WE ARE ONE OF THE MOST CORRUPT COUNTRIES IN THE WORLD.POLITICIANS
ARE THE FASTEST BECOMING WEALTHY COMMUNITY IN OUR COUNTRY
भ्रष्टाचाराने देशाला गरीब ठेवले
तुमची एखादी वस्तू हरवली, खिशातले पाकीट गेले. तुम्हाला वाटते की, ते चोरीला गेले. तुम्हाला वाटते, तक्रार द्यावी. अशा वेळी तुम्ही काय करता ?’
मी श्रोत्यांना विचारले.
श्रोत्यांमधून उत्तर आले.. ‘अर्थात पोलीस ठाण्यात जाऊ किंवा 100 नंबर फिरवून मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाची गाडी बोलावू.’
मी हा प्रश्न का विचारते याचे श्रोत्यांना आश्चर्य वाटत होते.
मी म्हणाले, अगदी बरोबर.
मग आता सांगा ! तुम्हाला कुणी लाच मागितली तर तुम्ही काय करता! लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे असे तुम्ही मानत असाल तर तक्रार नोंदवण्यासाठी कुठे जाता ? पोलीस कक्षाला फोन करता की 100 नंबर फिरवता ?
काय उत्तर द्यावे हे श्रोत्यांना उमगत नव्हते. काही जण म्हणाले की, आम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याकडे जाऊ.
मी पुन्हा विचारले, त्या खात्याचे कार्यालय कुठे आहे ? कुणाला ठाऊक आहे ? कुणी सांगेल ती जागा कुठे आहे ?
अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आणि बाबा रामदेव, श्री श्री रवी शंकर अशा अनेकांनी पाठिंबा दिलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील जनजागृती सभांमध्ये मी हा प्रश्न सातत्याने विचारते आहे.
रोजच्या जीवनात सर्रास सुरू या प्रश्नाकडे आपण गंभीरपणे लक्ष दिलेले नाही ही खरी समस्या आहे. कुणी लाच मागितली तर कुठे तक्रार करायची याची माहिती लोकांना नाही. ही माहिती जाहीरपणे सांगितलीही जात नाही. त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक जण लाच देतात किंवा घेतात. आपले काम करवून घेण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात हे आपल्याला छान ठाऊक आहे. पोलीस ठाण्यात साधी तक्रार द्यायची असेल तरी पैसे द्यावे लागतात हेही आपल्याला ठाऊक आहे आणि खुर्चीत बसलेला माणूस लाच घेणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानतो. वरचे पैसे मिळाले नाही तर काम कशाला करायचे अशी मानसिकता तयार झाली आहे. त्याला कशाचीही भीती नाही. आपली कुणी तक्रार करील, आपण पकडले जाऊ याचीही भीती नाही. कारण यंत्रणाच नाही. भ्रष्टाचाराची तक्रार आली तर लगेच हालचाल करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. 999 किंवा 111 नंबर फिरवताच धावून येईल अशी मोबाईल व्हॅन नाही.
कल्पना करा ! अशी यंत्रणा आपल्याकडे असती तर काय झाले असते ! लाच मागणार्या व्यक्तीची तक्रार लगेच मोबाईल फोनवर करता आली असती.
हे होत नाही. गेली 64 वर्षे हा देश भ्रष्टाचार सोसतो आहे. गेल्या काही वर्षात तर भ्रष्टाचार भयंकर वाढला आहे. सीमा राहिलेली नाही. प्रसार माध्यमे आणि जनहित याचिका घोटाळे खणून काढतात. चव्हाटय़ावर आणतात. भ्रष्टाचाराच्या रकमा काही शेकडय़ांमध्ये नाहीत तर हजारो आणि लाखो कोटी रुपयांमध्ये आहेत.
2 जी स्पेक्ट्रम किंवा राष्ट्रकूल घोटाळ्यातल्या रकमा आठवा! हे का होते? हे होते कारण आपण गुंतवणुकीचे दरवाजे तर उघडले. पण विकासाची फळे सामान्य जनतेला मिळतील याची खबरदारी घेणारी कायद्याची आणि प्रशासकीय यंत्रणा आपण निर्माण केली नाही. भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या चौकटीत अनेक पळवाटा आहेत..खटला बराच चालतो, साक्षीदार फोडले जातात, जामीन मिळवला जातो, तपासात काही दुवे कच्चे ठेवले जातात..अशा अनेक पळवाटा आहेत. त्यामुळे भ्रष्ट लोकांना पुन्हा सत्तेत येणे शक्य होते. परिणामकारक आणि कार्यक्षम यंत्रणा नसल्याने काही मूठभर लोकांच्या हाती संपत्ती आली आहे.
भ्रष्टाचाराने देशाचे मोठे नुकसान केले आहे. अनेकांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, औषधोपचार मिळाला नाही, दळणवळणाच्या पुरेशा सोयी होऊ शकल्या नाहीत, सामाजिक सुरक्षायोजना मागे पडल्या. हे सारे अनर्थ एका भ्रष्टाचारामुळे घडले. एक लक्षात घ्या. आपला देश गरीब नाही. भ्रष्टाचाराने देशाला गरीब ठेवले आहे.
अण्णा हजारे आणि सिव्हिल सोसायटीने जनलोक विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. या विधेयकामुळे भ्रष्टाचार्यांच्या सुटकेचे बहुतेक मार्ग बंद होतील. मंत्र्यापासून शिपायार्पयत, अधिकार्यापासून न्यायपालिकेर्पयत कुणाच्याही विरोधात तक्रार असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे असा आग्रह या विधेयकात आहे. भ्रष्ट आढळला तर कुणालाही दयामाया नाही असा याचा अर्थ आहे. सत्तेत बसलेल्या भ्रष्ट लोकांपासून सुटका करवून घ्यायची असेल तर जनतेने जागरूक राहिले पाहिजे. सत्ता गाजवण्यासाठी आपण लोकांना निवडून दिलेले नाही. लोकांच्या सेवेसाठी निवडून दिले आहे. त्यांच्यावर लक्ष असले पाहिजे. निवडणूक लागली की, हीच मंडळी तुमच्याकडे येतील आणि मते मागतील. पुन्हा सत्ता गाजवण्यासाठी ! त्यामुळे उशीर करू नका. चुका दुरुस्त करण्यासाठी आग्रह धरा. भ्रष्टाचाराच्या विरोधापासून सुरुवात करा.
-किरण बेदी(लेखिका या निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.)

No comments:
Post a Comment