Total Pageviews

Saturday 25 June 2011

ADARSHA INQUIRY MAKING AFOOL OUT OF INDIAN PUBLIC

ALL DOCUMENTS WILL VANISH WHICH ARE REQUIRED TO CATCH GUILTY
NOTHING WILL COME OUT OF INQUIRY
आदर्शचे आता दोन नकाशे गायब
कुलाब्यातील 'आदर्श' सोसायटी प्रकरणाशी संबंधित फायलीतील काही पाने गहाळ झाल्याच्या प्रकारानंतर आता या जागेबाबतचे दोन नकाशेच गायब असल्याची धक्कादायक बाब चौकशी आयोगापुढील सुनावणीत पुढे आली आहे.
या सोसायटीच्या जागेसह अन्य मंजुरी प्रक्रियेबाबत नगरविकास खात्यातील फायलीतील काही पाने गहाळ झाली होती. त्यानंतर केंदीय पर्यावरण खाते लष्कराच्या मुंबई मुख्यालयातून काही कागदपत्रे गायब झाली. आता नकाशे गायब होण्याची ही चौथी घटना आहे. आयोगाचे ज्येष्ठ अॅड. दीपन मर्चंट यांनी शहर जमीन सवेर्क्षण अधीक्षक संजय ढिकले यांची उलटतपासणी घेतली. त्यात ढिकले यांना १८४७ १८८२ या वर्षातील नकाशे सादर करण्यास सांगण्यात आले असता त्यांनी त्याऐवजी मुंबईच्या सात बेटाबाबत १६७२ या वर्षातील नकाशा सादर केला. मात्र १८४७ १८८२ या वर्षांचे नकाशे कार्यालयात नसल्याची माहिती त्यांनी दिली. अन्य नकाशे उपलब्ध असताना केवळ 'आदर्श'च्या 'ब्लॉक सहा' या जागेसंबंधीचे नकाशे सापडत नसल्याने त्यात बहुधा कुणाचा हात असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या दाव्यानुसार, आदर्श'ची इमारत ज्या ठिकाणी आहे ती जागा १९७३मध्ये पाण्याखाली होती. मात्र ती जागा ब्रिटिश काळापासून लष्कराच्या मालकीची असल्याचे संरक्षण खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आता १८४७ १९८८२ या वर्षातील नकाशे गायब झाल्याने 'आदर्श'च्या जागेच्या मालकीचा वाद आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.
सील बँक खात्याविरुद्ध दाद
दरम्यान 'आदर्श' सोसायटीने त्यांचे बँक खाते सीबीआयने गोठविल्याविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे. त्यावर उभयबाजूचा युक्तिवाद होऊन सुनावणी जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे

No comments:

Post a Comment