Total Pageviews

Friday, 4 January 2019

मेळघाटातील जवानाचा जवान मुन्ना पुनाजी शेलुकर अरुणाचलात मृत्यू अरुणाचाल प्रदेशातील तवांग येथे हिमस्खलनादरम्यान सात बिहार रेजीमेंटचे जवान मुन्ना पुनाजी शेलुकर यांचा मृत्यू झाला. मुन्ना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुर्णी (ढाणा) येथील मूळ रहिवासी आहेत.



रुणाचाल प्रदेशातील तवांग येथे हिमस्खलनादरम्यान सात बिहार रेजीमेंटचे जवान मुन्ना पुनाजी शेलुकर यांचा मृत्यू झाला. मुन्ना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चुर्णी (ढाणा) येथील मूळ रहिवासी आहेत. अमरावती जिल्हा पोलिस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

अमरावती पोलिसांनी सांगितले की, बिहार रेजीमेंटची ४७वी बटालीयन शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तवांग क्षेत्रातून जात होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. यात मुन्ना हे दबले. त्यांना तातडीने लष्कराच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुन्ना हे सुमारे आठ वर्षांपूर्वी बिहार रेजीमेंटमध्ये कार्यरत झाले होते. त्यांचे वडील आणि तीन भाऊ गावात शेती करतात. एक वर्षापूर्वीच मुन्ना यांचा विवाह झाला होता. परंतु, काळाने त्यांच्यावर घाला घातला. मुन्ना यांचे पार्थिव शनिवारी सकाळी साडे सहा वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी रवाना केले जाईल. 




No comments:

Post a Comment