Total Pageviews

Thursday, 17 January 2019

बलुचिस्तान बांगलादेश आख्यानाचा उपसंहार की नवी प्रस्तावना? महा एमटीबी --संतोष कुमार वर्मा (अनुवाद : महेश पुराणिक)

बांगला राष्ट्रवाद’ या भीषण परिस्थितीतही जिवंत राहिला आणि एका राष्ट्राच्या रूपात राष्ट्रीय स्वप्नाला साकार केलेआत पाकिस्तानसाठी इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत आहे आणि हा प्रश्न प्रासंगिक आहे की, बलुचिस्तान बांगलादेशाच्या आख्यानाचा उपसंहार आहे की एखादी नवी प्रस्तावना?
 
पाकिस्तान दहशतवादाच्या उत्पादक आणि निर्यातक देशाच्या रूपात वैश्विक पटलावर समोर आल्याचे दिसतेपाकिस्तान एक असा देश आहेज्याने आपले हित साधण्यासाठी शेजारी देशांत अस्थिरता पसरविण्याचे कायम प्रयत्न केलेस्वातंत्र्यानंतर तत्काळ पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये कबिल्यावाल्यांच्या टोळ्यांद्वारे घुसखोरी करत भारतावर आक्रमण केलेएका राष्ट्राच्या रूपात स्थापना झाल्यानंतरचे हे आक्रमण म्हणजे पाकिस्तानने केलेली पहिली दहशतवादी कारवाई म्हणता येऊ शकतेयानंतर लगेचच मार्च १९४८ मध्ये अशाच प्रकारच्या एका अवैध लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तानने बलुचिस्तानला आपल्या ताब्यात घेतलेमेजर जनरल अकबर खान यांच्या निर्देशानुसार सातव्या बलूच रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल गुलजार खान यांनी कलातवर हल्ला केला आणि कलातच्या खानाला अटक करून बळजबरीने विलीनीकरण करारावर हस्ताक्षर करवून घेतले. पण, प्रचार असा केला कीकलात यांनी स्वतःच बलुचिस्तानचे पाकिस्तानात विलीनीकरण केलेहा बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा प्रारंभ होता, जो अजूनही सुरूच आहे. शिवाय काळाच्या बरोबरीने या दहशतवादाने आता आणखीनच अक्राळविक्राळ रूप धारण केल्याचेही दिसून येते.
 
बलुचिस्तानमधील दहशतवादाबाबत पाकिस्तानची भूमिका सर्वश्रुत आहे. कारण, पाकिस्तान एकीकडे जुनदुल्लाह आणि लष्कर-ए-झांगवीसारख्या दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी कारवाया करून घेतो, तर दुसरीकडे पाकिस्तान लष्कराच्या माध्यमातून आपल्या प्रजेशीच मध्ययुगीन काळातील व्यवहार करतोबलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या या व्यवहाराची अनेक कारणे आहेतसर्वात पहिले कारण हे पाकिस्तानकडून बलुचिस्तानच्या अवैध अधिग्रहणातच निहित आहेपाकिस्तान बलुचिस्तानी जनतेची स्वातंत्र्यविषयक अगाध आकांक्षा आणि निष्ठा चांगल्याप्रकारे ओळखतोम्हणूनच पाकिस्तान अशाप्रकारच्या कोणत्याही गतिविधीला दडपण्याकामी सदैव अग्रेसर राहतो.सोबतच पाकिस्तान बलूच राष्ट्रवादाच्या समस्त प्रेरक चिन्हे आणि स्मारकांनाही नष्ट करू इच्छितो. कारण, या चिन्ह आणि स्मारकांतूनच बलुची नागरिकांना स्वातंत्र्याची आणि सार्वभौमत्वाची प्रेरणा मिळते. पाकिस्तान जरी बलुचिस्तानला आपला वैधानिक भाग मानत असला, तरी त्याने बलुचिस्तानला कधीही आपल्या वसाहतीपेक्षा अधिक महत्त्व दिले नाही. यातूनच बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करणे, हा आपला अधिकार असल्याप्रमाणे पाकिस्तान वागत असतो. पण, बलुची नागरिकांबद्दलही आपले काही दायित्व, आपली काही जबाबदारी आहे, या गोष्टी त्याने नेहमीच झिडकारल्याचे दिसते. आज पाकिस्तानच्या पंजाब आणि बलुचिस्तान या दोन प्रांतांतील परिस्थितीत मोठा फरक आहेमोठे अंतर आहे आणि ही पाकिस्तानी सरकारच्या याच भेदभावजन्य धोरणाची अभिव्यक्ती म्हणावी लागेल.
 
मार्च १९४८ मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तान ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या प्रशासनात एक महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका निभावली आहेपाकिस्तानच्या छिन्नभिन्न लोकशाहीचा ढाचा पाहता यात कोणतेही आश्चर्य नाहीपण बलुचिस्तानमध्ये लष्कराने त्रासाचीपिडेची आणि विनाशाची काहीशी अधिक दीर्घ अशी रचना केलीपाकिस्तानी लष्कराने आंशिक आणि दूरस्थ नियंत्रणापेक्षा संघटित नियंत्रण स्थापित करण्याचे प्रयत्न केले आणि याच क्रमात स्थानिक निमलष्करी मिलीशियाच्या ठिकाणी एका फार मोठ्या भागाला थेट आपल्यात सामील केलेस्थानिक संस्कृतीमध्ये हा लष्कराचा अवैध हस्तक्षेप न्यायेतर अपहरणहत्या आणि अपहरणाचा पर्याय झाला आहे.
 
संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, २००५ पासून आठ हजारांपेक्षा अधिक बलुची बेपत्ता आहेत. पण, स्थानिक रहिवाशांच्या मते, हा आकडा वास्तविकतेचा केवळ छोटासा भाग आहे. हा आकडा आणखीही अधिक असू शकतोपाकिस्तान सरकारने इथे लष्कराला यासाठी तैनात केले आणि त्यांना अनियंत्रित अधिकार दिलेजेणेकरून ते या क्षेत्रावर आपल्या पकडीला अधिक बळकट करू शकतील आणि स्थानिक असंतुष्ट जे आपल्या वैध मागण्यांना शांततेने सरकारसमोर ठेवतात, त्यांचे कठोरपणे दमन करता येईल. या दडपशाहीचा परिणाम असा झाला की, बलूच जनतेने याला बलूच राष्ट्रवादावरील आक्रमण समजले आणि कित्येकदा त्याला हिंसक प्रत्युत्तरेदेखील दिली. आज इथे अशी स्थिती आहे की, या क्षेत्रात लष्कराच्या सर्वच गतिविधी या राज्यपुरस्कृत दहशतवादाची आवृत्ती ठरत आहेत१९८५ साली क्वेट्टा इथे पाकिस्तानी लष्कराच्या १२ व्या कॉर्पची स्थापना झाल्यानंतर बलुचिस्तानवर लष्करी नियंत्रण आणि अत्याचारांत अधिकच वाढ झाली. तथापि, या कॉर्पच्या स्थापनेमागचा उद्देश अफगाणिस्तानमधील मुजाहिद्दीनांना सहकार्य करणेहा होता आणि त्याने तालिबान सरकारला तसे सहकार्य केलेहीक्वेट्टामध्ये मात्र याची स्थिती बलूच राष्ट्रवादाचे दमन करण्याच्या रूपात आहे२००४ मध्ये सुरुवात झालेल्या बलूच संघर्षाच्या दमन आणि २००६ मध्ये नवाब अकबर खान बुगती यांच्या हत्येत याच लष्करी ताफ्याचा हात होतालेफ्टनंट जनरल नासिर खान जंजुआ ज्याने या कमांडचा प्रमुख असल्याच्या काळात या क्षेत्रात केलेल्या व्यापक आणि खुलेआम कत्तलींमुळे जनरल डायरसदृश्य बदनाम आहेहेच जंजुआ पाकिस्तानच्या मागील सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत होतेयावरूनच याचा अंदाज लावता येतो कीपाकिस्तान सरकार बलुचिस्तान आणि तिथल्या नागरिकांच्या हितांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे.
 
मोहम्मद अली जिना यांच्यापासून भुट्टो आणि जनरल झिया यांच्यापासून परवेझ मुशर्रफ या सर्वांनीच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या वैध मागणीला लष्करी हल्ले आणि व्यापक नरसंहाराद्वारे दडपण्याचे प्रयत्न केले आणि या क्रमात पाकिस्तान आजही अग्रेसर आहेपाकिस्तानी लष्कर गेली कित्येक वर्षे बलुचिस्तानच्या अधिकारांसाठी आवाज बुलंद करणाऱ्या राजकीय कार्यकर्ते, वकील, पत्रकार आणि सुशिक्षित वर्गाच्या हत्यांशी संलग्न राहिले आहेनुकतेच क्वेट्टा येथील रुग्णालयात ५० पेक्षा अधिक वकिलांच्या हत्येपासून मानवाधिकार कार्यकर्ते आणि अशाच प्रकारच्या सामाजिक प्रबुद्ध वर्गाच्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होणेया लक्ष्य करून हत्या करण्याच्या मालिकेतील आणखी एक पाऊल आहेज्याला पाकिस्तानी लष्कर आणि सरकारद्वारे पोषित केलेल्या इस्लामी जिहादी समूह आणि अन्य दहशतवादी संघटना सत्यात उतरवत आल्या आहेत. या हल्ल्यांची तीव्रता पाहता, हे निश्चित होते की, पाकिस्तानी लष्कर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा संपूर्ण ताकदीनिशी विनाश करण्यासाठी कटीबद्ध आहे.
 
बलुचिस्तानमध्ये दहशत पसरविण्यासाठी आणि बलुची राष्ट्रवादाला दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कर इस्लामी जिहादी गटांकडूनही सक्रिय सहकार्य मिळवते आणि लष्कर आणि दहशतवादी संघटनांमध्ये समन्वयाचे काम ‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘आयएसआय’द्वारे केले जाते. बलुचिस्तानमध्ये दहशत पसरविण्यात जी संघटना सर्वाधिक सक्रिय आहे, त्यात ‘जुन्दुल्लाह’ ही प्रमुख आहे. बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या या दहशतवादी संघटनेचे चरित्र संदिग्ध असून एका बाजूला ही संघटना बलुच राष्ट्रवादाच्या आड त्याचे दमन करण्यासाठी पाकिस्तान सरकारची मोहरा झाली आहेतर दुसऱ्या बाजूला शियाविरोधी भूमिकेमुळे शेजारी इराणच्या सिस्तान-लुचिस्तान क्षेत्रात गडबड गोंधळ पसरविण्यापासून इराणमार्गे पाकिस्तानमध्ये नशेच्या पदार्थांच्या तस्करीतही सहभागी आहे, जो सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्यानंतरचा त्यांचा कमाईचा सर्वात मोठा मार्ग आहे.
 
‘जुन्दुल्लाह’ या संघटनेची स्थापना नव्वदच्या दशकात नेक मोहम्मद वजीरकडून इराण सरकारच्या बलुच विरोधी भूमिकेच्या प्रत्युत्तरादाखल केली होती२००३ मध्ये अब्दुल मलिक रेगी यांच्या नेतृत्वात या संघटनेला प्रसिद्धी मिळाली. ही संघटना स्वयंघोषितपणे इराणच्या ४० लाख बलुची नागरिकांची स्वत:ला संरक्षक सांगते. परंतु, बलुचिस्तानच्या हजारा, जो की, एक प्रमुख शिया समुदाय आहे, या दहशतवादी संघटनेची सर्वात मोठी शिकार झाला आहे व मोठ्या संख्येने बलुचिस्तानमधून पलायनही करत आहेअशाचप्रकारे बलुचिस्तानमध्ये आणखी एक प्रमुख दहशतवादी संघटना सक्रिय आहे, ती म्हणजे लष्कर-ए-झांगवी. शियाविरोधाच्या विचारधारेवर स्थापन केलेल्या या संघटनेची स्थापना १९९६ मध्ये देवबंदी मौलवींद्वारे करण्यात आली, जिने १९८५ मध्ये स्थापन केलेल्या ‘सिपाह-ए-सहाबा’ नामक कट्टरवादी संघटनेच्या सशस्त्र शाखेच्या रूपात ख्याती प्राप्त केली आहे. ही संघटनादेखील बलुचिस्तान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हत्या आणि आगी लावण्याच्या घटनांत संलग्न राहिली आहे. या संघटनेला पाकिस्तान सरकार आणि आखातातील कित्येक देशांतून पैसा मिळतो.
 
बलुचिस्तान पाकिस्तानसाठी केवळ एक वसाहत आहेज्याच्या साधनसंपत्तीचा उपयोग तो पाकिस्तान उर्वरित भागात विशेषत्वाने पंजाबच्या हितांसाठी निर्लज्जपणे करत आहेत्याची आर्थिक धोरणे प्रामुख्याने तेल आणि वायू निष्कर्षण धोरणांचे अध्ययन केल्यास हे स्पष्ट होते की, बलुचिस्तानबरोबर वास्तवात किती मोठा अन्याय करण्यात येत आहे. हे तर धोरणात्मक विषय झाले. परंतु, पाकिस्तान या सगळ्याच्याही पुढे जाऊन विनाश आणि नरसंहाराद्वारे बलुची लोकांच्या न्याय्य मागण्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेजे कोणत्याही दृष्टीने स्वीकारार्ह होऊ शकत नाहीयावरून पाकिस्तानद्वारे बांगलादेशमध्ये केलेल्या नरसंहाराची आठवण करून देतोजेव्हा पूर्व पाकिस्तानच्या जनतेला दुय्यम दर्जाचे नागरिक मानले जात असे आणि लोकशाही हा एक थट्टेचा विषय होऊन राहिला होतासगळे निर्णय सुरुवातीला कराची आणि नंतर इस्लामाबादमध्ये घेतले जाऊ लागले, तर पूर्व पाकिस्तान केवळ एक ‘घेट्टो’ मानला जाऊ लागला. ज्याला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक रूपाने मुलाहिदा घोषित करण्यात आले. परंतु, ‘बांगला राष्ट्रवाद’ या भीषण परिस्थितीतही जिवंत राहिला आणि एका राष्ट्राच्या रूपात राष्ट्रीय स्वप्नाला साकार केलेआत पाकिस्तानसाठी इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत आहे आणि हा प्रश्न प्रासंगिक आहे कीबलुचिस्तान बांगलादेशाच्या आख्यानाचा उपसंहार आहे की एखादी नवी प्रस्तावना?
 
-

No comments:

Post a Comment