Total Pageviews

Thursday 19 April 2012

काही पोलीस अधिकारी गुन्हा नोंदवायला आलेल्या सामान्यांनाच उपदेशाचे डोस पाजतात.
चोऱ्या, देवांच्या दागिन्यांच्या आणि त्यांच्याही! ऐक्य समूह राज्याच्या शहरी-ग्रामीण भागातले चोऱ्या-दरोड्यांचे सत्र थांबलेले नाही. चोऱ्या-दरोड्यांच्या घटनांचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद होतात तेव्हा, कायद्याचे रक्षक असलेले काही पोलीस अधिकारी गुन्हा नोंदवायला आलेल्या सामान्यांनाच उपदेशाचे डोस पाजतात. घरात, फ्लॅटमध्ये सोन्याचे दागिने कशाला ठेवलेत? घर बंद असल्याचे पाहून चोरटे घरे फोडतात हे तुम्हाला माहिती नाही काय? तुमचा संशय कुणावर आहे काय? या प्रश्नांच्या सरबत्तीने फिर्यादी गांगरुन जातो. आपल्या घरात चोरी होणार, हे कुणा फिर्यादीला माहिती नसते. आयुष्यभर पैसा पैसा साठवून दोन चार सोन्याचे दागिने असे लंपास होतील, हे त्या बिचाऱ्याला माहितीही नसते. आम्ही चोरट्यांना नक्की पकडू, तुमचे त्यांनी लंपास केलेले दागिने तुम्हाला परत मिळवून देवू, असा दिलासा पोलिसांनी-पोलीस अधिकाऱ्यांनी द्यायला हवा, पण बहुतांश वेळा तसे घडत नाही. पंधरा तीन आठवड्यांनी फिर्यादी पोलीस ठाण्यात चोर सापडला का? आमचे दागिने मिळाले का? असे विचारायला जातो तेव्हा, "तपास सुरु आहे', असे ठरीव ठाशीव उत्तर त्याला मिळते. दोन चार हेलपाटे घालून तो बिचारा आपल्या नशिबाला दोष देत, काही महिन्यांनी पोलीस ठाण्यात जायचेही बंद करतो. महाराष्ट्राच्या सर्व भागात झालेल्या चोऱ्या आणि दरोड्यांच्या घटना उघडकीस यायचे प्रमाण गेल्या काही वर्षात खूपच कमी झाल्यामुळे, घर फोडीत किंवा प्रवासात असताना चोरीला गेलेल्या चीज वस्तू परत मिळतील, असा विश्वास सामान्य जनतेला-व्यापाऱ्यांना-दुकानदारांनाही राहिलेला नाही. पुणे-मुंबई, सातारा, कोल्हापूर या शहरी भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातले सोन्याचे मंगळसुत्र-सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळून जाणाऱ्या मोटार सायकलस्वार चोरट्यांचाही धूमाकुळ सुरु आहेच. आतापर्यंत जनतेच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांचा दरारा-वचक राहिलेला नसल्यामुळे, जगाचे-भक्तांचे रक्षक असलेले देव-देवताही या राज्यात असुरक्षित झाल्या. अवघ्या महिन्यापूर्वीच रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगार मधल्या श्री गणेश मंदिरातली अडीच किलो वजनाची श्री गणेशाची मूर्ती दरोडेखोरांनी लंपास केली. एका सुरक्षा रक्षकाचाही मुडदा पाडला. विधानसभेत या घटनेचे पडसाद उमटले. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. लवकरच श्री गणेशाची मूर्ती चोरणाऱ्या दरोडेखोरांना पोलीस जेरबंद करतील, अशी ग्वाही सरकारने दिली. प्रत्यक्षात मात्र चोरट्यांचा माग पोलिसांना लागलेला नाही. श्रीमंत देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि सुरक्षा हवालदार दिवसा आणि रात्री आहेतच. याशिवाय बहुतांश मोठ्या मंदिरात सी. सी. टीव्ही कॅमेरेही लावलेले आहेत. चोरी झाल्यास चोरटे या कॅमेऱ्यात टिपले जातील, चोरीचा तपास जलद गतीने करता यावा, यासाठीच ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली गेली. पण, ही सुरक्षा व्यवस्थाही धूर्त चोरट्यांनी मोडीत काढल्याचे अंबेजोगाई मधल्या योगेश्वर मंदिरातल्या योगेश्वरी देवीच्या अंगावरचे 31 तोळे सोन्याचे आणि तीन किलो चांदीचे दागिने लंपास झाल्याच्या घटनेने निष्पन्न झाले. महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांची कुलदेवता आणि श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी मंदिरावर दरोडेखोरांनी दरोडा घालून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. दरोडा पडला तेव्हा या मंदिराच्या सुरक्षिततेसाठी कुणीच नव्हते. मंदिरातल्या पोलीस चौकी फक्त उत्सवाच्यावेळीच उघडी असते आणि वर्षभर बंदच असते, असेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. काही वर्षांपूवीॅ श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळत असे. पण गेल्या काही वर्षात श्वान पथक दरोडा-चोरीच्या घटनास्थळाच्या जवळपासच घुटमळते. ते पुढे जात नाही. कारण चोरटे-दरोडेखोर मोटार सायकली-मोटारीने जलद गतीने पळून जातात. पोलिसांच्या हाती, कोणतेही धागेदोरे लागू नयेत, अशी दक्षताही घेतात. मंदिरांचे, घरांचे, फ्लटचे, बंगल्यांचे दरवाजे दिवसाढवळ्या फोडून चोऱ्या करण्याइतके चोरटे धाडसी कसे झाले? घरात माणसे असतानाही रात्री दरोडखोर दरवाजे/खिडक्या फोडून घरात घुसतात. दिसेल त्याला बेदम मारहाण करतात, घराल्या चीज वस्तू घेऊन पळून जातात. घरात माणसे असली आणि घर बंद असले तरीही चोऱ्या-दरोडयांच्या घटना घडतातच. चोरटे-दरोडेखोरांीच्या या धुमाकूळामुळे राज्यातल्या देवदेवताही सुरक्षित राहिलेल्या नाहीत, तर सामान्य माणसाचे काय? अशी भावना जनतेत निर्माण झाली ती, पोलीस खात्याच्या अकार्यक्षमतेमुळेच!महाबोले यांचे महापराक्रम-प्रहार सम्पादकियमहाबोलेंचे महापराक्रम असे काही आहेत की, त्यांचे नाव बारीक टाइपात नव्हे तर शीर्षकाच्या ठळक टाइपात वृत्तपत्रांना छापावे लागले आहे. एसीपी अनिल महाबोले यांचे नाव अवघ्या वर्षभरात पुन्हा एकदा एका वादग्रस्त प्रकरणात पुढे आले आहे. एका महिलेला गुंगीचे औषध घातलेली मिठाई खायला देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित महिलाच धमकीचे एसएमएस पाठवत होती आणि तिने केलेली तक्रार खोटी आहे, हा महाबोले यांचा बचाव सध्या तरी कुणाला पटलेला नाही. 1981 च्या तुकडीतील महाबोले यांच्यासाठी निलंबन आणि वादंग या अपरिचित गोष्टी नाहीत. 2007 मध्ये एका बिल्डरकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. एरव्ही मुंबई पोलिस दलातील सर्वच सहाय्यक पोलिस आयुक्तांची नावे सर्वसामान्यांना माहिती होत नाहीत वा हे सगळेच अधिकारी बातमीचा विषय बनतात, असेही नाही. कधीतरी कुठल्यातरी अधिका-याच्या हद्दीत घडलेला एखादा गंभीर गुन्हा, त्याचा केलेला तपास यानिमित्ताने आलेच तर या अधिका-याचे नाव बातमीच्या मजकुरात छापून येते. पण महाबोलेंचे महापराक्रम असे काही आहेत की, त्यांचे नाव बारीक टाइपात नव्हे तर शीर्षकाच्या ठळक टाइपात वृत्तपत्रांना छापावे लागले आहे. गेल्या वर्षी क्राइम रिपोर्टर जे डे यांच्या हत्येमुळे अवघी मुंबई आणि मुंबई पोलिस दलही हादरले होते. प्राथमिक तपासात संशयाची सुई काही अधिका-यांवर रोखली गेली होती. त्यात महाबोलेंचे नावही होते. जे. डे आणि महाबोले यांची पुरानी खुन्नस असल्यामुळे महाबोले यांनीच डे यांचा काटा काढला, अशी चर्चा सुरू झाली होती. महाबोले आणि दाऊदचे संबंध असल्याचे सूचित करणारे एक वृत्त डे यांनी 2005 मध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत महाबोले यांनी डे यांना कोर्टात खेचले होते. या कोर्ट-कचे-या सुरू असतानाच डे यांची हत्या झाल्यानंतर महाबोले यांचे नाव पुढे आले होते. त्या वेळी हा सगळा माझी बदनामी करण्याचा कट आहे, असे पाणावलेल्या डोळ्यांनी टीव्ही कॅमे-यांसमोर सांगणा-या महाबोले यांना थोडीफार सहानुभूतीही मिळाली होती. चौकशीदरम्यान त्यांची रवानगी साइड ब्रँचला करण्यात आली होती. याच काळात रेल्वे पोलिसांच्या कैदेत असलेला एक गुन्हे वार्ताहर अकेला तथा ताराकांत द्विवेदी याला त्याच्या लॉकअपमध्ये जाऊन महाबोले यांनी धमकावल्याप्रकरणी पत्रकारांच्या संघटनांनीच निषेध मोर्चा काढल्यावर त्यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले होते. त्यांच्या हाताखालील अधिका-यांनीही त्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत नेल्या होत्या. आता एका महिलेने त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करत थेट आयुक्तांकडेच दाद मागितल्यावर पुन्हा महाबोलेंवर निलंबनाची कु-हाड कोसळली आहे

No comments:

Post a Comment