Total Pageviews

Thursday 16 June 2011

KEEP AWAKE POLICE ON DUTY ARE SLEEPING

लोकमत स्टींग ऑपरेशन : अजय डांगे / गजानन सरोदे)अकोला - शहरात चोर, घरफोडे, लुटारुंनी हैदोस घातला असताना नागरिक त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस किती जागरुक असतात, याचा आढावा घेण्याचा प्रयत्नलोकमत’ चमूने मंगळवारी रात्रभर फिरुन केला असता अत्यंत वाईट अन् धक्कादायक चित्र दिसून आले. काही मोजके भाग वगळता इतर मार्गांवर पोलीसच दिसत नव्हते. पोलीस चौकी, पोलीस ठाण्यात आणि एवढेच नव्हे तर गस्तीसाठी दिलेल्या व्हॅनमध्येही समाजाचे रक्षक चक्क घोरताना दिसले. पोलीस आपल्या रक्षणासाठी सक्षम आहेत, असा गोड समज करून निश्चिंत झोपणार्‍या अकोलेकरांसमोर रात्रीही सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही, हेच यावरून स्पष्ट होते.
पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठीलोकमत’ चमूने मंगळवारी मध्यरात्री 1 वाजतापासून पहाटे 5 वाजेपर्यंत शहरातील पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्यांचे स्टींग ऑपरेशन केले. जनता भाजी बाजारातील पोलीस चौकीपासूनलोकमत’ चमूने सुरू केलेली गस्त सिटी कोतवाली पोलीस स्टेशनवर संपली. या फेरफटक्यात केवळ पोलीस चौक्यांवरील कर्मचारीच नव्हे तर पोलीस स्टेशनमधील कर्मचारीही घोडे विकून झोपल्याचे निदर्शनास आले. पोलीस यंत्रणा निद्रेच्या आहारी एवढी गेली होती की, जवळ जाऊन त्यांचे फोटो काढले तरी त्यांना जाग आली नाही. बहुतांश पोलीस चौक्या बेवारस अथवा कुलूपबंद आढळल्या. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस यंत्रणा 24 तास सतर्क राहणे अपेक्षित आहे. मात्र, अकोला पोलीस रात्रीच्या वेळी किती सतर्क असतात, हे या मोहिमेत स्पष्ट झाले.झोपाळू पोलिसांची (कार्यक्षमता)
जिल्ह्यात गतवर्षी दरोडा, घरफोडी, लुटमार, चोरीच्या घटनांमध्ये एकूण चार कोटी 12 लाख 46 हजार 835 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असून, त्यापैकी केवळ एक कोटी तीन लाख 36 हजार 294 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शहर पोलिसांची गत तीन वर्षातील कामगिरी तर अगदीच सुमार असल्याचे पुढील तक्त्यावर नजर टाकल्यास दिसून येईल.
हजेरी लावा अन् घरी पळा
प्रत्येक पोलीस ठाण्यात रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले असते. या पोलिसांनी रात्री रस्त्यावर गस्त घालणे अपेक्षित असते. मात्र, काही कर्मचारी पोलीस चौकीत तर काही पोलीस ठाण्यात झोपा काढतात. काही बहाद्दर तर कुठेच नसतात. याबाबतलोकमत’ चमूने चौकशी केली असता, रस्त्यावर नसलेले हे कर्मचारी हजेरी लावून घरी झोपलेले असतात, अशी माहिती समोर आली. रात्री एखादी घटना घडली आणि वॉकीटॉकीवरून मॅसेज मिळाला, तरपोलीस ठाण्याच्या हद्दीत असून, अमूक—अमूक भागात गस्त घालत आहे, माहिती समजली, पाच मिनिटात पोहोचतो,’ अशी उत्तरे या बहाद्दर कर्मचार्‍यांजवळ तयार असतात.पोलिसांचाचक्का जाम’
रात्रीची गस्त परिणामकारकपणे होण्यासाठी पोलिसांना जीप, व्हॅन मोटारसायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्या गस्तीसाठी फिरवण्याऐवजी कर्मचारी एखाद्या गल्लीत उभ्या करून ताणून देत असल्याचे दिसून आले. संख्याबळ (शहरातील) - पोलीस अधीक्षक-1 अति. पोलीस अधीक्षक-1- सहा. पोलीस अधीक्षक-1- पोलीस निरीक्षक- 6- सहा. पोलीस निरीक्षक-5- उपनिरीक्षक- 15- रात्रपाळीतील कर्मचारी- 125
-
उपरोक्त संख्याबळ केवळ कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात किती कर्तव्यरत असतात, हा प्रo्नच आहे.पोलीस चौकींना टाळे..ल्ल लोकमतच्या मोहिमेत शहरातील काही पोलीस चौक्या कुलूपबंद तर काही बेवारस अवस्थेत आढळून आल्या. खालील चौक्यांना तर अक्षरश: कुलूप ठोकलेले होते.
-
भांडपुरा- भगतसिंग चौक(गवळीपुरा)- दगडीपूल- जठारपेठ- खोलेश्वर- सिंधी कॅम्प

No comments:

Post a Comment