Total Pageviews

Wednesday 22 June 2011

MHADA HELPS BUILDERS

म्हाडाचे कर्तृत्व(?)राज्यातील जनतेला परवडणाऱ्या किमतीत घरे बांधून देण्याच्या उद्देशाने १९७७ साली महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपम अॅथॉरिटी अर्थातम्हाडाचा जन्म झाला, परंतु आता ३४ वर्षांनंतर आपले मूळ उद्दिष्ट गाठणे तर दूरच राहो, पण सर्वसामान्य जनतेसाठी घराचे स्वप्न पाहणेच दुष्कर व्हावे इतपत तिने आपल्या कर्तृत्वाचा तळ गाठला आहे.
म्हाडाने आपल्या संकेतस्थळावर गेल्या ३४ वर्षांत आपण किती कुठे घरे बांधली याचा तपशील दिलेला आहे. एकापरीने आपल्या अपयशाचा कबुलीजबाबच तिने यातून दिलेला आहे. कारण १९७७ ते २०१० या कालावधीत वर्षाला ,०५९ घरे या कूर्मगतीने तिने निवासी गाळ्यांचे बांधकाम केलेले यात दिसत असून त्यातील ,६८३ घरे निव्वळ मुंबईतच बांधली गेली आहेत, असे आकडेवारी सांगते. म्हाडाने ३४ वर्षांत साधारणपणे दोन लाख सहा हजार घरे बांधलेली आहेत.
त्यातील ६० टक्के म्हणजे सव्वा लाख घरे मुंबई शहर उपनगरात मिळून बांधली आहेत आणि अवघी ७७,५९४ घरे उर्वरित महाराष्ट्रात बांधली आहेत. मुंबईकरांच्या गरजेच्या तुलनेत म्हाडाच्या घरांची ही संख्या नगण्य आहेच, पण मुंबईलगतच्या ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या छोट्या शहरांकडे तिने साफ दुर्लक्ष केले आहे.
उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यात वर्षाला ९३ घरांच्या सरासरीने फक्त ,३११ घरे बांधली आहेत. या सर्व ठिकाणी मोकळे भूखंड उपलब्ध असताना आणि नागरी कमाल जमीन धारणा कायद्यान्वये अनेक भूखंड ताब्यात घेण्याची संधी असतानाही म्हाडाने या ठिकाणी आपल्या निष्क्रियतेचेच दर्शन घडविले. परिणामी या शहरांत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या अनधिकृत बांधकामे उभी राहिली. गृहनिर्माण खात्याला बराच काळ इसाक जामखानवाला, जावेद खान, छगन भुजबळ यांसारखे मुंबईचेच मंत्री लाभल्याने म्हाडाने मुंबईवर विशेष कृपादृष्टी दाखवली असावी, असा अंदाज केला तरी मुंबईतील अनेक प्रकल्पांची कामे रेंगाळत ठेवून खाजगी प्रकल्प वाढीला लागण्यास, एकूण जागांचे भाव वाढण्यास बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यास म्हाडाने अप्रत्यक्षपणे मदतच केली आहे.
त्यामुळे म्हाडा घरांची समस्या सोडविण्यासाठी आहे की ती अधिक तीव्र करण्यासाठी, हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे

No comments:

Post a Comment