Total Pageviews

Sunday, 22 April 2012

अग्नी-'ची यशस्वी चाचणी :लष्करात सामिल होईल व्ह्यायला अजून ४-५ वर्षे
अग्नी-'ची यशस्वी चाचणी जमिनीवरून जमिनीकडे तब्बल हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेणा-या 'अग्नी ' या अण्वस्त्रवाहू अत्याधुनिक क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी यशस्वी चाचणी केली. या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राच्या सिद्धतेमुळे आंतरखंडीय प्राक्षेपिक क्षेपणास्त्र असलेल्या जगभरातील अवघ्या पाच देशांच्या यादीत भारत सामील झाला आहेच; त्याचबरोबर भारताचा सामरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमधील बीजिंगसारखी महत्त्वाची शहरे आता निशाण्यावर आली आहेत.आता भारताच्या टप्प्यात अमेरिका वगळता संपूर्ण आशिया, आफ्रिका आणि युरोप. ओदिशाच्या किना-याजवळील व्हीलर बेटांवर तयार करण्यात आलेल्या लाँचरच्या साह्याने गुरुवारी सकाळी वाजून ०७ मिनिटांनी 'अग्नी ' हवेत झेपावले. त्यामध्ये जवळपास ५० टन वजन आणि स्फोटके भरण्यात आली होती. सुमारे ६०० किमीची उंची गाठल्यानंतर खाली झेपावत 'अग्नी'ने हिंद महासागरातील हजार किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेतला.

*
उंची १७. मीटर, रूंदी मीटर

*
एक टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता.

*
अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्सकडेच या क्षमतेचे क्षेपणास्त्र
*
*
* 2014-15
*
शत्रुदेशाचा अवकाशातील उपग्रहही भारताला पाडता येणार. मध्ये लष्करात सहभागी. ता पर्यन्त खर्च २५०० कोटी.
अग्नी 1 700 ते 1200 किमी अग्नी 2 2000 ते 2500 अग्नी 3 3000 ते 5000 अग्नी 4 3200 ते 3700 अग्नी 5 5000 ते 6000 अग्नी 6 6000 ते 16000 (काम चालू)अग्नि 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राने पाच हजार किलो मीटरवरचे लक्ष्य वीस मिनिटात अचूक भेदले, पृथ्वी 5 ची पहिलीच चाचणी अत्यंत काटेकोरपणे यशस्वी झाली, या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या पहिल्याच यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत आता अमेरिका, फ्रान्स, चीन, रशिया या सामर्थ्यशाली राष्ट्रांच्या मालिकेत जावून बसला. अमेरिका वगळता आफ्रिका, युरोपसह सारे जग भारताच्या अण्वस्त्रांच्या टप्प्यात आल्यामुळे, आपल्या लष्करी शक्तीच्या घमेंडीवर सतत धमक्या देणाऱ्या शेजारील राष्ट्रावरही आपोआपच वचक बसेल. एक मेट्रिक टन वजनाचे अण्वस्त्र हे नवे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकते आणि ते ठरवलेल्या लक्ष्याच्या दीड मीटर म्हणजे अवघ्या 5 फूटांच्या परिघातच वेध घेते, इतकी अचूकता या अत्याधुनिक यंत्रणेत आहे. हे अतिविध्वंसक क्षेपणास्त्र लष्करात -५ वर्शात सामिल होईल. अग्नि 5 चे प्रक्षेपण बुधवारीच होणार होते. पण, खराब हवामानामुळे ते पुढे ढकलले गेले .अर्थात खराब हवामानात त्याची अचुकता कमी होईल.
अग्नि- मुळे चिनी चिडला
तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असणा-या 'अग्नि-' या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं भारतानं यशस्वी परीक्षण करताच चिनी मिडिया चांगलाच चिडला आहे. या परीक्षणामुळे भारताला फारसं काही साध्य करता येणार नसून आण्विक अस्त्रांबाबत चीनपुढे भारताचा कुठेच निभाव लागणार नसल्याचं एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. भारत एक गरीब देश आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत मागे असूनही तेथील समाज आण्विक अस्त्रांची वकिली करतो, असं या वर्तमानपत्राने म्हटले आहे. पाश्चिमात्य देश मात्र भारताच्या या शस्त्र शर्यतीविषयी गप्प असल्याचं यात म्हटलं आहे.
चीनच्या कुरापतींमध्ये वाढ आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्याच बळावर आज चीनने त्यांचा दबदबा कायम राखला आहे. गेल्या १० वर्षांमध्ये भारत-चीन सीमेवरील चीनच्या कुरबुरींमध्ये आणि कुरापतींमध्ये वाढ झाली आहे. खासकरून गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये त्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. कधी अरुणाचल प्रदेश हे त्याचे निमित्त असते किंवा मग आजवर शांत राहिलेल्या लडाखमध्ये केलेली चिनी घुसखोरी हे कारण ठरते. महासत्ता होण्यासाठी चीन प्रयत्नपूर्वक पावले टाकते आहे. आणि याच खंडात असलेला भारत हा त्यांना मोठा अडसर वाटतो आहे. त्यामुळे चीनने पाकिस्तानच्या मदतीने पश्चिमेच्या बाजूस भारताची कोंडी केली आहे. आणि आता पूर्वेकडील म्यानमारसारख्या देशांना अंकित करून भारताची कोंडी बंगालच्या उपसागरात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आजवर कधीही भारताच्या पूर्व किनारपट्टीची चिंता करावी लागली नव्हती. मात्र चिनी कारवायांमध्ये वाढ झाल्यानंतर भारताची पूर्व किनारपट्टी तेवढी सुरक्षित राहिलेली नाही. एका बाजूस त्यांनी हिमालयात एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याचे काम केले आहे. त्याचा वापर लष्करी कारणांसाठी आता होतो आहे. वरती काराकोरम पर्वतरांगांपर्यंत द्रुतगती महामार्ग तयार करून तो पाकिस्तानला जोडला आहे. पाकिस्तानातील ग्वादार आणि म्यानमारमधील बंदरात चिनी युद्धनौकांचा तळ आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी , बीजिंगपर्यंत धडक मारण्याची क्षमता राखणारे आणि अण्वस्त्रवाहूअग्नी- हे त्या कारवायांना दिलेले एक उत्तर आहे. माजी राष्ट्रपती डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम हे भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे जनक आहेत. कमी वेळात त्यांनी क्षेपणास्त्र साकारले. ओरिसाच्या किनार्‍यावरील एका बेटावरून मोबाईल लॉँचरद्वारे हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. हिंदी महासागरात तीन टेहळणी जहाजांमधून या प्रक्षेपणाची पाहणी करण्यात येत होती. क्षेपणास्त्राचे सर्व निकष सिद्ध झाल्याचे या पाहणी पथकाच्या अहवालात म्हटले आहे. अर्थात हे क्षेपणास्त्र डावपेचात्मक आहे. अशा अस्त्रांचा उपयोग हा धाक दाखविण्यासाठी असतो. त्यामुळे शेजारी राष्ट्रांना नसते धाडस करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागेल. अग्नि क्षेपणास्त्र यंत्रणेत येत्या काळात आणखी सुधारणा कराव्या लागणार आहेत. विशेषत: त्याची अचुकता वाढविण्यावर भर दय़ावा लागणार आहे. अशीच यंत्रणा प्रतिस्पर्धी राष्ट्रांकडे आहे, हे लक्षात घेऊ न त्याला उत्तर देऊ शकणारी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणाही भारताला तयार करावी लागणार आहे. युध्दाचे तंत्र झपाट्याने बदलत ते अवकाशात जाऊ पाहात आहे.पण सुरक्षेची गरज म्हणून त्याचाही विचार भारताने करणे अपरिहार्य आहे, कारण केवळ बलवानच शांतता प्रस्थापित करू शकतो

क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आणी सैन्यामधे प्रवेशभारताच्या संरक्षण दलात एका बाजूला शस्त्रास्त्रांची कमतरता असल्याची चर्चा असताना आणि अशाच प्रकारचे अनेक वादंग निर्माण झाले असतानाच दुसर्‍या बाजूला एक चांगली बातमी येऊन थडकते की 'अग्नी 5' या तब्बल पाच हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून 'हम भी कुछ कम नहीं!' चा इशाराच जगाला दिला आहे. आतापर्यंत अग्नी 1-5 क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. तसेच पृथ्वी 1-2 चीही यशस्वी चाचणी झाली आहे. पृथ्वी हे संपूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केले गेलेले क्षेपणास्त्र आहे. सध्या हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्य दलात रुजू आहे! यावरून 500 किलोचे बॉम्ब वाहून नेले जाऊ शकतात. 'धनुष्य'. हे केवळ नौदलासाठी विकसित केले गेले आहे. साडेतीनशे किमीपर्यंत ते मारा करू शकते. 'ब्राह्मोस' नावाचे क्षेपणास्त्रही ध्वनीच्या गतीने जाणारे क्षेपणास्त्र आहे. हे रशियाच्या मदतीने भारताने तयार केले. 'सागरिका' नावाचे क्षेपणास्त्र समुद्रात मारा करण्यासाठी वापरले जाते. हे क्षेपणास्त्र सुमारे 700 किमीपर्यंत जाऊ शकते. आकाश क्षेपणास्त्रही तसेच आहे. हे अतिशय महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे. एकूणच भारताने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारतीय संरक्षण दलाला आणखी मजबुती देण्याचे काम के ले आहे आहे. मात्र यासाठी आपल्याला 2014-15 पर्यंत थांबावे लागणार आहे. पण य़ामुळे नक्षलवाद्यांचे हल्ले कमी होतील का ?ईशान्या भारतातिल घुसखोरी व कश्मिर मधला आन्तकवाद थाम्बेल का ? नाही ती लढाई चिन शी वेगळ्य़ा स्तरावर लढावी लागेल.अग्नी-5'च्या यशस्वी चाचणीमुळे भारताने सामरिक महासत्तांच्या गटात पदार्पण केले,पहिल्या यशस्वी पावलाचे अभिनंदन (शासन आणि वैज्ञानिक यांचे) करतानाच पुढच्या कठीण मार्गावर प्रगती करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देणे गरजेचे आहे
भारत स्वबळावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करू शकतो, हे जगाला दाखवून देण्याचे कामअग्नी-ने केले आहे. त्याच्या आणखीही काही महत्त्वाच्या चाचण्या येत्या वर्षभरात होतील, त्यानंतर लष्करातर्फे त्याच्या चाचण्या घेतल्या जातील आणि नंतरच ते संरक्षण दलांत दाखल होईल. देशाला हे सामथ्र्य प्राप्त करून देणाऱ्या इस्रो आणि डीआरडीओ या दोन्ही संस्थांच्या संदर्भातील वाद मध्यंतरी चव्हाटय़ावर आला त्या वेळेस केंद्र सरकारने अतिशय गलथान पद्धतीने तो हाताळला, ही खेदजनक आणि दुर्दैवी बाब होती. भारतीय लष्कराच्या संदर्भातही याच प्रकारच्या गलथान हाताळणीचा प्रत्यय देशाला आला. केंद्र सरकारची हाताळणी ही त्यांची आणि पर्यायाने देशाचीही लक्तरे वेशीवर टांगणारी होती.संरक्षणाच्या क्षेत्रावर एक मळभ दाटले होते. ते मळभ दूर होण्यासाठी भव्य-दिव्य असे काहीतरी गरजेचे होते. ते मळभ यशस्वीरीत्या भेदण्याचे महत्त्वाचे कार्यअग्नी-ने केले आहे

गोळीच्या वेगापेक्षाही भन्नाट वेगाने लक्ष्य साधणार

No comments:

Post a Comment