Total Pageviews

Monday 27 June 2011

MAHARASHTRA POLICE IN TOP FIVE IN CRIME

भ्रष्टाचारात पोलीस 'टॉप ' मध्ये
मटा ऑनलाइन वृत्त मुंबई
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र पोलिसांविरूद्ध तब्बल २१ हजार गुन्हे नोंदवण्यात आले असून , बलात्कार , अंडरवर्ल्डशी संबंध , खंडणी , तुरूंगातील मृत्यू , खोट्या चकमकी अशा विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पोलीसटॉप मध्ये पोहोचल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
२००६ ते २०१० या पाचवर्षांत २१ हजाराहून अधिक गुन्हे केवळ पोलिसांवर दाखल करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातील माहितीतून समोर आले आहे. या अहवालानुसार मध्य प्रदेश पोलिसांचा गुन्हेगारीत प्रथम क्रमांक असून ९३ , ७१० गुन्हे त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आहे. तर उत्तर प्रदेश दुस-या क्रमांकावर असून ३४ , ३६४ गुन्हे येथील पोलिसांविरुद्ध नोंदवण्यात आले आहे. त्याखालोखाल दिल्ली , पंजाब आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी आणि सुशिक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. तसेच येथील गुन्हेगारांवर पोलिसांचा जबर वचक असल्याचे म्हटले जात होते. मात्र या अहवालानंतर रक्षकच भक्षक बनत असल्याचे सत्य उघड झाले आहे. मध्य प्रदेशचे पोलीस संख्याबळ ७७ , ६१६ इतके आहे. तर उत्तर प्रदेशचे लाख ७०० हजार आहे. दिल्लीचे ५७ , ५०० तर पंजाब आणि महाराष्ट्राचे पोलीस बळ अनुक्रमे ३०हजार आणि लाख ८० हजार इतके आहे. प्रत्येक दहा हजार व्यक्तींमागे महाराष्ट्रात जवळपास १८ पोलीस येतात. अशा वेळी पोलिसांचा गुन्ह्यांत सहभाग असल्यास राज्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले नाही तर नवलच

No comments:

Post a Comment