रणझुंजार कॅप्टन अशोक करकरे भाग ७ ब्रिगेडियर, हेमंत महाजन स्वप्न साकार झाले!सैनिकी जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्टिंग. ती केव्हा, कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या मोर्च्यावर कधी होईल हे नक्की कुणाला ठामपणे सांगता येणार नाही. सेना दलात ऑर्डर म्हणजे ऑर्डर! तिथं उन्नीस-बीस नसतं.पॅरिसमधील सेवा कालखंड संपला आणि के. बी. करकरे फॅमिली आपल्या लवाजम्यासह पुन्हा 1956च्या ऑगस्ट महिन्यात विदेशी हवा-पाणी, ज्ञानानुभव, जीवनशैली आत्मसात करून भारतात परतले. शेवटी नाही म्हटले तरी प्रत्येकाला स्वदेश मातीची ओढ असतेच! यामुळे झाले काय, की करकरे कुटुंबाची पॅरिस-लंडनची नाळ तुटली ती कायमची. मात्र या पूर्वी कधीही करकरे कुटुंबसमाजातील नातेवाईकांमधून, नागपूर-वर्धा सोडून कोणीही बाहेर गेलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या समाज गोतावळ्यात त्यांना मानाचे पान होते.दिल्लीतील शाळा-कॉलेजेस सुरू होऊन जवळपास दीड महिना झाला होता. आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावे म्हणून अशोक-अरुणची शोधाशोध सुरू झाली.अशोकचे वडील त्याकाळी भारतीय दूतावासात काम करीत असले तरी त्यांच्या मुलांसाठी शाळा-कॉलेजात राखीव जागा नव्हत्या की ज्या आज सरकारने त्यांच्यासाठी विशेष रिझर्व कोटा म्हणून ठेवल्या आहेत.दिल्ली शहरातील एखाद्या प्रसिद्ध आर्टस् कॉलेजात अशोकला ऍडमिशन हवे होते पण त्याला ते मिळाले नाही. अरुणला मात्र "सेंट स्टिफन्स कॉलेज' दिल्ली मध्ये बी.एस.सी. फर्स्ट इअरला प्रवेश मिळाला.मुंबईच्या आसपास जशी ठाणे, भिवंडी, पनवेल, भाईंदर, विरार-वसई ही एकेकाळची गावं. तशी पानिपत, गाझियाबाद, फरिदाबाद, गुडगांव ही त्याकाळची दिल्ली जवळची गावं. तिथं कॉलेजेस होती; परंतु त्यांपैकी गुडगावचं कॉमर्स कॉलेज अशोकला आवडलं. जरी ते कॉमर्स कॉलेज असले तरी त्या महाविद्यालयात आर्टस् शाखा होती. आर्टस्-कॉमर्सचे विद्यार्थी शिकत होते. अशोकने हेच कॉलेज निवडले.लंडनमध्ये तीन वर्षे शिक्षण घेतलेल्या अशोकनं भारतात परतल्यानंतर दिल्ली बाहेरच्या गुडगांव आर्टस् कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. साधं कॉलेज साधी बिल्डिंग. बसने जायचा, बसने यायचा. त्यात त्याचे दोन तास जाण्या-येण्यात खर्च व्हायचे. याच कॉलेजात त्याने इंटरमिजीएट पूर्ण केले. पण त्याचे मन लागत नव्हते. कॉलेज व शिक्षणात त्याला विशेष रस नव्हता.याच कालावधीत अरुणने समुद्र जॉईन केला. 13 फेबु्रवारी 1956 रोजी अरुण नेव्हीत (मर्चंट) भरती झाल्यामुळे त्याच्या अंगावर गणवेश चढला. त्यात त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व खूपच खुलून दिसायचे. मधमाशाच्या पोळ्यासारखे अरुणचे मित्र-मैत्रिणी त्याच्या भोवती गुंजन करू लागले, जमू लागले. त्याचा वाढता मित्रपरिवार त्याच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष होती. याउलट अशोकचा मित्र परिवार शून्य म्हटला तरी चालेल. अरुणचे मित्र तेच त्याचे मित्र.घरा-दारात, मित्र परिवारात, वागण्या-बोलण्यात अरुणचं कौतुक जास्त होऊ लागले. आई-वडील, शीलाताईसुद्धा अरुणदादाचं सतत कौतुक करायचे.अरुण नेव्हीत गेला त्याचे खूप कौतुक व्हायचे ते पाहून अशोक नर्व्हस व्हायचा. मग माझे कसे होणार? हा प्रश्न त्याला सतावत होता. दैनंदिन बोलण्यातसुद्धा तोंडभर अरुण आणि अरुणच! त्यात आणखीन एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे शीलाताईचे यजमान श्री अरुण ठाकूर हे सुद्धा एअर फोर्स मध्ये पायलट. वडील एअर फोर्समध्ये, अरुणदादा नेव्हीत, बहिणीचे मिस्टर तेही हवाईदलात "फायटर' पायलट होते. यांचा आणि त्यांच्या अंगावरील गणवेशाचा प्रभाव अशोकच्या मनावर खोलवर झाला होता. आपणही याहून मोठे व्हावे व नावलौकिक मिळवावे, सैन्यात भरती व्हावे, मग आपली घरात उपेक्षा होणार नाही. मान-सन्मान वाढेल. माझे सगळे कौतुक करतील असे वारंवार वाटू लागले. त्याची एकच खंत होती ती म्हणजे मला माझ्या घरातले लोक कमी का लेखतात? अरुणचेच कौतुक-लाड जास्त का करतात? हा विचार त्यांच्या मनात पक्का घर करून बसला. अशोकनं मनोमन ठाम निर्धार केला की "मी भारतीय सैन्यदलात भरती होणार'. अन्य कोणत्याही क्षेत्रात मी नोकरी करणार नाही आणि तसे त्याला आकर्षणही नव्हते...आणि अरुण पेक्षा किंबहुना वडिलांपेक्षा, जिजाजींपेक्षा अधिक शौर्य आणि किर्ती आर्मीत मिळविन. ही जणू त्याची मनोमन भीष्म प्रतिज्ञा होती की जी भविष्यात खरी ठरली.अशोक जरी इंग्लड
""-पॅरिसमध्ये गेला, शिकला, पुन्हा भारतात आला, तरी त्याचं मन कुठेतरी भटकत होतं. ते म्हणजे त्याला भारतीय सेनेत दाखल व्हायचे होते. वडिलांसारखे सेनेत जायचे, अरुणदादासारखे नेव्हीत उच्च पदावर जावे, ताईच्या यजमानासारखे फायटर पायलट व्हावे असे जेव्हा-जेव्हा अशोक बोलायचा, घरात विषय निघायचा तेव्हा-तेव्हा सगळे गमतीने त्याला म्हणायचे, अरे! तू ठेंगू असल्यामुळे तुला नेव्हीत किंवा एअरफोर्समध्ये ऍडमिशन मिळणे कठीण. तुला सैन्यातही नोकरी मिळणे अशक्य. त्यामुळे तू दुसरीकडे प्रयत्न कर!''कुटुंब, मित्र-परिवारातील पुन्हापुन्हा वाक्योपदेश-तुणतुणे ऐकून अशोकच्या मनावर याचा गंभीर घाव आणि परिणाम झाला. त्याचे कॉलेजात मन रमेना.ठाम निर्णय
1962 , पक्का आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून अशोक भारतीय वायुदल, नौदल, आर्मिची माहिती पुस्तके, प्रवेश पात्रता, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व हालचाली कुणाला न सांगता करू लागला. दररोज दैनिके वाचू लागला. सेनादलातील जाहिराती शोधू लागला, वाट पाहू लागला. म्हणतात ना, तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल, दृढ श्रद्धा असेल, त्यादृष्टीने प्रामाणिक कठोर परिश्रम होत असतील तर एक-ना-एक दिवस तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहचू शकता. प्रयत्नांती देव दिसतो. कारण "भगवान के घर देर है, अंधेर नहीं।" अशोकच्या बाबातीत तेच घडलं.मध्ये इंडिया-चायना वॉर जुंपले. ऑफिसर्सच्या शॉर्टेजमुळे मद्रास येथे ओ.टी.एस. (Office Training School) सुरू झाले. त्यावेळी अशोक दिल्लीत बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिकत होता. इंडिया गव्हर्मेंटने डिक्लेअर केले की, आर्मित लोकं भरावयाची आहेत. सेनेत भरती सुरू झाली होती. त्याचा अशोकला फायदा झाला. अशोकने देशाच्या आवाहनास प्रतिसाद दिला.इंडिया-चायना युद्धानंतर भारतीय सेनेने ओ.टी.एस. सुरू केले. त्यामार्फत शॉर्ट सर्विस कमिशनचा कोर्स सुरू केला. तो मद्रासला होता. जिथं एका वर्षाचा ट्रेनिंग कोर्स होता तो केल्यानंतर तिथं सात वर्षे नोकरी करू शकतो आणि काम चांगले असेल तर बढती.सन 1963 मध्ये जेव्हा अशोक कॉलेजच्या तृतीय वर्षात शिकत असताना त्याच कालावधीत इमर्जन्सी कमिशनसाठी युवकांना दैनिकातून आवाहन केले गेले.अशोक जेव्हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाचा स्टुडंट होता त्यापूर्वीच त्याने वायुसेनेतील कमिशनसाठी "पब्लिक सर्विस कमिशन'च्या परीक्षा तसेच सर्विस सिलेक्शनच्या बोर्डाच्या परीक्षा देऊन त्यात तो उत्तीर्ण झाला होता. परंतु मेडिकल टेस्ट मध्ये उंची मुळे बाद झाला होता. त्याला अनफिट केले. त्यामुळे त्याची वायुसेनेत निवड होऊ शकली नाही याची त्याला खंत होती.यापुढेही वायुसेनेत सिलेक्शन होण्याची अशोकला सुतराम शक्यता नव्हतीच. आणि म्हणून त्याने आपला मोर्चा दुसरीकडे वळविला. दुसरा पर्याय म्हणजे सेना कमिशन निवडला. कारण डिफेन्स सर्विसशिवाय त्याला अन्य कुठल्याही क्षेत्रात नोकरी करायची नव्हती, त्याचे मन तयार होत नव्हते.याबद्दल अशोकचे वडील स्क्वॉड्रन लीडर के
"". बी. करकरे यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय त्यात ते म्हणतात- मुझे ऐसा लगता है कि सैनिक परिवारों की भी कुछ ढीली-ढीली सी सही पर बिरादरी होती है, जिसके बाहर जाना लोग प्राय: पसंद नहीं करते, अब हमारे छोटे से और औसत परिवार की बात ही देखिए कि मैं एयरफोर्स में, बड़ा लड़का अरुण नेव्ही (मर्चन्ट) में है और मेरा दामाद वायुसेना में है- फायटर पायलट।''देशाच्या आवाहनास अशोकने प्रतिसाद दिला. जणु दैवानेच त्याला बोलाविले. कुणाचीही मदत न घेता, कुणालाही न सांगता, कुठेही वाच्यता न करता अशोकने ओ.टी.एस.चा फॉर्म आणला कुणाचीही मदत न घेता बिनचूक भरला आणि पाठवला.परीक्षा व मुलाखतीसाठी "हजर रहा'चं पत्र अशोकच्या हाती पडलं. पॉकेट मनी घेऊन अशोक कुणाला न सांगता गुपचूप मद्रासला निघून गेला. घरी याबद्दल कुणालाच थांगपत्ता लागू दिला नाही कारण यदाकदाचित इथंही मी भरती झालो नाही तर नाचक्की होईल, पुन्हा मला घरातील चिडवतील यामुळे त्याने याबद्दल वाच्यता न करता फक्त मद्रासला मित्रांबरोबर जातोय एवढेच सांगितले.अशोकला आर्मित संधी मिळाली. त्यात तो एलिजिबल झाला. लेखी परीक्षा (Written Test) मेडिकल व शारीरिक (फिजिकल) अशा तिन्ही परीक्षेत तो उत्तीर्ण झाला.इंटरव्ह्यू घेणाऱ्या ऑफिसरने अशोकला सांगितले की ""तू आर्मीच्या मेडिकल स्टॅंडर्डप्रमाणे उंचीने लहान आहेत.'' न बोलणाऱ्या अशोक ने हजारी जबाब दिला तो असा
""-सर माझ्या उंचीकडे पाहू नका. माझी उंची लहान असल्यामुळे लढाईतील फायरिंगमध्ये शेवटचीच गोळी लागण्याची शक्यता आहे; त्यामुळे मी शत्रू हल्ल्यापासून बचावला जाऊ शकतो व मला समोरच्या शत्रूवर हल्ला करणे सोपे जाईल. मी शेवट पर्यंत लढा देत राहीन. मला चान्स द्या.''असे बाणेदार उत्तर देऊन अशोक बाहेर आला. मात्र मुलाखत घेणारे सर्वच ऑफिसर अवाक् झाले. ते कॅबीनमधून बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या अशोककडे बघत राहीले.ऑफिसरनी या विषयावर चर्चा केली... आणि त्यानंतर... सिलेक्शनचं पत्र हातात पडल्यावर अशोकला एवढा आनंद झाला की त्याचे वर्णन फक्त "आकाशा एवढंा' याच शब्दांत करता येईल. त्याची जिद्द, त्याची उर्मी, त्याची ऊर्जा आणि अंतिम ध्येयसुद्धा तेच होते की मी वडिलांपेक्षा, भावापेक्षा, भाऊजींपेक्षा काही तरी दिव्य-भव्य, शौर्य पदकं प्राप्त करणार! तुम्ही सगळे मला म्हणत होता ना, तुझे पाय पोहचत नसल्यामुळे पायलट होऊ शकत नाही. तू शॉर्ट असल्यामुळे नेव्हीत किंवा आर्मित भर्ती होणार नाहीस... अरे! पण थांबा. पहा हे पत्र. माझं आर्मित सिलेक्शन झालंय वगैरे प्रश्नांनी अशोकच्या मनात भाऊगर्दी केली.जरी अशोकच्या मनात घरच्यांच्या विषयी वादळ उठलं असलं तरी तो यावेळी या क्षणी आपला संताप-राग कुणावर व्यक्त करणार? अरुण असता तर त्याची वह्या-पुस्तके इकडेतिकडे लपवून, फेकून दिली असती पण तो समुद्रावर; मग राग तरी कुणावर काढणार? शीलाताईचं लग्न होऊन तीही आपल्या घरी गेली. राहीला शशी तो तर लहान. खरं तर आर्मी जॉईन केल्यानंतरच अशोक त्याबाबत आई-बाबा-दादा-ताईला सांगणार होता. परंतु मद्रासला जायचे कसे? पॉकेट मनी संपला होता म्हणून नाईलाजास्तव अशोक मद्रासला जायला निघाला तेव्हा आदल्या रात्री घरी सांगितले. सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या.सिलेक्शनचं पत्र वडिलांच्या हाती दिले तेव्हा त्यांना कळले की अशोकचं आर्मित सिलेक्शन झाले आहे. त्याला मद्रासला जॉईन व्हायचे आहे.गप्पांच्या ओघात लेखक या नात्याने मी बाबांना सहज प्रश्न विचारला
"",तुम्हीही वायुसेनेत होता, अरुण नेव्हीमध्ये, जावईसुद्धा एअर फोर्समध्ये-पायलट, तेव्हा अशोकने ही हे क्षेत्र निवडले त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत?बाबांनी उत्तर दिले- ""मी वायुसेनेत होतो. मी त्याला विरोध केला नाही. आणि त्याला म्हणालो, तुझी इच्छा आहे तिथं जा.''मी विचारले
""
""
"", ""तुमचं किंवा अशोकच्या आईचं त्याच्यावर प्रेशर होतं का?''नाही. माझं किंवा त्याच्या आईचं प्रेशर मुळीच नव्हतं. त्याला स्वत:च जायचे होते.''का?''कारण त्याला ती लाईफ स्टाईल आवडली होती. नाही तर बाहेर तर कुठे नोकऱ्या मिळताहेत?''पुढे ते म्हणाले, ""अशोकने सर्व परीक्षा दिल्या, त्यात तो पास होत गेला. तो फार आनंदी झाला.''अशोकने ओ.टी.एस. जाईंन केले 3 मे 1964 ला. आपले शिक्षण अर्धवट सोडून अशोक सेनेत भरती झाला. ट्रेनिंग सुरू झाले त्यावेळी अरुण समुद्रावर होता.अरुणला समुद्रावर पत्र आले- ""माझे आर्मित सिलेक्शन झाले. मी जरी लहान असलो तरी लढाईत पहिल्या क्रमांकावर असेन.''यावर अरुणची प्रतिक्रिया काय होती ते पाहू. अरुणदादा आपल्या आठवणींना उजाळा देत म्हणाले, ""मी तर 12 फेबु्रवारी 1956 साली नेव्हीत भरती झालो होतो. तेव्हापासून माझी व अशोकची ताटातूट झाली. रोजचे आमचे संबंध तुटले. आज एकमेकांना फोन-मोबाईल वरून निदान भेटता तरी येते पण त्याकाळी तशी सुविधा नव्हती. पत्रभेट हेच एक माध्यम होतं.अशोक आर्मीत भर्ती झाला, वाचून खूप आनंद झाला. आम्ही त्याला चिडवायचो, ""तू वीक आहेस! फिजिकलमध्ये तुझं सिलेक्शन होणार नाही, वगैरे...'' पण देवाच्या मनात काही तरी वेगळं होतं. समुद्रावर मला या आठवणींची खंत वाटली पण अशोकची सुप्त इच्छा देवाने पूर्ण केली याचं मोठं समाधान झालं. उर भरून आला. अभिमान वाटला. मी समुद्रावर आलो तेव्हापासून आमची जोडगोळी तुटली-ताटातूट झाली ती कायमची!''आठवणींच्या गर्दीने अरुण भावूक झाले
""1965 . डोळे पाणावले. तोंडातून शब्दांना वाट मिळेना! आवंढा गिळत थोडे थांबले आणि पुन्हा बोलू लागले-ते 1971 या कालावधीत मी अशोकला भेटलोच नाही. ही माझी खंत आहे. जेव्हा कधी या गोष्टीची आठवण होते तेव्हा टचकन डोळ्यात अश्रू उभे राहतात. मी समुद्रावर होतो व अशोक आर्मित. म्हणजे एक पाण्यावर आणि एक जमिनीवर. जोडी तुटली.अशोकचं आर्मी जीवन सुरू झाले. अशोकला ट्रेनिंग नंतर कमिशन मिळाले. 1964 मध्ये ट्रेनिंग नंतर आर्टलरीमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून हुद्दा मिळाला. या कालावधीत अशोकने स्वत:ला खूप फिट केले. सैन्यातील युद्धातील बारीक सखोल ज्ञान-तंत्रज्ञान, समय सूचकता, फायर, बचाव, चपळाई इत्यादींमध्ये कमालीची उत्सुकता, जिज्ञासा व कार्यतत्परता दाखविल्यामुळे त्याची पदोन्नती झाली.इंडिया-चायनाचे वॉर संपते-न-संपते तो पुन्हा भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले. पाहता-पाहता युद्ध सुरू झाले. यावेळी कॅप्टन अशोक करकरे हे 1965 मधील भारत-पाक युद्धात सियालकोट सेक्टर मधील पहिल्या तुकडीत तैनात होते.युद्धाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अविरत लढत होते. दुष्मनशी चार हात करीत होते.अशोक स्मृतीगंधाची एक आठवण अरुणदादा सांगत होते- ""1965 ची भारत-पाकची पहिली लढाई दैनिकातून वाचत होतो, अनुभवत होतो.युद्ध विरामानंतर जेव्हा अशोकची माझी भेट झाली तेव्हा मी त्याला विचारले, ""काय रे! तुला मरणाची भीती नाही का वाटते?''त्यावर अशोक म्हणाला, ""नाही. मुळीच नाही! मी इन्फंट्रीबरोबर असतो. मी पहिला जाणार! अरे यार, प्रत्येक गोली पर सैनिक का नाम होता है, तब मरने से कौन डरता है? इस घमासान युद्ध में दुष्मन की गोली पर मेरा नाम नहीं था। सो तो बच गया। मौत से कौन डरता है?''पुढे अरुणदादा सांगतात- ""जेव्हा कधी आर्मी युद्धाच्या चर्चा व्हायच्या तेव्हा तो मला म्हणायचा, ""मेरा जीगर तेरे से बड़ा है।''एकदा तर अशोकने मला मार्मिक किस्सा सांगितला तो असा
""-दादा, पोस्टवरील तोफखान्यावर आम्ही तिघेजण तैनात होतो. दिवसभर पोटात अन्नाचा कण नव्हता. चौकी सोडून जाता येत नव्हते. शेवटी आम्ही निर्णय घेतला की एकाएकाने जेवण करून यायचे मी जेवायला गेलो तितक्यात पोस्टवर एक शेल येऊन पडली. माझे दोन साथीदार शहीद झाले. मी असतो तर काय झाले असते? जोडीदार गेले. मी वाचलो.'' थोडं थांबून तो म्हणाला, ""उस पर मेरा नाम नहीं था।''खरंच इन्फ्रट्रीला मरणाची भीती मुळीच नसते
!

No comments:
Post a Comment