Total Pageviews

Monday 16 April 2012

रणझुंजार
THIS BOOK IS DEDICATED TOलेखक
पत्रानुवाद
साहाय्यक
: शिवाजी रसाळ: कॅप्टन अरुण करकरे: डॉ. ईश्वरी करकरे
INTRODUCTION ENGLISH CHAPTERS BY BRIG HEMANT MAHAJAN,YUDHHA SEVA MEDAL
रणझुंजार
कॅप्टन अशोक करकरे
लेखक : शिवाजी शंकर रसाळअर्पण....भारताच्या स्वातंत्र्यासाठी1857
एकोणिसशे सत्तेचाळीसपर्यंत
पासून ते पंधरा ऑगस्ट..त्यानंतर हैद्राबाद मुक्तीसंग्राम,गोवा मुक्ती, भारत-चीन युद्ध,इंडो-पाक युद्ध1965 1971,श्रीलंका ऑपरेशन पवन
याशिवाय
भारताच्या सीमेवर
दहशतवादी संघटना
,अतिरेकी यांच्याशी
सामना करताना
भारतमातेच्या संरक्षणार्थ
धारातीर्थी पडलेल्या
ज्ञात
-अज्ञात शहिदांना...वीरांना
समर्पण
... सैनिकांना....प्रस्तावनाभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
1971
1971 पासून देशाला पाकिस्तान बरोबर तीन वेळा युद्ध करावे लागले.मध्ये आजच्यासारखी मीडिया टेक्नॉलॉजी नव्हती. त्यामुळे 1971च्या युद्धाची खरी गाथा मिळणे फारच कठीण ठरले आहे. तसेचे कित्येक जवानांची वीरगाथा कुठल्याकुठे हरवून गेली आहे.अशा या वस्तुस्थितीत श्री. अरुण करकरे, कॅप्टन अशोकचे वडील बंधू ह्यांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक लिहिण्याचे ठरविले आहे. हे पुस्तक म्हणजे कॅप्टन अशोक व सर्व भारतीय वीर जवानांना श्रद्धांजलीच आहे.चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या युद्धाचे सगळे तपशील (वॉर डिटेल्स) वगैरे मिळविणे फारच कठीण ठरले आहे. तरी पण देवावर विश्वास ठेवून त्यांनी हे पुस्तक लिहून घेतले व आपल्या दिवंगत वीर भावाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. कॅप्टन अशोक जर हयात असते, तर त्यांनाही आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटला असता; त्यांनी म्हटले असते, ""तुम्हा सगळ्यांच्या "उद्या' करीता आम्ही जवानांनी आमचा "आज' दिला.''या पुस्तकामुळे पुढच्या पिढीला निश्चितच कळेल, की भारतीय जवानांनी देशाकरिता कशाप्रकारे स्वत:चे बलिदान केले.कॅप्टन अशोकने एका अशा कुटुंबात जन्म घेतला, की जिथे डिफेन्स बॅकग्राउंड होता. म्हणूनच त्यांनी स्वत: देखील आर्मीमध्ये प्रवेश घेतला.कॅप्टन अशोकने आपल्या हाताखालील सर्व सैनिकांना वाचविण्यासाठी स्वत:चे जीवन पणाला लावले व ते शहीद झाले. युद्धात वीरता, कुशलता आणि बलिदान यांची सांगड घातली जाते. कॅप्टन अशोकमध्ये हे सर्व गुण होते, यात काही अपवाद नाही, हे या पुस्तकात सांगितलेल्या कथांवरून सिद्ध होतेच; शिवाय सेनेच्या रेकॉर्डवरून पूर्णपणे खात्री होते.कॅप्टन अशोकची पत्नी श्रीमती वसु (अंजली) हिचे कौतुक प्रामुख्याने करायलाच हवे. तिच्या धैर्याला दाद दिलीच पाहिजे. इतक्या लहान वयात तिला हा गंभीर धक्का बसला. तिने आपल्या पतीला गमावले, तरी धीर न सोडता आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला योग्य तऱ्हेने वाढविले. तिचे नाव अर्चना. आज तीही एका भारतीय सेनेतल्या अधिकाऱ्याची पत्नी आहे.कॅप्टन अशोक करकरे आपल्यामध्ये शब्दरूपाने सदैव अमर राहतील ते या पुस्तकामुळेच
-
!ब्रिगेडियर, हेमंत महाजन (निवृत्त)

THE GALLANT OFFICERS & MEN OF
THE INDIAN ARMED FORCES
WHO LAID DOWN THEIR LIVES IN THE
SERVICE OF THE NATION.
MAY THEIR SOULS REST IN PEACE
IN THE GALLERY OF THE BRAVEST OF
THE BRAVE
कॅप्टन अशोक करकरे,VIR CHAKRA (P)1971WAR

No comments:

Post a Comment