Total Pageviews

Saturday 25 June 2011

ROAD ACCIDENTS SINGLE BIGGEST CAUSE OF DEATH

इकडे

तशीच शहरातील रस्त्यांवर बाईक्सने फिरणार्‍यांच्या डोक्यातही असते. मोटारसायकलच्या धडकेने कुणीतरी धडपडले, असा प्रसंग ठाणे, पुणे, नाशिकात रोज एकतरी घडतोच. काहीही दोष नसताना हाडे मोडून घेण्याची वेळ रस्ता ओलांडणार्‍यांवर येते, ती बेफाम वेगाने पळणार्‍या बाईक्सवाल्यांमुळे! चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्यामुळे होणारे अपघातही खूप आहेत. शहरातल्या वाहनांच्या कोंडीत तर अशा धडका होत असतात. त्यात फारसा वेग नसल्यामुळे गाडीचे थोडेफार नुकसान होऊन फारसा गंभीर अपघात होत नाही; पण हमरीतुमरीचे भांडण मात्र नक्की होते.दरवर्षी वाहनांची वाढणारी संख्या पाहता रस्ते कितीही मोठे झाले, तरी ते अपुरेच पडणार हे आता जागतिक सत्य आहे. परंतु मानवी चुकांमुळे होणारे अपघात हा खरा धोक्याचा सिग्नल आहे. हिंदुस्थानच्या रस्त्यावर अपघातात तासाला सुमारे 14 जणांचा मृत्यू होतो. दरवर्षीचा हा आकडा सुमारे एक लाख तीस हजार इतका चिंताजनक आहे. तर अपघातात जखमी होणार्‍यांची संख्या यापेक्षा तिप्पट आहे.खून, दरोडे, आगीत मरणार्‍यांपेक्षा अपघाती मृत्यू येणार्‍यांचे प्रमाण हिंदूस्थानातच जगात सर्वाधिक आहे. दरवर्षी मरणार्‍या एकूण लोकांपैकी 34.5 टक्के लोक रस्ते अपघातात मरतात. अपघाताची तात्कालीक कारणे वेगवेगळी असली, तरी मुळाशी आहे ते आपल्या देशात वाहतूक व्यवस्थापनाकडे राजकारणी आणि नोकरशहा फारसे लक्ष देत नाहीत. एरव्ही सामाजिक प्रश्‍नासाठी रस्त्यावर येणारे राजकीय पुढारी वाहतुक नियोजनाबाबत फारसे उत्सुक नसतात. आपल्या देशातील वाहनचालक परवाना देण्याच्यासिस्टीममध्ये असणार्‍या भ्रष्टाचारामुळे देखील लोकांचे बळी जातात. अपुरे शिक्षण, नियमांची नीट माहिती नसतानाही पैसे मोजले की लायसन्स हाती पडते. मग अश्यांच्या हाती स्टेअरिंग आले की तोमानवी बॉम्ब बनतो अन् कधी तरी फुटतो. पाण्याचे टँकर, वाळचे डंपर अशा वाहनांवर प्रशिक्षित नसलेले चालक सर्रास असतात. मात्र, सब चलता है किंवा परवडत नाही या सबबीवर सारे काही चालविले जाते. पंधरा दिवसांपूर्वी निगडी येथे पुण्याचे बांधकाम व्यावसायिक विमलकुमार जैन यांच्या मर्सिडीज्सह पाच दुचाकीस्वारांच्या मृत्यूस असाच पाण्याचा टँकर कारणीभूत ठरला. जैन आणि त्या दुचाकीस्वारांचा काहीही दोष नसताना टँकरने त्यांना मरणाच्या दारात लोटले. टँकरचालकाचा ताबा सुटला आणि धडकला असे अपघाताचे कारण नोंदवून पोलीसवेळ मारून नेतात; पण या व्यवस्थेवर कंट्रोल आणण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. आपल्या कुवतीपेक्षा जास्त वेगाने तो टँकर चालला म्हणून ताबा सुटला ना? मग दोषी कोण? टँकरचालक, की अप्रशिक्षित व्यक्ती टँकरवर नेमणारा त्याचा मालक, की भंगारावस्थेतला टँकर पाहताच कागदावर पासिंगचा शिक्का मारणारा आरटीओ अधिकारी... प्रश्‍न कित्येक आहेत. पण वेळ कुणाला आहे इथे? कारण तेच... तासाभरात पोचतोच!’ कुणाला कितीही घाई असली, कुणी कितीही बिझी असले तरी रस्ते अपघाताच्या या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पहावेच लागेल. मानवी चुकांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक असले तरी वाहतूक व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज त्याहून अधिक आहे. सार्वजनिक वाहतुकीची साधने निर्माण करतानाही लोकांची जागृती करण्याची गरज आहेच. दिल्लीची ब्लू लाईन ही जशी डेथ लाईन बनली होती. तशीच पुण्याची बीआरटी सुद्धा सुरुवातीला जीवघेणी ठरली होती. हे टाळण्यासाठी मार्गदर्शक गोष्टी व्हायला हव्यात. शहरांमध्येसुद्धा वाहतूककंट्रोल करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ नाही आणि जे आहे तेसापळे लावण्यातच वाक्बगार आहेत असे चित्र आहे. तरीसुद्धा मनुष्यबळाचा प्रश्‍न बिकटच म्हणावा लागेल. एकट्या नवी दिल्लीत ट्रॅफिक रूल तोडण्याचे गुन्हे तब्बल 14 कोटींच्यावर दरदिवशी घडतात आणि पोलीस यंत्रणा अवघ्या वीस हजार वाहनचालकांवर कारवाई करु शकते, असा अहवाल आहे. एकट्या दिल्लीतच नव्हे तर मुंबई, पुण्यासह देशातल्या सर्वच शहरात हेच विदारक चित्र आहे. पुरेसे मनुष्यबळ अथवा आधुनिक यंत्रणा नेमल्याशिवाय वाहतुकीला शिस्त येणार नाही. मुंबई पोलिसांनी मद्यधुंदीत वाहने चालविण्याचे प्रमाण जितकेकंट्रोलमध्ये आणलेले आहे तितकेच इतरही शहरात व्हायला हवे. कारण बेशिस्तीने चालणारा माणूस असो कि वाहन, अखेर ते धडकणारचपुण्यातल्या पाट्या जितक्या प्रसिद्ध आहेत तितकीच वाहनचालकांची बेशिस्तहीफेमस आहे. म्हणूनच वैकूंठ स्मशानभूमीच्या प्रवेशदाराशीच एक भली मोठी पाटी लिहिलेली आहे ती अशी: ‘वाहतुकीचे नियम पाळा, इकडे यायचे टाळा.’ वाहतुकीच्या शिस्तीचे महत्त्व सांगणारी हि पाटी फक्त पुण्यात असली तरी देशातल्या सर्व वाहनचालकांना ती लागू आहे.- अरुण निगवेकर
यायचे टाळा
पुण्यातल्या पाट्या जितक्या प्रसिद्ध आहेत तितकीच वाहनचालकांची बेशिस्तहीफेमस आहे. म्हणूनच वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशदाराशीच एक भली मोठी पाटी लिहिलेली आहे ती अशी: ‘वाहतुकीचे नियम पाळा, इकडे यायचे टाळा.’
हॅलो... आत्ता मी सायनला आहे, पोहोचतोच दोन तासात...हो हो नक्की भेटू! असा मोबाईलसंवाद आता नेहमीचाच आहे. मुंबईतून उपनगराकडे काय, नाहीतर मुंबई-पुणे काय, आपण प्रवासाला लागलो की लगेच किलोमीटर तासाचेएस्टीमेट काढायला लागतो. तीन तासात आलो, चार तासात आलो, अशा काळ-वेळाच्या गणितात कधीकधी काळाच्या पडद्याआड जाण्याचा प्रसंगही ओढवतो.रस्त्यावर होणार्‍या अपघातांचे सद्याचे वाढते प्रमाण पाहिले, तर रस्ते, उड्डाणपूल, वळणे यांचे सदोष बांधकाम तर जबाबदार आहेच; परंतु नव्वद टक्क्याहून जास्त अपघातांचे कारणअतिवेग हेच म्हणावे लागेल. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा अर्धातास आधी निघाले, तर स्वत:सह आणखी पाचसहा लोकांचा जीव धोक्यात लोटणारा वेग गाठावा लागणार नाही. काही बेदरकार, बेजबाबदार वाहनचालक तर निव्वळ एकशेवीस, दिडशेची बढाई मारण्यासाठी ऍक्सिलेटर पिळतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तरएसयुव्हीसारख्या मोठ्या गाड्यांमध्ये क्रॉसकंट्री रेससारखी स्पर्धा असते. इथेही तोच नियम, ज्याची ताकद जास्त तो जास्त वेगाने जातो; पण कशासाठी...? प्रवासाचा अर्धातास वाचविण्यासाठी आयुष्य कशाला पणाला लावायचे? वेगाची ही नशा एक्स्प्रेसवेर जशी असते

No comments:

Post a Comment