Total Pageviews

Sunday 26 June 2011

Hi,
The  ever-inspiring & wonderful story of Baji Prabhu Deshpande at Pavan Khind as penned in a poem by कविश्रेष्ठ कुसुमाग्रज :
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शिरी
    दिसू लागले अभ्र सभोती
    विदीर्ण झाली जरी हि छाती
    अजून जळते आंतरज्योती
    कसा सावरू देह परी  
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शिरी
    होय तनुची केवळ चाळण
    प्राण उडाया बघती ज्यातून 
    मिटण्या झाले अधीर लोचन 
    खड्ग गळाले भूमीवरी 
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शिरी
    पावनखिंडीत पाउल रोउन
    शरीर पिंजेतो केले रण
    शरणागतीचा अखेर ये क्षण
    बोलावशील का आता घरी
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शिरी
 
You can hear Lata's rendering of this lovely song at:  http://www.youtube.com/watch?v=ग्ख़९एव्क
 

No comments:

Post a Comment