Total Pageviews

Sunday, 10 August 2014

RECRUITMENT YOUTH FOR JIHAD

त रु ण भार त नव्या तरुणांची दहशतवादासाठी भरती अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील १५ ते ३५ वर्षे वयोगटातील काही तरुण हरवले आहे. कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये ‘आयएसआयएस’मध्ये कार्यरत असल्याची धक्कादायक बाब त्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर उघड झाली. यामुळे दहशतवादी, तसेच कट्टर धर्मांध गटांकडून तरुणांवर होणार्‍या स्लो पॉयझनिंगच्या प्रयोगावर प्रकाश पडला आहे. आता त्याच्या सामाजिक पार्श्‍वभूमीचा अभ्यास करावा लागेल. बेपत्ता तरुणांचा डेटाबेस तयार करून तो एनआयएकडे जमा केला जायला हवा. कट्टर धर्मांधता, त्यातून आलेला देशाबद्दलचा अनादर, देशद्रोही घटनांविषयी गुप्तवार्ता, एखाद्या विशिष्ट जातिधर्मातील व भागातील तरुण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्यांच्या पालकांनी नोंदविल्यानंतर त्यांच्या ठावठिकाण्याविषयी, पाठपुराव्याविषयी काही काळेबेरे होते का, हे पोलिसांनी तपासायला हवे. नव्या तरुणांची दहशतवादासाठी भरती पुण्यात कोंढबा भागात जिहादी गटांना मदत करणारे काही लोक आहेत. बीड, औरंगाबाद आणि आता कल्याण, ठाणे, मुंबई या भागात जिहादी विचारांशी संबंधित गट आहेत आणि ते नव्या तरुणांना आपल्या गटात आणण्यासाठी प्रयत्न करतात. रियाज भटकळ आणि त्याचा भाऊ हे कर्नाटकातील भटकळचे तसेच सध्या कारावासात असलेला मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार अतिरेकी हा बीडचा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अशा कारवायांमध्ये भरती केली जात आहे आणि छुपेपणाने ते काम सुरू आहे. बेपत्ता होणारी मुले गुन्हेगारीकडे वळवली जात असतील तर राज्यासाठी ती धोकादायक बाब म्हणावी लागेल. मुले बेपत्ता का होतात? त्यामागील कारणे नेमकी काय असावीत? याचाही शोध घेणे आवश्यक आहे. तरुण मने कोवळी असतात. थोड्याशा कारणाने ती नाराज होतात. मुलांचे संगोपन करताना सतर्कता बाळगली पाहिजे. पालकांकडून मुलांचे अवास्तव लाड व त्यांच्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत आहे का? बेपत्ता मुले का सापडत नाहीत? यात पोलिस यंत्रणा कमी पडते का? सुरक्षा यंत्रणांनीही अधिक सतर्कता बाळगून मुले बेपत्ता होण्याच्या प्रकारांचा छडा लावला पाहिजे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबत गृहविभाग विचार करेल का? दहशतवादी बनविण्यापूर्वी ब्रेनवॉशिंग ब्रेनवॉशिंग करून दहशतवादी बनविण्यापूर्वी किंवा इराकला नेण्यापूर्वी एखाद्या शहरात, गावात एखादी ‘जमात’ उतरते. आठवडाभरात ते प्रवचने वगैरे आयोजित करतात आणि विशिष्ट घरांमधील मुलांना लक्ष्य करतात. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतात. मुलगा ताब्यात आला की त्याचे ब्रेनवॉशिंग सुरू होते. ही प्रक्रिया कित्येक वर्षे चालते. कल्याणमधून गायब झालेल्या चार तरुणांना इराकला जाण्यासाठी पैसे कुठून आले? तसेच त्यांना कट्टरवादी बनवण्यामध्ये कोणाचा हात आहे, याचा तपास व्हायला हवा. आठवड्याच्या धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या या चार तरुणांनी प्रत्येकी ५९ हजार ७८६ रुपये रोख मोजले होते. इराकमधील धार्मिक स्थळांना भेट देणारी ही यात्रा होती. यात्रेदरम्यान ३१ मे रोजी टॅक्सी पकडून हे चारही तरुण करबाला भेटीनंतर मोसूलला गेले. मोसूलला गेल्यानंतर इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया (आयसिस) संघटनेने मोसूल ताब्यात घेतले असावे. पंधरा हजारांवर मुले बेपत्ता कल्याणमधून बेपत्ता झालेली चार मुले इराकमधील दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातून मुले हरवण्याचे, बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. याबाबतची सरकारी आकडेवारी थक्क करणारी आहे. २०११ ते २०१३ या तीन वर्षांत राज्यातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षांखालील मुलांची संख्या पंधरा हजारावर पोहोचली आहे. न सापडलेल्या मुलांचे प्रमाण धक्कादायक आहे. शोध न लागलेल्या मुलांची संख्या तेरा हजारांहून अधिक आहे. मुलांचे पालक तसेच पोलिस यंत्रणेने शोध घेऊनही ती सापडलेली नाहीत. सौदी अरेबियासारख्या इस्लामी देशांकडून पैसा दहशतवादी संघटनांसाठी पैसा सौदी अरेबियासारख्या श्रीमंत, इस्लामी देशांकडून पुरविला जातो. त्यांना जागतिक काळ्या बाजारात हत्यारे मिळतात. दारिद्र्यात जगणारे ‘भाडोत्री’ म्हणून मर्सिनरी- मारेकरी - जिहादी भरती केले जातात. अल्पवयात हातात बंदूक आलेली आणि हाणामार्‍या करण्यापलीकडे दुसरे काहीच येत नाही, अशी हजारो तरुणांची फौज या पैशाच्या बळावर तयार केली जाते. अफगाणिस्तान, इराक, इराण, सिरिया आदी देशांमध्ये अशी फौज तयार आहे. पाकिस्तानमध्ये अल-कायदा आणि तालिबानचे जिहादी तयार होतात व आसरा घेऊन रहात आहेत. जिहादचे हे सारे जागतिक संदर्भ असले तरी भारतातही त्याचा शिरकाव होतो आहे. त्यात सुशिक्षित तरुण सहभागी होत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जिहादचा प्रसार चालला आहे. आता देशाविषयी आत्मीयताही नाहीशी होऊ लागली आहे. या संघटना पद्धतशीर प्रचाराद्वारे तरुणांच्या मनात देशाविषयी व येथील व्यवस्थेविषयी चीड निर्माण करत आहेत. ते प्रमाण मानून तरुण दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यास तयार होत आहेत. त्यामागे सूड भावनाच अधिक प्रमाणात आढळते. अलीकडे करण्यात आलेल्या कारवायांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नवीन तरुणांची भरती करून त्यांना प्रशिक्षित करून सामर्थ्य वाढवण्याचा दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. तेव्हा समाजातील सर्वच स्तरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या हालचालींवर नजर ठेवली पाहिजे. चुकीच्या मार्गाने जाणार्‍या तरुणांना रोखा भारतात राहणार्‍या पाकिस्तानधार्जिण्यांकडून दहशतवादी कारवायांना पाठबळ मिळते. या लोकांना दहशतवादी कारवायांसाठी पैसा आणि प्रेरणा दिली जाते. अर्थात, यात प्रेरणेपेक्षाही पैशाचा भाग महत्त्वाचा ठरतो. एखाद्या सामान्य, गरीब व्यक्तीला अशा कारवाईसाठी १० लाख ते २० लाख रुपये मिळणार असतील, तर ती त्याच्यासाठी बरीच मोठी रक्कम असते. या रकमेतून त्याच्या कुटुंबीयांना काही काळ आर्थिक दिलासा मिळू शकतो. शिवाय अशा व्यक्तींचा दहशतवादी कारवायांदरम्यान मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना मोठी रक्कम दिली जाते. या आमिषापोटी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणार्‍यांची संख्या वाढत आहे. अलीकडे दहशतवाद्यांना अतिरेकी संघटनांकडून नियमित वेतन दिले जात आहे आणि त्याची रक्कम सरकारी अधिकार्‍याला मिळणार्‍या वेतनापेक्षा कितीतरी अधिक आहे. थोडक्यात, जिहादी तत्त्वज्ञानाला भुलून अशा कामासाठी येणार्‍यांची संख्या मोजकीच आहे. बाकी सारे भरपूर पैसा मिळतो, आपल्या आणि कुटुंबीयांच्या सर्व गरजा भागतात याच विचाराने दहशतवादी कारवायांसाठी तयार होतात. ही बाब विचारात घेता अशा व्यक्तींना मिळणार्‍या मोठ्या प्रमाणावरील आर्थिक मदतीवर कसे नियंत्रण आणायचे, याचा विचार गरजेचा ठरणार आहे. या आर्थिक नाड्या आवळायच्या तर अन्य देशांमधून येणार्‍या पैशांवर लक्ष ठेवले जायला हवे. त्याच बरोबर तरुण दहशतवादी संघटनांच्या जाळ्यात येथील अडकणार नाहीत याचीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. दहशतवाद्यांना राहायला जागा देणारे आणि त्यांना पैसा पुरवणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. दहशतवाद्यांपेक्षा त्यांना मदत करणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात. हे लक्षात घेऊन पुढील पावले उचलली पाहिजेत. तरच असे हल्ले थांबवता येतील.

No comments:

Post a Comment