Total Pageviews

Thursday 16 June 2011

NAXAL KIDNAP 40 LABOUR

एटापल्ली - तालुक्यातील सुरजागड पहाडीवर सुरु असलेल्या कामावरील कंत्राटदारासह 40 मजुरांना नक्षलवाद्यांनी मगंळवारी सकाळी ताब्यात घेऊन तब्बल 13 तासांर्पयत ओलीस ठेवल्याची घटना उजेडात आली आहे.
एटापल्ली- गेदा या मार्गावरील हेडरीपासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल या कंपनीच्यावतीने झाडे तोडणे व इतर काम मजुरांच्या मार्फतीने गेल्या दोन महिन्यांपासून करण्यात येत आहेत. या कामावर परिसरातील 150 मजूर काम करीत आहेत. मंगळवारी एटापल्लीचा बाजार असल्याने या कामावर केवळ 40 मजूर आले होते. दरम्यान, सकाळी येथे आलेल्या 150 ते 200 नक्षलवाद्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कंत्राटदारासह सर्वच मजुरांना ताब्यात घेऊन 4 किमी अंतरावरील पहाडीवर नेले. तेथे नेल्यानंतर त्यांची चौकशी केली व दिवसभर आपल्यासोबत ठेवले. त्यानंतर सायंकाळी परिसरातील गावातील नागरिकांना बोलावून सभा घेतली. सभेमध्ये पहाडीवर सुरु असलेल्या कामाला नक्षल्यांनी विरोध दर्शविला. सभेनंतर रात्री 11 वाजता सर्व मजुरांची सुटका करण्यात आली.

No comments:

Post a Comment