Total Pageviews

Sunday 3 August 2014

MODI VISIT NEPAL WIN WIN SITTATION FOR NEPAL & INDIA

मोदींनी नेपाळी संसद सदस्यांची मने जिंकली हिंदूराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या नेपाळसोबतचे मैत्रीचे बंध घट्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फ्रेंडशिप डे'चा मुहूर्त निवडला असून ते आज सकाळीच नेपाळला रवाना झालेत. गेल्या १७ वर्षांत भारताच्या एकाही पंतप्रधानानं नेपाळ दौरा केला नसल्यानं मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. त्यांच्यासोबत त्यांचा 'धर्मपुत्र' मानला जाणारा जीत बहादूर आणि सुमारे १०० जणांचं शिष्टमंडळ आहे. नेपाळ हा भारताचा 'सख्खा' शेजारी, सच्चा मित्र... परंतु, गेली अनेक वर्षं त्यांची मैत्री आपण गृहित धरून चालतोय. म्हणूनच बहुधा, इंदरकुमार गुजराल यांच्यानंतर कुठल्याच पंतप्रधानाला नेपाळला जाऊन तिथल्या सरकारशी चर्चा करावीशी वाटली नसावी. २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी नेपाळला गेले होते, पण ते ब्रिक्स परिषदेसाठी... त्यामुळेच नेपाळला भारताबद्दल वाटणारा जिव्हाळा हळूहळू कमी होऊ लागला आणि चीन जवळचा वाटू लागला. ही परिस्थिती नेमकी हेरून नरेंद्र मोदींनी भूतान दौऱ्यानंतर नेपाळला जायचं ठरवलं. त्यानुसार, आज त्यांच्या विशेष विमानानं नेपाळकडे 'टेक ऑफ'ही केलंय. नेपाळच्या मनातील सगळे गैरसमज दूर करून त्यांच्या मनात भारताबद्दल विश्वास निर्माण करायचं आव्हान मोदींपुढे आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबद्दल नेपाळमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. म्हणूनच, राजशिष्टाचार मोडून नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला स्वतः त्रिभूवन एअरपोर्टवर मोदींच्या स्वागतासाठी येणार आहेत. तिथे त्यांना २१ तोफांची सलामीही दिली जाणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या काठमांडूला तर अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं आहे. आपल्या नेपाळ दौऱ्यात मोदी संरक्षण, ऊर्जा, पर्यटन या विषयांवर चर्चा करणार आहेत. आज दुपारी १२च्या सुमारास दोन देशांच्या पंतप्रधानांची बैठक होणार आहे. त्यानंतर, पावणेतीन वाजता मोदी नेपाळच्या संसदेत पोहोचतील. तिथे ते सभापती आणि विरोधी पक्षाचे नेते प्रचंड यांना भेटतील आणि सव्वाचार वाजता ते संसदेला संबोधित करणार आहेत. उद्या, पशुपतीनाथ मंदिरात जाऊन मोदी शंकराची पूजा करतील आणि त्यांचा दोन दिवसांचा दौरा संपेल. ही भेट भारत आणि नेपाळसाठी लाभदायक ठरावी, त्यांच्यातला शेजारधर्म वृद्धिंगत व्हावा, अशीच दोन्ही देशातील नागरिकांची इच्छा आहे. मोदींची 'जीत' दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी नेपाळला पोहोचण्याआधीच तिथल्या जनतेची मनं जिंकली आहेत. मूळचा नेपाळचा असलेला आणि आपलं नशीब अजमावण्यासाठी १६ वर्षांपूर्वी गुजरातला पोहोचलेल्या जीत बहादूर या मुलाला मोदींनी अगदी आपल्या मुलासारखं सांभाळलं. त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्याला स्वतःच्या पायावर उभं केलं. मोदींच्या संवेदनशीलतेचं, सहृदयी स्वभावाचं दर्शन घडवणारी ही गोष्ट नेपाळमध्ये सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे मोदींबद्दलचा त्यांचा आदर दुणावलाय. जीत बहादूरही १६ वर्षांनी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी मोदींसोबतच रवाना झालाय. त्यामुळे या हृद्य भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 'नेपाळला लहान भाऊ नाही, तर आमच्या खांद्याला खांदा भिडवून चालणारा मित्र बनविण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी भारत कटिबद्ध आहे,' असे सांगतानाच, 'नेपाळच्या अंतर्गत राजकारणात भारत अजिबात ढवळाढवळ करणार नाही, उलट सहकार्य करेल,' असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नेपाळच्या संसदेला दिला. शेजारी राष्ट्रांशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या भाजप सरकारच्या मोहिमेचा भाग म्हणून नरेंद्र मोदी नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत. द्वीपक्षीय सहकार्यासाठी एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी नेपाळला भेट देण्याची गेल्या १७ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. या दौऱ्यानिमित्ताने नेपाळी संसदेत आज मोदींचे भाषण झाले. नेपाळी भाषेत भाषणाची सुरुवात करून मोदींनी नेपाळी संसद सदस्यांची मने जिंकली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काठमांडूच्या विकासासाठी १० हजार कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. काय म्हणाले मोदी... > नेपाळच्या भूमीतून जगाला हिंसेतून मुक्त होण्याची दिशा मिळेल. नेपाळचे नवे संविधान जगामध्ये उल्लेखनीय ठरेल. संविधान विविध घटकांना जोडण्याचे काम करते. वादांना संवादाकडे घेऊन जाते. हे काम नेपाळमध्ये नक्कीच होईल.' > भारत-नेपाळचे नाते गंगा व हिमालयाइतकेच जुने आहे. माझ्या कारकीर्दीची सुरुवात मी काशीतून केली आणि आता पशुपतिनाथाच्या चरणांशी उभा आहे. काशीत नेपाळचे पुजारी आहेत आणि नेपाळच्या मंदिरांमध्ये भारताचे पुजारी आहेत. ही आपल्या संबंधांची ताकद आहे. > भारत-नेपाळची सीमा अडथळा नव्हे तर पुलाचे काम करेल, असा प्रयत्न दोन्ही देशांकडून व्हायला हवा.

No comments:

Post a Comment