Total Pageviews

Wednesday 15 June 2011

ALL ON FACE BOOK FACE BOOK STATUS SYMBOL

तू एफ.बीवर नाहीएस’... थेंबभर पाण्यात जीव दे’ असा प्रेमळ सल्ला फेसबुकवर अकाऊंट नसलेल्यांना सर्रास दिला जातोय. कॉलेजमधल्या किंवा ऑफिसमधल्या ऍक्टिव्हिटीजवर गॉसिप करायला नाके-कट्टे याचबरोबर आता सोशल नेटवर्किंग साईटस् यंगिस्तानसाठी हॉट फेव्हरिट ठरत आहेत.
नुकत्याच सोशल बँकर वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंदुस्थानचे २७ कोटी युजर्स फेसबुकवर आहेत. त्यानुसार फेसबुकच्या वापरात हिंदुस्थान सहाव्या स्थानावर आहे. यावरून सोशल नेटवर्किंग साईटवरच्या या ई-कट्ट्यांना चांगलाच डिमांड असल्याचे दिसते. तुम्हाला प्रत्यक्षात किती मित्रमैत्रिणी आहेत यापेक्षा फेसबुक अकाउंटमध्ये किती फ्रेण्ड्स आहेत याच्यावर तुमचं स्टेट्स अवलंबून आहे. यामध्येही ग्रुप्स चॅटिंगचा ‘सिक्रेट’ पर्याय समोर आल्याने अनेक सेन्सॉर्ड विषयांवर येथे मुक्तकंठाने चर्चा केल्या जातात.
यू हॅव ५० न्यू नोटिफिकेशन्स, अमुक अमुक कमेन्टेड ऑन युअर पोस्ट, तमुक तमुक लाईक युअर लिंक अशा एक ना अनेक नोटिफिकेशन्सचा सतत भडिमार होत असतो. यात आता ग्रुप्स चॅटिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने आपला स्वतंत्र गु्रप फेसबुकवर नसणं म्हणजे यंग झोनसाठी जरा मानहानीचे प्रकरण. म्हणूनच कॉलेज ग्रुप्स, कार्यालयातील डिपार्टमेंटचे ग्रुप, क्लासरूम ते थेट नाका, कॅण्टीन, टपरी असे अनेक ई-कट्टे येथे हमखास आढळतात. या कट्ट्यांपेक्षा भन्नाट काही असेल ते इथल्या कट्टेकरींचे डिस्कशन! लेक्चरमध्ये घडलेल्या भन्नाट किश्श्यांपासून ते ऑफिसमधल्या बॉसच्या लूकपर्यंत मोठ्या चवीने येथे चर्चा केल्या जातात.
बेस्ट फ्रेण्डसारख्या असणार्‍या या सोशल नेटवर्किंग साईटची क्रेज दिवसेंदिवस यंगिस्तानमध्ये अगदी एखाद्या साथीसारखी पसरू लागली आहे. अगदी छोट्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातले ग्रुप येथे असतात. सिल्व्हर इनिंग, नाना-नानी, सीनिअर्स अशा अनेक नावांनी इथले ज्येष्ठ नागरिक ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे सर्वच जण रोजच्या बिझी शेड्यूल्डमधून थोडा वेळ काढून किमान तासभर तरी मोठ्या भक्तिभावाने फेसबुकचे दर्शन घेतात.
या ग्रुप्समधून होणारे गॉसिप्स इतरांपासून हाईड करता येत असल्यामुळे ही चर्चा सिक्रेट राहते. त्यामुळे प्रोफेसर्सचे इंग्लिश, ड्रेसिंग सेन्स, बोलण्याची स्टाईल अशा हलक्या फुलक्या विषयावर इथे खुलेआम कॉमेण्ट्सपासून नोटस्, प्रोजेक्टस्, असाईनमेंटस्, राजकारण, अर्थकारण, पब्लिक पॉलिसी असे हाय फंडू सब्जेक्ट मोठ्या आनंदाने चघळले जातात.
त्यामुळे फेसबुकवर तुमचे अकाऊंट नसेल तर लगेच लॉग इन् करा.
- फेसबुक पी. जे.
मुलगा : मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.
मुलगी : तू तुझा जीव धोक्यात घालशील?
मुलगा : हो नक्की...
मुलगी : ‘फेसबुक’वरलं अकाऊंट डिलिट करशील?
मुलगा : जा गं, घरी जा... तुझे आईबाबा वाट बघत असतील?

- नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार जगातील लोकसंख्येची क्रमवारी अशी आहे -
तिसर्‍या क्रमांकावर - हिंदुस्थान
दुसर्‍या क्रमांकावर - चीन
आणि पहिल्या क्रमांकावर - फेसबुक

No comments:

Post a Comment