"लव्ह जिहाद' : सत्य-असत्यतेबाबत संभ्रम –E SKAL
- -
सोमवार, 25 ऑगस्ट 2014 - 12:30 AM IST
मुस्लिम युवक बिगर मुस्लिम मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करतात, असा आरोप काही वर्षांपासून होत आहे. या प्रकाराला भारतात "लव्ह जिहाद‘ असे नाव आहे. युरोपात याला "रोमियो जिहाद‘ असे नाव आहे. या आरोपांना काहीही आधार नसल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा काही घटना ब्रिटनमध्येही घडल्याचे वृत्त आहे.
केरळ आणि कर्नाटकमध्ये "लव्ह जिहाद‘च्या घटना घडत असल्याचे बिगर मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कॅम्पस फ्रंट या कट्टर इस्लामवादी संघटनांवर "लव्ह जिहाद‘ची मोहीम चालवीत असल्याचा आरोप आहे. केरळमधील कॅथॉलिक बिशप कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, केरळमधील 4500 मुलींना या संघटनांनी लक्ष्य केले असून हिंदू जनजागृती समितीच्या म्हणण्यानुसार एकट्या कर्नाटकात 30 हजार मुलींचे याच मार्गाने धर्मांतर करण्यात आले आहे. काही चित्रपटांवरही या जिहादचा प्रचार करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
चौकशी झालेली प्रकरणे
ऑक्टो बर 2009 : "लव्ह जिहाद‘ हे गंभीर प्रकरण असल्याचे दिसत असल्याने त्याची चौकशी करण्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले होते. मुलींचे धर्मांतर करण्याचे सामूहिक प्रयत्न होत आहेत काय, याबाबत तपास करण्याचे सीआयडीला आदेश दिले होते.
ऑक्टोाबर 2009 : केरळमध्येही पोलिसांनी तपासानंतर "लव्ह जिहाद‘ या नावाने संघटना नसल्याचा निष्कर्ष काढला.
डिसेंबर 2009 : यासंदर्भात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना केरळ उच्च न्यायालयाचे न्या. के. टी. शंकरन यांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या. "काही संघटनांच्या आशीर्वादाने‘ धर्मांतराचे प्रयत्न होत असून गेल्या चार वर्षांत प्रेमप्रकरणानंतर तीन ते चार हजार मुलींचे धर्मांतर झाले असल्याचे दिसून आले.
जुलै 2010 : केरळला मुस्लिमबहुल बनविण्यासाठी "लव्ह जिहाद‘चा वापर होत असल्याच्या काही वृत्तांचा संदर्भ देत तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी पुन्हा विषय चर्चेत आणला.
डिसेंबर 2011 : या वर्षात बेपत्ता झालेल्या 84 पैकी 69 मुलींनी त्या सापडल्यानंतर त्यांना मुस्लिम युवकांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्याचा आरोप केल्याचा भाजपचा दावा.
डिसेंबर 2011 : पोलिस याप्रकरणी लक्ष घालण्यास घाबरत असल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरोप.
धार्मिक संघटनांच्या प्रतिक्रिया
- हेल्पलाइनवर "लव्ह जिहाद‘ची तक्रार करण्यासाठी अनेक कॉल आल्याचा विश्व हिंदू परिषदेचा दावा
- विविध कॅथॉलिक चर्चचा "लव्ह जिहाद‘पासून सावध राहण्याचा इशारा
- "लव्ह जिहाद‘विरुद्ध श्रीराम सेनेची पोस्टरबाजी, "आमच्या मुली वाचवा, देश वाचवा‘ मोहीम राबविण्याची घोषणा
राष्ट्रीय नेमबाज तारा सचदेव हिने आपले बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्या पतीवर केला आहे. पती रणजितकुमार कोहली याने इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणत तिला एक महिना कोंडून ठेवल्याचे ताराने म्हटले आहे. हा "लव्ह जिहाद‘चा प्रकार असल्याची शक्यठता व्यक्त होत आहे. याबाबतची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे.
रणजितकुमार कोहली याचे खरे नाव रकिबुल हसन असल्याचे ताराला लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवशी समजले. याचा तिला धक्का बसला होता. रकिबुलने तिला इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. ताराने यास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. ताराच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्याने तिचे नाव बदलून सारा असे केले असून याचा ताराने निषेध केला. जवळपास एक महिना मानसिक आणि शारीरिक छळ झाल्यावर ताराने धीर एकवटून भावाच्या मदतीने याबाबत तक्रार नोंदविली.
तारा नेमबाजीचा सराव करत असताना तिचा सराव पाहण्यासाठी रकिबुल येत होता. तेथेच त्यांची ओळख झाली. मुस्लिम असल्याचे त्याने लपवीत तिला हिंदू नाव सांगितले. त्यांचा सात जुलैला विवाह झाला. या लग्नाला अनेक उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री रकिबुलने 20 ते 25 हाजींना बोलावून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने विरोध केल्यावर तिला जबर मारहाणही करण्यात आली. खरी ओळख लपवत लग्न करून फसविल्याचा आरोप ताराने केला आहे.
No comments:
Post a Comment