरकार, बुद्धिवादी यांनी चुकीची भूमिका घेतल्याने या देशातील जनतेमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली त्याचे परिणाम अजून जाणवतात. तारा शाहदेव यांच्या प्रकरणात उघड उघड धर्मवेड्या उद्देशाने फसवणूक, छळवणूक झाली आहे. स्वत: सामाजिक अस्तित्व असलेल्या पीडित महिलेने स्पष्टपणे आपल्यावरचे संकट जगजाहीर केले आहे. इतके होऊनही जर या देशातील विचारवंत, राजकारणी, सेक्युलॅरिझम... सेक्युलॅरिझम असे वारंवार किंचाळणारे मल्टिकम्युनल लोक हे जर बोटचेपी भूमिका घेऊन दुतोंडी मते व्यक्त करणार असतील, तर आता यातील बदमाशी, कारस्थान आणि दुटप्पीपणा न कळण्याइतका समाज दूधखुळा राहिलेला नाही, याचे या लोकांनी जरा भान ठेवावे़! जागरूकपणे समाजाने लव्ह जिहादचे संघटित कारस्थान मोडून काढलेच पाहिजे़!
No comments:
Post a Comment