रणझुंजार कॅप्टन अशोक करकरे भाग ४ ब्रिगेडियर, हेमंत महाजन (निवृत्त)ब्रिटिशांची राजनीती, तर देशाचे विभाजन करून! खरं तर पूर्ण स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध हिंदु-मुस्लिम एकत्र लढले. भारतातील इतर जातीजमाती सुद्धा मागे राहिल्या नाहीत. दिल्लीपासून भारतातील कानाकोपऱ्यात दूरवर अगदी आदिवासी गावपातळीवर स्वातंत्र्य चळवळ-उठावाचे लोण पसरले तेव्हा इंग्रजांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य देणे भागच आहे हे जेव्हा जाणवले तेव्हा त्यांनी हिंदु-मुस्लिमात फूट पाडण्याचे कुटिल कारस्थान केले. "फोडा आणि झोडा' ही ब्रिटिशांची राजनीती होती.ब्रिटिशांच्या कुटिल राजनितीला बहर आला. धर्माच्या नावावर देशभर हिंदु-मुस्लिमात दंगे, जाळपोळ, खून, लुटालूट सुरू झाली. ज्या ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध हिंदु-मुस्लिमांनी एकत्र प्रतिकार करून इंग्रज अधिकाऱ्यांना नामोहरण केले तेच हिंदु-मुस्लिम आता एकमेकांविरूद्ध लढत होते. प्रेतांचा खच पडत होता. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी जोर धरत होती. तत्कालीन राजकीय पुढारी सारेच अवाक् झाले, दिङ्मूढ झाले. गांधीजींनी उपोषणसुद्धा केले; पण सर्व व्यर्थ! शेवटी भारत, पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांत भारत दुभंगला गेला.स्वातंत्र्याचा उदय15 ऑगस्ट 1947! भारतीय स्वातंत्र्याची पहिली रम्य पहाट. पहिला सूर्योदय. कोटी-कोटी लोकांच्या मनात स्वातंत्र्य सुराज्याच्या मंगल कल्पना अंकुरल्या-फुलल्या-वाढल्या. दिडशे वर्षांच्या गुलाम बेड्या तोडून भारत स्वतंत्र झाल्याचा आनंद त्या काळी, त्या दिवशी, त्या वेळी लाख-लाख आम जनतेच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्वातंत्र्याचा आनंद गगनात मावेनासा होता. मुक्तीचे वारे "आसेतुहिमाचल'पर्यंत वाहत होते.अशोक चक्रांकित तिरंगा दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर, देशभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-कॉलेज मैदानांवर, चौका-चौकांत, गाव, घरांवर डौलाने फडकत होता, सलामी घेत होता, स्वातंत्र्य आणि भारतमाता यांच्या प्रेमभावनेच्या काव्यधारा ऐकत होता. त्यात बंकिमचंद्रांचे "वंदे मातरम्' आणि रविंद्रनाथ टागोरांचे "जनगणमन अधिनायक जय हे'! ही गीते अग्रणी होती.स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे "स्वतंत्रतेचे स्तोत्र' घरा-घरात म्हटले जाऊ लागले.वसंत बापटांची
"स्वातंत्र्याचा जयजयकार' सह "शिंग फुंकले रणी', "जय सुभाष', "भारता तव मुक्तीसाठी' तर ग. दि. माडगूळकरांचे "वेद मंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्' इ. अनेक गीते महाराष्ट्राच्या शाळा-कॉलेजातील तरुणाईच्या ओठांवर नाचू लागली.आझाद हिंद सेनेचे मार्चिंग सॉंग""कदम-कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा''आसमंतात घुमू लागले.सेनापती बापटांचे "नवहिंदराष्ट्र झेंडा' महाराष्ट्रभर गायले-ऐकले गेले.आप्पासाहेब पटवर्धनांनी भूपाळी म्हटली ती अशी
""
-ऊठ भारता, ऊठ झडकरी, अरुणोदय झाला,हा पहा अरुणोदय झाला,स्वातंत्र्याचा परम सुमंगल सुदिन आज उगवला!''स्वातंत्र्य कवी गोविंदाग्रजांनी
"""स्वातंत्र्याचा पाळणा' म्हटला. तो असा-बाळा जो जो रे। शुभदात्या। मनोहरा स्वातंत्र्या!''आचार्य अत्र्यांच्या ओव्या गावा
""-गावांत, घरा-घरात, जात्यावर गायल्या जाऊ लागल्या, त्या अनेकांपैकी एक-पहिली माझी ओवी गं। भारत मातेला।कुशीमध्ये जिच्या आम्हां। जन्मची लाभला।।''शाहिरांनी डफावर थाप मारून
""
"स्वातंत्र्याचा पोवाडा' सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमविला. शाहीर अमरशेखांचा "प्रणाम' गावोगाव पोहोचला. शाहीर गव्हाणकर डफावर थाप मारत ललकारले-उषा फाकली स्वातंत्र्याची,भेरी जडली संग्रामाची।''वासुदेवाने पहाट वाऱ्याबरोबर भारतमुक्तीचे गीत आळविले.कवी, कथा-नाटककारांनी स्वातंत्र्याचा इतिहास गायला, लिहिला. स्वातंत्र्य संग्रामातील शूर-वीर-अनाम वीरांना शब्दबद्ध केले. ते सुद्धा तिरंगा श्रवण करत होता.गाव-चावडी पारावर सुराज्य, रामराज्य, समृद्ध भारताच्या गप्पा-गोष्टींना धुमारे फुटू लागले.दिल्लीपासून गल्लीपर्यंत नेतृत्व करणाऱ्या छोट्या
""
-मोठ्या पुढाऱ्यांनी स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या-लढणाऱ्या सैनिकांना सलाम केला. अनाम वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली व मानवंदना दिली.अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत आहे...विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा...''यासम अनेक गीतांचे बोल निनादत होते, गूंजत होते. आकाशवाणी व प्रसार माध्यम ही या कार्यात सामील झाली होती.सारा भारत, भारत मातेच्या मुक्तीचे गुणगान आपापल्या बोली भाषेत गात होता.घोषणा
"
"
"-गर्जनात लहानांपासून थोरांपर्यंत संपूर्ण भारत दंग झाला होता. अभिमानाने मोठ्या आवाजात म्हणत होता-महात्मा गांधी की जय!'वंदे मातरम्!'भारत माता की जय!'आवाजात प्रचंड व्यक्तिप्रेम होतं
"", ध्वजप्रेम होतं, देशप्रेम होतं. एकता होती एकात्मता होती. हा आवाज जणू जगाला गर्जून सांगत होता.आ चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ....''ब्रिटिश हिंदुस्थान सोडून गेले खरे पण ते सरळ साधेपणाने नव्हे

No comments:
Post a Comment