मागासवर्गीयांच्या हॉस्टेलचा भूखंड ‘साईप्रसाद’साठी लाटला सनदी अधिकार्यांचा आणखी एक ‘आदर्श’-सामनामुंबई, दि. २ (प्रतिनिधी) - आयएएस, आयपीएस अधिकार्यांच्या वांद्रे (पूर्व) येथील १० मजली साईप्रसाद सोसायटीला देण्यात आलेला भूखंड हा मुळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी राखीव होता. तसेच बाजारभावाने सुमारे ८ कोटी इतक्या किमतीचा तो १४०३ मीटरचा भूखंड अधिकार्यांनी सरकारकडून अवघ्या ५७ लाख रुपयांत लाटला, असे आता उजेडात आले आहे.मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष, आमदार कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी फ्लॅटस्मुळे प्रकाशझोतात आलेली ‘साईप्रसाद सोसायटी’ ही आदर्श घोटाळ्याची तंतोतंत दुसरी आवृत्ती ठरली आहे. मूळचे आरक्षण नजरेआड करून २००३ साली भूखंड वितरित करण्यात आलेली ‘साईप्रसाद’ सोसायटी ही सीआरझेड नियमाप्रमाणे लागू असलेली बांधकाम मनाई धुडकावून उभी राहिलेली आहे.मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री कृपाशंकर सिंह, त्यावेळचे जिल्हाधिकारी सी. एस. संगीतराव, निवासी उपजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर या तिघाचेही ‘साईप्रसाद’मध्ये फ्लॅटस् आहेत. संशय बळावणार्या या योगायोगावर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची नजर खिळली. नंतर त्यांनी राज्य सरकारकडूनच मिळवलेल्या माहितीमधून साईप्रसाद सोसायटीचे पोलखोल झाले आहे.उज्ज्वल निकम बचावले!साईप्रसाद सोसायटी नियोजित असताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचेही नाव सभासदांमध्ये होते. २००२ साली जिल्हाधिकार्यांकडील पात्र सभासदांच्या यादीत त्यांचा समावेश होता. पण नंतर केवळ निकम यांचेच प्रकरण विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले. तिथे निकम यांना अपात्र ठरवून त्यांचे नाव बाद करण्यात आले. पण आता ‘बरे झाले, साईप्रसादमध्ये फ्लॅट मिळाला नाही’, असे त्यांना वाटू लागले आहे.इतर सभासद
१) हिमांशु रॉय, आयपीएस २) किशोर गजभीये, आयएएस ३) बिपीनकुमार सिंग, आयएएस ४) अजितकुमार जैन, आयपीएस ५) हेमंत कोठीकर, सहआयुक्त, सेंट्रल एक्साईज ६) अविनाश ढाकणे, मुख्यमंत्र्यांचे माजी पीए. ७) एच. के. जावळे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी
- ‘आदर्श’ कनेक्शन
‘आदर्श टॉवर’ मार्गी लागत असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जयराज फाटक होते. ‘आदर्श’मध्ये त्यांच्या मुलाचा फ्लॅट असून फाटक यांनी ‘साईप्रसाद’मध्ये फ्लॅट मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांचे पूर्वी सचिव असलेले सी. एस. संगीतराव यांच्या मुलाचाही ‘आदर्श’मध्ये फ्लॅट आहे. त्यांनी ‘साईप्रसाद’मध्ये आपली मुलगी आणि भावाच्या नावे फ्लॅट मिळवला आहे. ‘आदर्श’ उभी राहत असताना बेस्टचे महाव्यवस्थापक असलेले स्वाधीन क्षत्रिय यांचाही ‘साईप्रसाद’मध्ये फ्लॅट आहे.भाजीवाला, शिपाई फ्लॅटचे धनी
‘साईप्रसाद’मध्ये कृपाशंकर सिंह यांचे मेहुणे सुरेंद्रप्रताप यांचा तर फ्लॅट आहेच. पण रमा शंकर पांडे हे सभासदही त्यांचेच गाववाले असून नवी मुंबईत ‘भाजीवाले’ असल्याचे त्यांनी दाखवले आहे. तर अभिमन्यू भोसले हा सभासद धुळ्याचा असून तो आर. आर. पाडवी हायस्कूलमध्ये शिपाई आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न ५५ हजार रुपये असून त्याला महागडा फ्लॅट कसा परवडला हे कोडेच आहे

No comments:
Post a Comment