Total Pageviews

Thursday 23 June 2011

GODMAN & INDIANS

बाबा बाबा सब कोई कहे...’ Nasik(24-June-2011) Tags : Editorialमानवी जीवन सदैव अस्थिरतेने अनिश्‍चिततेने झाकोळलेले असते. कोणतेही युग किंवा पौराणिक वा ऐतिहासिक काळ, किंबहुना एखादा छोटासा कालखंडदेखील त्याला अपवाद नाही. साहजिकच दैववाद किंवा नशिबावर हवाला ठेवण्याची माणसाची प्रवृत्तीदेखील सनातन आहे. प्रत्येकाला कोणता ना कोणता आधार आवश्यक वाटू लागतोे. विवेकी माणसे तर्क बुद्धीची कसोटी लावून आधार शोधतात, तथापि बहुसंख्य सामान्यांचा विवेक तितका जागृत नसतो. त्यामुळे बाबालोकांचे प्रस्थ सार्वकालिक आहे. कोणत्याही संतवाङ्‌मयात भोंदू बाबांच्या दांभिकतेवर नि:संदिग्ध शब्दात कोरडे ओढलेले आढळतात. तरीही प्रत्येक काळात अनेक बाबा निर्माण होतच राहतात. उच्च विद्या विभूषित अनेक विद्वानसुद्धा कोणत्या ना कोणत्या बाबाच्या भजनी लागलेले दिसतात. ‘नवसे कन्या पुत्र होती| तरी का करणे लागे पती॥ अशा शब्दात संत तुकराम महाराजांनी बाबा मंडळींची खिल्ली उडवली आहे. लोकांची अंधश्रद्धा तोडण्यासाठीच इतक्या कडक आणि भडक शब्दांचा वापर संतांनी केलेला आहे, हे स्पष्टच आहे. तरीही माणसांची अंधश्रद्धा काही कमी होत नाही. त्यांना कुठला ना कुठला बाबा लागतोच. मग कधी बंगाली बाबा तर कधी एखाद्या दैवताचे नाव घेणारा बाबा! कधी हातातून सोन्याच्या अंगठ्या काढणारा किंवा कुंकू वा राखुंडी काढणारा बाबा लोकांवर गारुड घालतो. त्या अंधश्रद्धेतून भारतातले सगळ्यात मोठे कॉलगर्लचे रॅकेट चालविणारा भीमानंदी महाराज आणि आंध्रमध्ये सेक्स रॅकेट चालवणारा महाराजही पैदा होतो. काही महाराजांच्या आश्रमात काळी जादू केल्याचे आरोप होतात. त्यातील बालकांच्या संशयास्पद मृत्यूवरून वादळ उठते. परंतु हे सारे क्षणिक ठरते. तेवढ्यापुरता गदारोळ होतो. बाबांचा धंदा पुन्हा पूर्ववत तेजीत चालू राहतोे. दक्षिणेत तर स्वत:ला कल्की अवतार म्हणवून घेणारा एक बाबा त्याची बायको प्रचंड मोठे आश्रम चालवतात.केवळ भारतीयच नव्हे तर जगातील अनेक देशातून अशा बाबांना शिष्यवर्ग मिळतो. त्यांच्या धार्मिक अध्यात्मिक दुकानांची भरभराट होतच राहते. चंद्रास्वामी आणि धीरेंद्र ब्रह्मचारी असे व्हीव्हीआयपी बाबाही पैदा होतात. सध्या सत्य साईबाबांचा ट्रस्ट त्याचे ट्रस्टी मालमत्तेच्या वादामुळे गाजत आहेत. बाबांच्या कुलूपबंद खासगी दालनात अब्जावधीच्या मालमत्तेचा नुकताच जाहीर पंचनामा झाला. पण तेवढ्यावर थांबले नाही. नुकत्याच ३५ लाखांच्या नोटा ट्रस्टच्या एका खासगी कारमधून जप्त करण्यात आल्या. त्या मागोमाग एका प्रवासी बसमधून पाच कोटी रुपयांच्या नोटा भरलेली पोती पोलिसांच्या हाती लागली आहेत. धर्माच्या नावाने चाललेला हा अधर्म आणि अर्थसंचय अंधश्रद्धाळूंच्या कृपेने तथाकथित बाबा जमवत राहतात. हे देखील समाजाचे शोषणच नाही का? ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हे रोज घोकणारेदेखील कुणाच्या ना कुणाच्या भजनी लागलेलेच असतात.


No comments:

Post a Comment