Total Pageviews

Thursday 16 June 2011

MY ARTICLE ON EXTORTION BY NAXALS IN LOKPRABHA

http://www.loksatta.com/lokprabha/20110624/suraksha.htm

नक्षलींच्या बंदला हिंसक वळण
माओवादी नक्षलींचे नेते जगदीश मास्टर ऊर्फ जगदीश यादव याला अटक केल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. संशयित माओवादी बंडखोरांनी रेल्वे स्टेशन्सची जाळपोळ, पोलीस स्टेशनवर हल्ले आणि मोबाइल टॉवर स्फोटात उडवून दिले आहेत.
माओवाद्यांनी झारखंड, बिहार, उत्तर छत्तीसगढमध्ये २४ तासांचा बंद पुकारला होता. कोठी पोलीस स्टेशनवर नक्षलींनी हल्ला केल्यानंतर ठिकठिकाणचे सहा खासगी कंपन्यांचे मोबाइल टॉॅवर उडवून देण्यात आले. सशस्त्र माओवाद्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. सुरक्षारक्षक आणि माओवाद्यांमधील चकमकीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र बंडखोरांच्या पाठलाग करत पोलिसांनी गोळीबाराच्या फैरी झाडल्या, अशी माहिती एसपी रत्नमणी संजीव यांनी दिली.
पाटणा-गया विभागातील नदाऊल रेल्वे स्टेशनवर २५ नक्षलींनी हल्ला केला. त्यावेळी स्टेशन मास्तरसह रेल्वे कर्मचाऱ्यांना पकडून ठेवले होते. नक्षलींनी केलेल्या हल्ल्यामुळे सकाळी सुमारे चार तास रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. मोहम्मद गंज रेल्वे स्टेशनजवळील रुळाखालील स्लॅब काढून टाकल्याने रेल्वेसेवेवर परिणाम झाला. गया जिल्ह्यातील इमामगंज येथील दोन, दिबुरिया आणि धोबी येथील मोबाइल टॉवरही नक्षलींनी स्फोटात उद्ध्वस्त केले. यानंतर नक्षलींना पकडण्यासाठी परिसर पिंजून काढण्यात येत आहे.ब्रिगेडियर हेमंत महाजन
माओवाद्यांना देशाविरोधात कारवाया करायला अफू, गांजा यांच्या लागवडीच्या माध्यमातून अब्जावधी रुपये मिळतात. काही ठिकाणी हे माओवादी स्वत:च्या देखरेखीखाली अफूची लागवड करून घेतात. ही लागवड डोंगराळ भागात, दुर्गम ठिकाणी होते. तिथे पोहोचण्यासाठी त्यांच्या बाइक्सचे टायर्सही खास प्रकारचे असतात. अवैध खाणकाम, खनिज उद्योग यांच्या माध्यमातूनही त्यांना अमाप पैसा पुरवला जातो.

No comments:

Post a Comment