Total Pageviews

Friday 10 June 2011

POLICE EDUCATION KILLING GIRL CHILD

पोलिस शिकणार स्त्री-पुरुष संबंधांतील संवेदनशीलता! मुंबई - कोल्हापूरमधील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या महिला पोलिसांवर झालेल्या लैंगिक अत्याचारासारख्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी नव्याने भरती होणाऱ्या पोलिसांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत "स्त्री-पुरुष संबंधांमधील संवेदनशीलता' शिकवली जाणार आहे. आगामी पोलिस भरतीपासून राज्यातील सर्व पोलिस प्रशिक्षण विद्यालयांत या संदर्भातील अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या विभागीय पोलिस प्रशिक्षण विद्यालयात महिला पोलिस शिपायांचा त्यांच्या वरिष्ठांनीच लैंगिक छळ केल्याचा, तसेच एका महिला पोलिसावर बलात्काराचा गंभीर प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणामुळे पोलिस खात्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. यापूर्वी, पोलिस दलात महिलांची संख्या मर्यादित असल्याने अशा घटनांचे प्रमाणही अतिशय कमी होते. यापुढील काळात पोलिस दलात महिला पोलिसांचे प्रमाण सातत्याने वाढते राहणार आहे. अनेक ठिकाणी महिला आणि पुरुष पोलिस बंदोबस्त अथवा अन्य कामानिमित्त एकत्र येतात. भविष्यात महिला पोलिसांच्या लैंगिक छळवणुकीचे प्रकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस दलात दाखल होणाऱ्या नव्या पोलिसांना त्यांच्या भरती अभ्यासक्रमातच, महिलांना सन्मानाने वागणूक द्यावी; तसेच त्यांच्याशी योग्य वर्तणूक कशी ठेवावी, याचे शिक्षण देणारा "स्त्री-पुरुष संबंधांमधील संवेदनशीलता' या विषयाचा अभ्यासक्रम राज्य महिला आयोगाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. राज्यातील सर्व पोलिस प्रशिक्षण विद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांनी दिली.
कोल्हापूर येथे पोलिस प्रशिक्षण विद्यालयातील महिला पोलिसांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची गंभीर दखल घेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस अधीक्षक यशस्वी यादव यांची बदली, तर उपअधीक्षक विजय परकाळे निरीक्षक ज्ञानेश्‍वर मुंडे यांना निलंबित केले. बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला शिपाई युवराज कांबळे यालाही सेवेतून निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिस अधीक्षक मैथीली झा यांनीही त्यांचा अहवाल पोलिस महासंचालकांना नुकताच सादर केला.
अत्याचाराला बसणार पायबंद पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांनी सांगितले, की कोल्हापूर बलात्कार प्रकरणातील दोषी पोलिसांची खात्यांतर्गत चौकशी केली जात आहे. या चौकशीनंतरच त्यांच्यावरील कारवाईचे स्वरूप ठरविले जाईल. मात्र, पोलिसांना स्त्री-पुरुष नात्यातील संवेदनशीलता समजावी, यासाठी अभ्यासक्रमापासूनच त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. यामुळे तरी भविष्यात वर्दीतूनच होणाऱ्या अत्याचारांना पायबंद बसू शकेल
 
परळी येथे नाल्यात अर्भके सापडली
परळी - दक्षिणेची काशी समजली जाणारी वैद्यनाथाची पुण्यनगरी परळी येथील नाल्यात अर्भक सापडल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी पुन्हा तिथेच पिशवीत बंद करुन टाकून दिलेले अर्भक आढळले. गेल्या 15 दिवसात परळी शहराच्या गटारी, नाले आणि विहिरींनी अर्धवट व कुजलेली अर्भके सापडत असल्याचे भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंचचे बालासाहेब गित्ते सांगत आहेत. ही सर्व मात्र पोलिस व वैद्यकीय अधिकारी दोन दिवसांत केवळ दोनच अर्भके सापडल्याचे सांगत आहेत.
मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईहून वंशाच्या दिव्यासाठी अडून बसलेली अनेक जोडपी परळी दौ-यावर येतात. खुलेआम गर्भलिंगचाचणी आणि त्यानंतर गर्भपात यामुळे परळी शहर गर्भपातकेंद्रांचे गाव म्हणून कुख्यात झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये परळीच्या नाल्यांमध्ये सापडलेल्या मृत अर्भकांची संख्या चिंताजनक आहे. गुरुवारी परळी-तेलगाव रोडवरील संगम शिवारातील नाल्यात अर्भक सापडले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी पुन्हा त्याच ठिकाणी एका विहिरीत वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये टाकलेली चार अर्भकांची प्रेते कुजलेल्या अवस्थेत सापडली. शहरात अर्भके सापडल्याचा आकडा नऊर्पयत पोहचला आहे. एका कॅरिबॅगमध्ये अर्भकाचा मृतदेह तर तर अन्य कॅरिबॅगमध्ये बांगडय़ा, नवा कपडा, फुले असे साहित्य आढळून आले. त्यातही अर्भकांचे अवशेष असल्याचे नागरिक सांगतात.
महिनाभरापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील चार सोनोग्राफी सेंटर्सना सील ठोकण्यात आले होते तर काहींना नोटीसा दिल्या होत्या. मात्र यानंतर जिल्हाधिकारी बदलले आणि जिल्हा शल्यचिकित्सकही, कारवाई मात्र झाली नाही. आठ महिन्यांपूर्वी परळीच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या. वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशनकरून गर्भलिंग निदानाचे बिंग फोडले होते

No comments:

Post a Comment