Total Pageviews

Friday, 1 August 2014

GAZA VS AMARNATH YATRA VIOLENCE

गाझा’बाबत संसदेचे कामकाज बंद अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्यांवर मात्र मौन सध्या सुरू असलेल्या अमरनाथच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची अडवणूक करून दादागिरी करणाऱ्या काश्मीरमधल्या घोडेवाले आणि तंबूंच्या मालकांनी केलेल्या गुंडगिरीमुळे बालताल मधल्या तळावर जाळपोळ आणि हिंसाचाराची घटना गेल्या आठवड्यात घडली. बालताल येथून शेकडो भाविक घोड्यांवरून अमरनाथच्या यात्रेला जातात. याच तळावर पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशातल्या धार्मिक संघटनांनी यात्रेकरूंसाठी तात्पुरते "लंगर' /मोफत प्रसादगृह सुरू केले आहेत. याच तळावर घोडेवाल्यांचे यात्रेकरूंना थांबायसाठी तंबूही ठोकलेले आहेत. गेल्या शुक्रवारी एका लंगरमध्ये भोजन करणाऱ्या यात्रेकडूकडे तंबूवाल्याने अधिक भाडे मागून भांडण काढले. तेथूनच त्याने दुसऱ्या तंबूवाल्याशी संपर्क साधला. अन्य घोडेवाले आणि तंबूवाल्यांनी त्या भाविकाला मारहाण केल्यामुळे दंगलीची ठिणगी पडली. लंगरवाले आणि घोडेवाले-तंबूवाले यांच्या गटात जोरदार मारहाण झाली. घोडेवाल्यांनी या परिसरातले सारे लंगर आणि लंगरमधले अन्न उध्वस्त करून टाकले. भाविकांनाही बेदम मारहाण केली. जाळपोळ सरकारच्या डोळ्यादेखत यात्रा रोखून धरणे, यात्रेकरूंमध्ये दहशतीचे वातावरण पसरविणे, कुठल्याही प्रकारे यात्रेकरूंची संख्या कमी करणे आणि यात्रेच्या मार्गात जे देशभरातून हजारो नागरिक, यात्रेकरूंची सेवा तथा भंडारासाठी (लंगर) येतात त्यांना धाकदपट करून, धमकावणी देऊन पळवून लावण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय जम्मू-काश्मीर सरकारच्या, डोळ्यादेखत करण्यात येतात. यावर्षी अमरनाथ यात्रेकरूंची संख्या कमी झाली आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पाच-सहा इस्पितळे निर्धारित केली आहेत, जेथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. अमरनाथ यात्रेला जाणार्याइ यात्रेकरूना इ्तर राज्याच्या डॉक्टरने वैद्यकीय तपासणी (फिटनेस) प्रमाणपत्र दिले, त्तर त्याला मान्यता नाही. यात्रेसाठी नोंदणी आणि यात्रामार्गात घोडे-खेचर भाड्याने घेणे म्हणजे मोठीच डोकेदुखी आहे. देशभरातून येणारा जो यात्रेकरू, यात्रेविषयी स्वप्न उराशी बाळगून, पैशाची जुळवाजुळव करून, अनेक अडचणींचा सामना करून रेल्वे आणि बसने प्रवास करून येथे पोहोचतो, तो जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था बळकट करूनच परततो. प्रत्येक अमरनाथ यात्रेकरू जम्मू-काश्मीरच्या, विशेषकरून मुस्लिम व्यवस्थापक, कामगार, दुकानदार, विविध प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या हजारो काश्मिरी मुसलमानांची मिळकत कित्येक पटींनी वाढवून जातो. या बदल्यात त्याला काय मिळते? जाळपोळ, लूट, मनमानी-दादागिरी करून आकारण्यात येणारे भाडे आणि कान व डोळे बंद केलेले प्रशासन!. २००८ मध्ये संपूर्ण भारतात अतिशय प्रखर असे अमरनाथ आंदोलन झाले होते. लक्षावधी लोक यात सहभागी झाले होते. यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने लिखित स्वरूपात आश्वा.सन दिले होते की, अमरनाथ यात्रेकरूंसाठी मार्गात धर्मशाळा उभारण्यात येतील आणि ज्या तरुणांवर आंदोलनादरम्यान खटले भरण्यात आले होते ते परत घेण्यात येतील. मात्र, सहा वर्षांनंतरही या दोन मुद्यांवर काहीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, याच दरम्यान भारतीय लष्करावर दगडांचा वर्षाव करणार्यां काश्मिरी तरुणांवरील खटले मागे घेण्यात आले. घटनेवर सर्वांचेच मौन लंगरवाले आणि घोडेवाले यांच्यात झालेल्या तथाकथित संघर्षात ६० हून अधिक तंबूंना आगी लावण्यात आल्या, सामानाची लुटालूट करण्यात आली आणि यात्रेकरूंना अपमानित करून त्यांना मारहाण करण्यात आली. डझनावारी लोक जखमी झाले, ज्यात अनेक सुरक्षा सैनिकांचाही समावेश आहे. घोडेवाल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणार्याय असामाजिक टोळक्याने तंबूत झोपलेल्या लोकांना उठवून त्यांना मारहाण केली. अनेक यात्रेकरूंनी लष्कराच्या मदतीने आपल्या प्राणाचे व सामानाचे रक्षण केले आणि ज्यांच्यापर्यंत लष्करी जवान पोहोचू शकले नाहीत, ते धार्मिक उन्मादाचे बळी ठरले. लंगरच्या स्वयंपाकगृहांना दंगलखोरांनी आगी लावल्यामुळे, 25 च्या वर गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग अधिकच भडकली. घोडेवाल्यांनी लंगरची पेटवापेटवी केला. दंगलखोरांनी भाविकांच्या चीजवस्तूंचीही लुटालूट केली. भाविकांना मारहाणही केली. पण पोलिसांनी भाविकांना संरक्षण दिले नाही.कडाक्याच्या थंडीत हजारो यात्रेकरूंना अन्न आणि पाण्याशिवाय ती रात्र बसून काढावी लागली. बायका-मुलांचे प्रचंड हाल झाले. दंगलखोरांनी सुरक्षा दल आणि पोलिसांवरही केलेल्या तुफानी दगडफेकीत वीस जवान जखमी झाले, तर चाळीस लोक जखमी झाले. या भागातले घोडेवाले आणि तंबूवाले अमरनाथच्या यात्रेकरूंची कोंडी करून, दमदाटी करून छळ करतात, त्यांच्याकडून अधिक पैसे उकळतात आणि त्यांना सरकारचेही संरक्षण आहे. अमरनाथ यात्रेवर दरवर्षी दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार असते. सरकार यात्रेकरूंच्या संरक्षणाची कडेकोट व्यवस्था केल्याचा दावाही करते. अशा परिस्थितीत पोलिसांनी दंगल करणार्यांीच्या जमावाला खालीच अडविण्याचा प्रयत्न का केला नाही? अमरनाथ यात्रेचे आध्यात्मिक ,सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वही आहेच. देशातील कानाकोपर्यानतून आलेले यात्रेकरू पवित्र शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी येतात. अमरनाथ यात्रा जेथे एकीकडे देशातील लोकांना एकतेच्या सूत्रात गुंफण्याचे काम करते, तेथेच स्थानिक लोकांच्या उत्पन्नाचे ते साधनही आहे. यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न बालटालची घटना आश्चयर्यकारक नाही. गेल्या काही दशकांपासून खोर्या तील फुटीरवादी नेते आपल्या हिंसक विरोधाच्या बळावर अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचा कुटिल प्रयत्न करीत आहेत, तेथेच त्यांची बाजू घेणारे, त्यांच्यासाठी धावून येणारे राजकिय पक्ष पर्यावरण आणि कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली यात्रेकरूंच्या वाटेत अडथळे उत्पन्न करतात. अमरनाथ यात्रेसंदर्भात सेक्युलर पक्षांची उदासीनता आणि फुटीरवादी नेत्यांचा प्रखर विरोध एकाच मानसिकतेने प्रेरित आहे. ही मानसिकता हिंदू संस्कृतीच्या विरोधावर केंद्रित आहे. खोर्यावतील काश्मीरच्या मूळ संस्कृतीचे प्रतीक काश्मिरी पंडितांना बळजबरीने हाकलून लावल्यानंतर कट्टरवाद्यांचे एक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. काश्मीर खोरे ‘हिंदूरहित झाले आहे. परंतु, काही आराध्य स्थळे अद्यापही जिवंत आहेत आणि ‘ते जिहादींच्या रडारवर आहेत. अमरनाथ यात्रेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विरोध त्याच मानसिकतेचे उदाहरण आहे. सन २००८ मध्ये यात्रेचा कालावधी ५५ दिवसांवरून कमी कमी करून १५ दिवसच करण्यासाठी रस्त्यांवर उतरून हिंसक आंदोलन करण्यात आले होते. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी अमरनाथ देवस्थान मंडळाला उपलब्ध करून देण्यात आलेली ४० एकर जमीन फुटीरतावाद्यांना पाहवली नव्हती. फुटीरतावाद्यांना खुश करण्यासाठी तत्कालीन सरकारने ताबडतोब जमीन आवंटनाचा निर्णय रद्द केला होता. परंतु, यांच्या अगदी विरुद्ध उर्वरित भारतात मुसलमानांकरता सेक्युलर पक्षांमध्ये त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक सुविधा देण्याची स्पर्धा लागलेली असते. मात्र, अमरनाथ यात्रेत हिंदूंना मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची गरज सरकारला वाटत नाही. बुद्धिजीवी राजकीय पक्ष आणि मीडियाचे मौन काही काळापूर्वी जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रा आणि वैष्णव देवी यात्रेसाठी राज्यात प्रवेश करणार्याप अन्य राज्यांतील वाहनांवर दोन हजार रुपयांचे प्रवेश शुल्क लावले होते. मात्र, पंथनिरपेक्षतेचा धडा शिकविणारे बुद्धिजीवी आणि राजकीय पक्ष तेव्हा चुपचाप बसले होते. कारण? अजमेरशरीफ, हाजी अली किंवा मुसलमानांना पूजनीय असलेल्या अन्य स्थळांबाबत असे घडू शकते काय? पॅलेस्टाईनमध्ये हल्ला झाला, तर गदारोळ हिंदुस्थानमध्ये होईल. उग्र आंदोलने होतील, संसदेचे कामकाज बंद पाडण्यात येईल, आवेशाने मुठी आवळून बाह्या वरती करून संतापाने घोषणा दिल्या जातील. मात्र, हेच लेखक, विचारवंत आणि नेते भारतात होणार्याल सामाजिक आणि जातीय हल्ल्यांबाबत गप्प बसतील. गाझापट्टीवर इस्रायली हल्ल्यांविरुद्ध ज्यांनी संसदेचे कामकाज ठप्प पाडले, ते काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेवर झालेले हल्ले, जाळपोळ आणि यात्रा अडविण्याविषयी तोंडातून चकार शब्दही बोलले नाहीत. भारतातील एक राष्ट्रीय दर्जाचे वर्तमानपत्र सोडले, तर बाकी मीडियाने या अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर मौन धारण केले. जर हज यात्रेकरूंसमवेत जर अशी घटना घडली असती, तर राष्ट्रीय मीडियातून जोरजोरात बोंबाबोंब करण्यात आली असती. हे दुटप्पी मापदंड कशासाठी?

No comments:

Post a Comment