२६/११ नंतर पोलिसांसाठी करण्यात आलेल्या खरेदीत मोठय़ा प्रमाणावर घोटाळा झाला लष्करासाठी झालेली ट्रक खरेदी गाजत असतानाच २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांसाठी काही उपकरणांची खरेदी ही अवाजवी दराने करण्यात आल्याची कबुली गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत दिली. आबांचा रोख हा नक्की कोणावर होता, याचेच अंदाज मग बांधले जाऊ लागले. दुसरे सांगलीकर आणि तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यासाठीच आबांनी एवढी कणखर भूमिका घेतली नसेल ना, याचीच चर्चा मग सुरू झाली. गृह खात्यावरील मागण्यांच्या चर्चेत भाग घेताना भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी, २६/११ नंतर पोलिसांसाठी करण्यात आलेल्या खरेदीत मोठय़ा प्रमाणावर घोटाळा झाला असून, काही पुरवठादारांनी त्यात फायदा उकळण्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या आधुनिकीकरणाकरिता ही खरेदी करण्यात आली. पण काही उपकरणे ही बंद पडली आहेत. काही खरेदी ही चढय़ा दराने झाल्याचेही फडणवीस यांचे म्हणणे होते. उत्तरात आर. आर. पाटील यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप मान्यच केले. काही उपकरणे वा शस्त्रांची खरेदी चढय़ा दराने करण्यात आली होती. पोलिसांसाठी बेल्ट हे बाजारात ३०० रुपये दराला उपलब्ध होत असताना तीन हजार रुपये दराने एक नग खरेदी करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांसाठी ह्याच बेल्टसाठी १० हजार रुपयांचा दर लावण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बॉम्ब निकामी करण्याकरिता लागणारी जॅकेटची खरेदी ही चढय़ा भावाने झाली होती. या संदर्भात अगरवाल नावाच्या पुरवठादाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. दिवेआगार येथे झालेल्या गणेश मूर्तीच्या चोरीप्रकरणी पोलिसांना दोष दिला जात आहे. पण रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या गणपती मंदिराच्या विश्वस्तांना बोलावून सुरक्षेसाठी कोणते उपाय योजावेत या संदर्भात सूचना केल्या होत्या. पण विश्वस्तांनी शासनाच्या सूचनांचे पालन केले नाही. मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या दोन सुरक्षा रक्षकांपैकी एकाचे वय ७२ तर दुसऱ्याचे वय ६९ होते, असेही पाटील यांनी सांगितले. शिर्डी, सिद्धिविनायक या देवस्थानांना धोका असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिल्याने पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मोठय़ा मंदिरांना सुरक्षा दिली जाईल, पण सर्वच मंदिरे अथवा पुतळ्यांना संरक्षण देणे शक्य होणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. वादग्रस्त पोलीस अधिकारी मनोज लोहार हे सध्या फरारी असून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पत्नीच्या नावे असलेल्या सदनिकेमध्ये कुंटणखाना चालविला जात असल्याचे आढळून आल्याने मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नंदकुमार चौगुले यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा पाटील यांनी केली. तसेच त्यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खटला भरण्याकरिता परवानगी मागण्यासाठी पाठविण्यात येणारे प्रस्ताव मंजूर करण्यात मंत्रालयात विलंब लागल्याचे पाटील यांनी मान्य केले. ही सर्व प्रकरणे पुढील दीड महिन्यांमध्ये निकालात काढली जातील. तसेच भविष्यात अशा प्रकरणांकरिता कालमर्यादा निश्चित केली जाईल. या वेळेत मंजुरी न मिळाल्यास ती मिळाल्याचे गृहित धरून खटला भरता येईल, असेही पाटील यांनी सांगितले. कृपाशंकर सिंग यांना वाचविण्याचा सरकारकडून करण्यात येणाऱ्या विलासरावांकडून रक्कम वसूल करावी. सानंदा सावकरी प्रकरणी विलासराव देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला होती. ही दंडाची १० लाख रुपयांची रक्कम राज्य शासनाने भरली होती. ही रक्कम देशमुख यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी केली. पोलीस दलात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असून, नवीन बोलेरो गाडी पोलीस स्थानकाला मिळविण्याकरिता वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात, असा आरोप मनसेचे राम कदम यांनी केला. पोलिसांच्या बदल्यांना सातत्याने ‘मॅट’ कडून स्थगिती दिली जाते. यामुळेच मॅट रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केली
No comments:
Post a Comment