Total Pageviews

Tuesday 21 June 2011

CORRUPT CBI IN GOVT INTEREST

"सीबीआय इमानदार नसणं हे सरकारच्या हिताचे'
(पीटीआय)
Tuesday, June 21, 2011 AT 03:45 PM (IST)

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) केंद्र सरकार जाणीवपूर्वक लोकपाल विधेयकाच्या कक्षेबाहेर ठेवत असल्याचा आरोप नागरी संघटनेच्या अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) केला. राजकीय विरोधकांवर कधीही दबाव आणता येईल, यासाठीच सरकारने सीबीआयला राखून ठेवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

""सरकार ज्यावेळी संकटामध्ये सापडेल त्यावेळी मुलायम सिंग यादव अथवा मायावती यांच्यासारख्या नेत्यांविरुद्ध सीबीआयचा वापर केला जाईल. सीबीआय ही संस्था इमानदार नसणं हेच सरकारच्या हिताचे आहे. राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि स्वत:च्या लोकांविरुद्ध असणारे खटले दाबून टाकण्यासाठी सीबीआयचा वापर केला जाईल,'' असे केजरीवाल म्हणाले.

सीबीआय ही संस्था सुरक्षा अथवा गुप्तचर खात्याचे(रॉ)  काम करत नसल्याचे केजरीवाल यांनी यावेळी निदर्शनास आणले. राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर खात्यास माहिती अधिकाराच्या कायद्यामधून वगळण्यात आले आहे

No comments:

Post a Comment