Total Pageviews

Wednesday, 18 April 2012

रणझुंजार कॅप्टन अशोक करकरे भाग ३ ब्रिगेडियर, हेमंत महाजन (निवृत्त)या पुस्तकाचा एक एक भाग रोज ब्लोगवर ठेवला जाइल.पुस्तकाची ई कोपी विनामुल्य ईथे ठेवली आहे.आपल्या मित्राना आणी देश प्रेमी नागरिकना ती जरुर पाठवावी व्यक्ती परिचयकॅप्टन अशोक करकरे या पुस्तकाचा हिरो
स्क्वॉड्रन लीडर के
कर्नल अनंतराव खांडेकर
मेजर जनरल आर
कॅप्टन अरुण करकरे
ले
अरुण ठाकूर
शशीकांत करकरे
सुमती
शीलाताई
ईश्वरी वहिनी
अंजलीताई
सौ
कल्पनाताई
- ब्रिगेडियर, हेमंत महाजनाच्या आईचा मामे भाऊ . बी. करकरे - अशोकचे वडील - अशोकचे बॉस. एस. जंबुसरवाला - अशोकचे मित्र व सहकारी - अशोकचे वडील बंधू. कर्नल संजय गोखले - अशोकच्या मुलीचे यजमान - के. बी. करकरे यांचे जावई - अशोकचा लहान भाऊ(इंदू) - अशोकची आई - अशोकची मोठी बहीण - अशोकची मोठी वहिनी - अशोकची पत्नी. अर्चना (पिट्टू) गोखले - अशोकची मुलगी - अशोकची लहान वहिनी झुंजार महाराष्ट्र1 मे 1960 हा महाराष्ट्राचा राजमान्य जन्मदिवस असला तरी तीन लक्ष शहात्तर हजार नव्वद चौ. कि. मीटर क्षेत्रफळ आणि सातशे वीस चौ. कि. मीटर समुद्र किनारा लाभलेल्या महाराष्ट्राचा भौगोलिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा फार पुरातन आहे, गौरवशाली आहे. स्फुल्लिंग चेतवणारा, अस्मिता जागवणारा प्रबोधनप्रद आहे.सह्याद्री पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावर, दऱ्या-खोऱ्यांत वसलेला महाराष्ट्र अशोकला प्रिय होता. विविधांगी भूस्वरूपे, नद्या, तलाव-सरोवरांनी नटलेला, शिल्प सौंदर्याने सजलेला महाराष्ट्र, जलदुर्ग, भुईकोट, आजिंक्य गड-कोट बुलंद किल्ल्यांनी नटलेला महाराष्ट्र, मराठी शौर्याची यशोगाथा गात आजसुद्धा अविचल ताठ उभा आहे.महराष्ट्राला प्राचीन परंपरा व वैभवशाली इतिहास आहे. सर्व जातीधर्मांतील संतमहंतांचा आशीर्वाद आहे. शूर-वीर लढवय्यांची, राजमान्य राजेश्रींची धवल परंपरा आहे. भारत देश हे एक खंडप्राय राष्ट्र आहे तरी सुद्धा महाराष्ट्र शब्दात "राष्ट्र' सामावले आहे; याचाच अर्थ भारत आणि महाराष्ट्र म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या तर वावगे ठरणार नाही असे मला वाटते.एकेकाळी याच सर्वांगीन समृद्ध, संपन्न महाराष्ट्रावर चालुक्य, शालीवाहन, राष्ट्रकूट, चौल, कदंब, बिंब घराण्याची सत्ता होती. कालौघात त्यांच्या सत्ता विरून गेल्या तरी त्यांच्या सांस्कृतिक कला, शिल्प वैभवाच्या पाऊलखुणा अजंठा, वेरूळ, कार्ला-भाजे, कन्हेरी गुंफा, मंडपेश्वर, एलिफंटा, जोगेश्वरी गुंफा, पांडव लेणी, चांभार लेणी इत्यादी ठिकाणी आजही पाहावयास मिळतात. जगभरातून पर्यटक महाराष्ट्रामधील दगडांतील शिल्पवैभव बघायला दररोज येतात.रायगड आणि राजगडासारखे अभेद्य आणि बुलंद किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. सकल मराठी माणसांची अस्मिता आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या राजधानीचे ठिकाण! थोडक्यात महाराष्ट्राचा तो मानबिंदू आहे, स्फूर्ती आहे, चेतना आहे! एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे प्रवाहित होणारी एक अनामिक उर्जा आहे.महाराष्ट्राबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर कर्नल श्याम चव्हाण यांच्या शब्दांत- ""हिंदुस्थानात अनेक राजे झाले; पण देशाला स्वराज्याची कल्पना देणारे शिवाजी राजे फक्त आपल्याच महाराष्ट्रात जन्मले. दर्यावर्दीपणात ज्यांचे गुणगान इंग्रजांनीही गायले ते कान्होजी आंग्रेही इथलेच. तान्हुल्या बाळाला पाठीशी बांधून आणि घोड्यावर मांड टाकून, शत्रूशी रणांगणात झुंज देणारी राणी लक्ष्मीबाई इथल्याच रक्ताची! आणि ज्या बलाढ्य इंग्रजी सत्तेविरूद्ध तोंडातून "ब्र' काढण्याची कोणाची हिंमत नव्हती, अशावेळी सशस्त्र क्रांतीचा पहिला एल्गार करणारे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे याच पुण्यभूमीतले!''मराठ्यांचा ध्वज आणि "हर-हर महादेव' ही युद्ध घोषणा अटकेपार घेवून जाणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांना महाराष्ट्र विसरेल काय? अहो, खुद्द राघोबादादांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा ठोठावणारे रामशास्त्री प्रभुणे याच महाराष्ट्र माउलीचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच! अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक, ""महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्‌गहस्त झाला पाहिजे'' असे ठणकावून सांगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरसुद्धा याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीत जन्मलेले. इंग्रजी आमदानीत प्रतिसरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील याच महाराष्ट्रातील कृष्णा काठचे! 1965च्या युद्ध प्रसंगी हिमालय जेव्हा चलबिचल झाला तेव्हा- "हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीचा काळा पत्थर आपल्या छातीचा कोट करेल' असे निक्षून सांगणारे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र आणि देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण याच पुण्य-प्रतापी रणझुंजार महाराष्ट्राचेच!स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतर
"
महाराष्ट्र माझा।
1962 भारत-चीन युद्ध, 1965 भारत-पाक संघर्ष, 1971 बांग्लादेश मुक्तिसंग्राम आणि अगदी अलीकडे म्हणजे 1999 चे द्रास कारगिल विजय ऑपरेशन युद्धात महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. शौर्याची परंपरा हर-हर महादेव या शिवगर्जनेने कायम राखली आहे. म्हणून तर अभिमानाने म्हटले जाते-दिल्लीचेही तख्त राखितो'असो, याच महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवळे-तुरळ गावात करकरे नावाचे एक घराणे, महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेत मानाचा तुरा रोवण्यास स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर अगदी 1971च्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामातही धडपडत होते. त्यांच्या शौर्य, कार्य-कर्तृत्व इतिहासाकडे वळण्यापूर्वी भारत मातेच्या मुक्तीसह गौरव गरिमाकडे वळूया.हर-हर महादेव! छत्रपती शिवाजी महाराज की जय!

No comments:

Post a Comment