Total Pageviews

Thursday 16 June 2011

KILLING GIRL CHILD

खूप मुली गायब होत आहेत...स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा एक "ांतिकारी निर्णय विधानसभेत घेण्यात आला आहे. राजकारणातला सं"यात्मक सहभाग वाढण्यासाठी एकीकडे पावलं उचलली जाताहेत तर दुसरीकडे मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माच्या प्रमाणात लक्षणीय घट होते आहे. विज्ञानाची कास धरून चाललेल्या आजच्या जगात मुलींचे झपाट्याने कमी होत चाललेले प्रमाण ही चिंतेची बाब आहे.
महिला दिन होऊन एक महिना उलटला आहे. त्या निमित्ताने आपल्या समाजातील कर्तृत्ववान, गुणी महिला, महिलांची एकंदरीत प्रगती, त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावरही उमटवलेली मोहोर याची चर्चा नुकतीच संपते आहे. त्यामुळे आता जमिनीवर येऊन स्त्रियांचे स्थान, त्यांची स्थिती आणि मु"यति सं"या याकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला हरकत नाही.आकड्यांनी डोळे उघडण्याची प्रकि"या दर दहा वर्षांनी येणारी आपली जनगणना सातत्याने करते आहे. भारताच्या पंधराव्या जनगणनेचे आकडे यायला आता सुरुवात झाली आहे. यावेळेस लोकसं"या वाढीचा दर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. आपली लोकसं"या स्थिरतेकडे वाटचाल सुरू आहे. शहरीकरण आणि साक्षरता वाढली आहे. म्हणजेच आपण विकासाच्या वाटेवर दोन पावले पुढे गेलो आहोत. स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ झाली आहे. ते 933 वरून 940 वर पोचले आहे. म्हणजे दर हजार पुरुषांमागे 940 स्त्रिया!
1872
साली बि"टिशांनी केलेल्या पहिल्या जनगणनेपासून भारतात स्त्रियांची सं"या पुरुषांच्या तुलनेत जाणवण्याइतकी कमी होती. ते आकडे पाहून जनगणना करणारे बि"टिश अधिकारीही गोंधळून गेलेे होतेे. कारण जगभरातील अनुभव, त्यांच्या देशातील अनुभव याच्या उलट होता. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची सं"या तेथे अधिक होती. मात्र त्यानंतर झालेल्या जनगणनांमध्येही भारतातील चित्र बदलले नाही. याउलट हे गुणोत्तर सातत्याने कमी होत राहिले. गेल्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1901 साली ते होते 972 आणि त्यानंतरच्या दर दहा वर्षांनी ते होत गेले 964, 955, 950, 945. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या जनगणनेला ते झाले 946, 1961 ला 941, 1971 ला 930, 1981 ला 934 आणि 1991 ला 927! त्यानंतर 2001 ला थोडी वाढ होऊन 933 आणि आता 940! स्त्री-पुरुष गुणोत्तराचा वाढणारा आकडा पाहून सर्वांनी श्र्वास सोडला. वाटले, चला स्थिती सुधारते आहे. भारतीय समाज आता बदलतो आहे. असा विचार मनात येतो ना येतो तोच बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0-6 वयोगटातील मुलांच्या तुलनेत मुलींची सं"या कळली. ती होती 1000 मुलांमागे 914 मुली. फक्त 914! पुन्हा एकदा आपण मागे गेलो. गेल्या 50 वर्षांची स्थिती पाहिली तर हे गुणोत्तर होते 1961 साली 976, 1971 साली 964, 1981 साली 962, 1991 साली 945, 2001 साली 927 आणि आता 914.घट, घट आणि फक्त घट!बाल लिंग गुणोत्तर हे सद्यस्थितीचे निर्देशक असते. म्हणजेच आकडे सांगतात की, मुलींची सं"या घसरते आहे आणि नुसतीच घसरत नाही तर घसरण्याचे प्रमाण जास्त आहे, ही एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.स्त्री-पुरुष गुणोत्तर कमी असण्याचे मु" कारण आहे स्त्रियांचे सामाजिक स्थान. त्यामुळे प्रत्येकाला मुलगा हा हवाच असतो आणि मुलगा हवा असण्याची ही इच्छा पुढे जाऊन अट्टाहासाचे रूप धारण करते. खरे तर भारतीय समाजात पूर्वापार स्त्रियांचे स्थान गौण होते. मुलगा हवाच असणाऱ्यांची सं"या त्या काळातही कमी नव्हती. मग आताच त्यावर चर्चा करण्याची गरज का भासते आहे याचाही थोडा विचार करायला हवा. पूर्वी एका स्त्रीला सरासरी 4-5 मुले होत असत. त्या 4-5 मुलांमध्ये मुलगे आणि मुली यांच्या सं"येचा समतोल साधला जात असे, परंतु आता जेव्हा प्रत्येक स्त्रीला फक्त एक अगर दोनच मुले होण्याचा जमाना आला तेव्हा त्या दोनात किंवा कधी कधी तर एकातच मुलगा जन्माला येणे आवश्यक होऊन बसले. जर नैसर्गिकरित्या मुलगा झालाच तर ठीक आहे, नाही तर त्यासाठी आवश्यक "कृती'ची जोड मिळू लागली. त्यामुळेच मुलींच्या सं"येची घसरगुंडी सुरू झाली.मूल जन्माला येण्यापूर्वी त्याची वाढ योग्य आहे ना, त्यात काही व्यंग, विकृती नाहीत ना, काही अनुवंशिक रोग नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी हळूहळू तंत्रज्ञान विकसित झाले. त्यानुसार बाळाची स्थिती, संभाव्य वजन, बाळंतपणाच्या वेळी उद्‌भवू शकणाऱ्या तक"ारी याचीही माहिती मिळू लागली. या तंत्रज्ञानामुळे दुर्दैवाने बाळाचे लिंगनिदानही शक्य झाले आणि वरदान म्हणून सर्व बालकांना लाभलेले हे तंत्रज्ञान भारतातील मुलींसाठी मात्र शाप ठरू लागले. सुरुवातीला फक्त शहरी भागात, सधन, सुशिक्षित आणि उच्चवर्णियांत असणारे लोण आता "ामीण, समाजातील खालच्या स्तरातही पोचले आहे. सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध नव्हते, परंतु आता मात्र निदान यंत्रांची सं"या वाढते आहे. आई बाळाच्या आरोग्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान मुलीला जन्मच नाकारण्यासाठी वापरले जात आहे. सर्वात महत्त्वाची आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे आता कोणीच यात मागे राहायला तयार नाही. मुली कमी होत जाण्याचे उघड उघड कारण गर्भलिंग निवड आहे. याविषयी कोणाचेच दुमत नाही, पण त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात मौन पाळले जात आहे.भारतात गर्भलिंग निदान कायदेसंमत नाही. तो एक शिक्षापात्र गुन्हा आहे. गर्भधारणेनंतर तसेच गर्भधारणेपूर्वीही कोणी गर्भलिंग निदान केले तर ते करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, करता येते. गर्भलिंग निवड करणे वेळीच थांबले नाही तर मुलींची घसरणारी सं"या कोणीही रोखू शकणार नाही. परंतु संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात चालणारा हा उद्योग कायद्याच्या चौकटीत बसवणे फार अवघड आहे. कारण यात गुंतलेल्या दोन्ही बाजूंचा त्यात फायदाच आहे. एका बाजूला, होणारे अपत्य हे मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा आहे आणि मुलगा मिळविण्याची ओढ आहे तर दुसऱ्या बाजूला ही माहिती आणि आवश्यक असल्यास त्यानंतरच्या सेवा पुरविण्यामुळे मिळणारे प्रचंड पैसे आहेत. दोन्ही बाजूंना मोह टाळणे जवळ जवळ अशक्य आह
2011
च्या जनगणनेत बाललिंग गुणोत्तरात लक्षणीय घट झालेली राज्ये आहेत जम्मू काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर 913 वरून 883 पर्यंत खाली आले आहे.आतापर्यंत विकासाच्या दृष्टीने पुढे असणारा महाराष्ट्र आता बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या पंक्तीला जाऊन बसला आहे.
मागील दशकात बाललिंग गुणोत्तरात अधिक घट झालेली राज्ये होती पंजाब आणि हरयाणा. 2011 साली या दोन्ही राज्यातील बाललिंग गुणोत्तरातील वाढ लक्षणीय आहे.
2001 2011
पंजाब -798 846हरयाणा- 819 830
गर्भलिंग निदान आणि निवड याचा परिणाम बाल लिंग गुणोत्तरावर प्रकर्षाने दिसून येतो. त्यामुळेच जनगणनेच्या आकड्यानुसार 0 ते 6 वयोगटातील बालकांमध्ये मुली कमी प्रमाणात दिसतात.भारतात नमुना सर्वेक्षण पद्धतीने (डराश्रिश ठशसळीींीरींळिि डूीींशा) जन्म-मृत्युसंबंधी माहिती संकलित केली जाते. वर म्हटल्याप्रमाणे ती थोड्या प्रमाणात असते-नमुन्याची असते. या माहितीवरूनच भारत आणि राज्यांसाठी जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर वगैरे निर्देशांक काढण्यात येतात. यातील जन्माची माहिती - सर्वसामान्यपणे 3 वर्षांची माहिती एकत्र करून जन्माला येणाऱ्या बालकांचे स्त्री-पुरुष गुणोत्तर (जन्मलिंग गुणोत्तर) काढण्यात येते. त्यावरून जन्माला येताना मुलामुलींची सं"या काय होती याचा अंदाज बांधता येतो.जीवशास्त्रीय कारणांमुळे जन्माला येताना मुलींच्या सं"येपेक्षा मुलग्यांची सं"या जास्त असते. याचे वैश्र्विक प्रमाण ठरलेले आहे. जर हजार मुलगे जन्माला आले तर साधारणति 950 मुली जन्माला येतात. कारण मुलग्यांच्या अधिक प्रमाणात होणाऱ्या मृत्यूंमुळे कालांतराने दोघांची सं"या बरोबर होते, पण भारतात आपण 950 ला केव्हाच मागे टाकले आहे. चालू दशकात म्हणजे सन 2000 नंतर दर तीन वर्षांसाठी ही सं"या 880 ते 904 च्या दरम्यान आहे. म्हणजे जी सं"या 950 असायला हवी ती 904 च्या वर कधी गेलीच नाही. याचा आधार घेऊन जर अनुमान काढले तर या जन्मालाच आलेल्या म्हणजेच गायब झालेल्या मुलींची सं"या दरवर्षी 6 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत भारतात कमीत कमी 60 लाखांहून अधिक मुली गायब झाल्या आहेत.आपल्या महाराष्ट्रात सामाजिकदृष्ट्या अग"ेसर असणाऱ्या राज्यात गेल्या दहा वर्षांत जन्मलिंग गुणोत्तर कधीच 900 च्या वर गेलेले नाही. या आकड्यांवरून पाहिले तर महाराष्ट्रात दरवर्षी 55 हजारांपेक्षा जास्त मुलींनी जन्मच घेतलेला नाही. म्हणजे गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात कमीत कमी साडेपाच लाखांपेक्षा जास्त मुली गायब झाल्या आहेत.अशा प्रकारे एखाद्या समाजातून पूर्णपणे मुली नाहीशा होणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मुलींची सातत्याने कमी होणारी आणि नजिकच्या भूतकाळात अतिशय झपाट्याने खाली येणारी सं"या हा जगभरात चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय झाला आहे.विकासाच्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा अगदी अलीकडेपर्यंत स्त्री-पुरुष गुणोत्तराचा कोणी विचार करीत नसे. परंतु जशी गर्भलिंग निवड जोरात सुरू झाली तसे हे गुणोत्तर चर्चेत आले. सामाजिक समतेचा निर्देशांक असणारे हे गुणोत्तर भारताची खालावलेली समता दाखवू लागले.महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांत बाललिंग गुणोत्तर 850 पेक्षाही कमी आहे.बीड -801जळगाव -829अहमदनगर- 839बुलढाणा -842कोल्हापूर- 845जालना -847औरंगाबाद -848गडचिरोली -(956) या एकाच जिल्ह्यात बाललिंग गुणोत्तर 950 पेक्षा अधिक आहे.
हरियाणाचे स्त्री-पुरुष गुणोत्तर (877) आणि त्याबरोबरच बाललिंग गुणोत्तरही (830) कमी आहे. सातत्याने स्त्रियांची सं"या कमी असण्याने तेथील काही मुलांना लग्न करण्यासाठी स्थानिक मुली मिळणे कठीण झाले आहे. अशा मुलांची सं"या दिवसेंदिवस वाढत असून लग्नासाठी त्यांना इतर राज्यांमधून मुली विकत आणाव्या लागत असल्याचे अनेक अभ्यासातून दिसते आहे.आताच योग्य पावले उचलली नाहीत तर महाराष्ट्राची वाटचाल हरयाणाच्या दिशेने सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुली कमी होण्यामुळे समाजावर होणारे परिणाम भीषण आहेत. स्त्रियांसाठी आधीच असुरक्षिततेचे असणारे वातावरण अधिक असुरक्षिततेकडे जाणारे आहे. मुलीच कमी असल्यामुळे ती वयात येतायेताच होणाऱ्या विवाहांचे प्रमाण वाढणार आहे आणि त्याचा थेट परिणाम स्त्रिया आणि बालकांच्या आरोग्यावर होणार आहे. ज्यात आपण आतापर्यंत दोन पावले पुढे आलो होतो ते चार पावले मागे जाणार आहोत. "मला मुलगा हवा' याचे परिणाम पूर्ण समाजावर होणार आहेत. कुठलाही सामाजिक बदल हा हळूहळू होत असतो. त्यामुळे समाजमन बदलून मुलींच्या सं"येत वाढ दिसण्यासाठी फार काळ जावा लागेल. याखेरीज ज्या मुली गेल्या त्या कायमच्या गेल्या. त्या पुन्हा कधीही येणार नाहीत आणि हे घसरणारे आकडे सुधारायला मदत करणार नाहीत. त्यामुळे कायद्याची काटेकोर अंमलबजावणी फार महत्त्वाची आहे. करायला अत्यंत अवघड असली तरीही शस्त्रकि"या आवश्यक आहे.एक यंत्र हजारवेळा वापरता येते आणि त्यातील निम्म्या वेळी तरी येणारे बालक मुलगी असू शकते. तेवढ्या सगळ्या मुली जन्माला येतात का यावर एक नजर टाकली तरी खरे चित्र समोर येईल, परंतु त्यासाठी गरज आहे अधिक संवेदनशीलतेची. आपल्याच पोटी जन्माला येऊ पाहणाऱ्या मुलींच्या जीवदानासाठी लढा द्यावा लागणे असा लढा उभा करावा लागणे ही कुठल्याही संवेदनशील समाजाच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. भविष्यात येणाऱ्या महिला दिनासाठी आपल्या समाजात पुरेशा महिला तरी असण्याचीच गरज आता निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment