Total Pageviews

Friday 10 June 2011

NCP CONVENTION FOR POOR & SOCIALLY BACKWARDS

राष्ट्रवादीच्या भाडोत्री गाड्यांमुळे मुंबईकरांची पाच तास कोंडी
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ठप्प
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - मागासवर्गीय, दलितांना सामाजिक न्याय्यहक्क मिळवून देण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने भरविलेल्या सामाजिक परिवर्तन हक्क परिषदेने मुंबईतील चाकरमान्यांचे आज बारा वाजवले. या परिषदेसाठी राज्यभरातून आणलेल्या भाडोत्री गाड्यांमुळे ठाणे, शीव, चेंबूर परिसरात वाहतुकीची पाच तास जबरदस्त कोंडी झाली. त्यामुळे मुंबईतील अनेक नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. काहींचा अर्धा दिवसही वाया गेला. मेळाव्याच्या यशाबद्दल सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या गौरवाने या ट्रॅफिकचा उल्लेख केल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला.चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादीची परिवर्तन परिषद होती. या परिषदेचे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी कमी असूनही केवळ गाड्यांमुळेच वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. परिषदेसाठी सुमारे पाच हजार गाड्या मुंबईत आणल्या गेल्या. बस, ट्रॅक्स, स्कॉर्पिओ अशा गाड्यांचा यात समावेश होता. या गाड्या सोमय्या मैदानाबाहेरील रस्त्यावर शीव, चुनाभट्टी, माटुंगा स्टेशन आणि आसपासच्या परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ठाणे ते शीव हे अंतर कापण्यासाठी तब्बल चार तास लागत होते. वाट्टेल तिथे लावलेल्या या गाड्यांमुळे शीव आणि माटुंगा स्टेशनबाहेर चालणेही मुश्किल झाले होते. दादरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प होती. कार्यक्रम आटोपल्यानंतरही गाड्या बाहेर काढण्यासाठी बराच उशीर होत होता. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडून अनेक ठिकाणी लोकांची आपापसांत बाचाबाचीही झाली. सर्वसामान्यांची अशी अवस्था असताना नेते मंत्र्यांच्या व्हीआयपी गाड्यांना मात्र रॉयल ट्रीटमेंट मिळत होती. त्यांच्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक इतरांना अडवून रस्ता मोकळा करीत होते.सत्तेच्या चावीने राष्ट्रवादीचा मेळावा या परिषदेसाठी काही कोटी रुपये उधळण्यात आल्याचे कळते. त्यातील सर्वाधिक खर्च गर्दी जमविण्यासाठी करण्यात आला. नांदेड, लातूर, नागपूरमधील लोकांसाठी ट्रेनमध्ये बोगी बुक करण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतून लोकांना आणण्यासाठी सुमारे २१ लाख रुपये खर्च करण्यात आले
 

No comments:

Post a Comment