Total Pageviews

Saturday, 26 January 2019

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा


पूर्वी असा समज होता की, निरक्षर, समाजाचे भान नसलेल्या लोकांना दुष्ट लोक धर्माच्या नावावर चिथवतात. ते काय बिचारे भोळेभाबडे लोक. त्यांना काय माहिती दुनियादारी? मग अशा लोकांना हत्यार बनवून धर्माच्या नावावर देशद्रोही बनवले जाते. पण, गेली काही वर्षे हा समज खोटा होताना दिसत आहे. इसिसया दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ठाण्यात अटक केलेल्यांपैकी एक जण ठाणे पालिकेचा कर्मचारी. या सर्वांचा काहीतरी भयानक घातपात करण्याचा इरादा होता, असा दावा केला जातो. मात्र, या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक सांगतात की, हे लोक भयंकर धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते असे असतील, यावर विश्वास बसत नाही. असो, असे जरी असले तरीसुद्धा जर या संशयितांचा इसिससारख्या क्रूर मानवताविरोधी संघटनेशी संबंध असेल तर कोणत्याही धर्माचे बंदेअसण्यासाठी ते पात्र आहेत का? हे स्पष्ट व्हायला हवे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरियाअर्थात इसिसला इराकपासून संपूर्ण मध्य पूर्वेसह थेट उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामची राजवट स्थापन करून तथाकथित खलिफाची राजवट आणायची आहे. दुर्दैवाने, भारतीय मुस्लीम तरुण इसिसच्या या इस्लामिक राज्याच्या दाव्याला बळी पडलेले दिसतात. तसेच ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये विशिष्ट समाज एकवटला आहे, तर त्या एकवटलेल्या समाजातील काहींना कट्टरतेकडे आणि पर्यायाने देशद्रोहाकडे, मानवद्रोहाकडे नेणाऱ्या प्रवृत्ती तिथे सक्रिय झाल्याचे दिसते. गरीब वस्तीत जायचे किंवा धार्मिक कार्यक्रमात जायचे; गरीब असतील तर त्यांना सोनेरी स्वप्नांचे भविष्य दाखवायचे आणि धार्मिक असतील तर त्यांना जन्नत-दोजख वगैरे सांगायचे. असले धंदे करून तरुणांना आपल्या अतिरेकी पाशात ओढण्याचे काम अतिरेकी संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. यासाठी वस्तीमध्ये जाऊन सेवाकार्य करण्याचे ढोंग ते उत्तमपणे वठवतात. अशा ढोंगांना बळी पडणारेच पुढे रक्तपिपासू पशू बनतात, याचे दुःख आहे.




मुंब्रासंभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेतही संघटना  इसिससाठी ‘स्लीपर सेलचे काम करतेया माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहेठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहेया अटका वेळीच झाल्याप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहेइसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशात हमखास संशयित दहशतवाद्यांना अटक होते. छापे मारले जातात. एखादा मोठा कट उधळला जातो. आताही प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असताना दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा, संभाजीनगर येथे काही ठिकाणी छापे मारले आणि नऊ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या सर्वांचा इसिसया दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मुंब्रा येथील कौसा भागात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. संभाजीनगर येथेही काही अटका झाल्या. हे सर्वच संशयित दहशतवादी सुशिक्षित आहेत आणि संगणक, माहिती-तंत्रज्ञान यात ते तज्ञ आहेत असे सांगण्यात येत आहे. अलीकडील काळात आपल्या देशात सुशिक्षित संशयित दहशतवादी पकडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः संगणकीय तंत्रज्ञानात पारंगत असणाऱयांचा वावर दहशतवादी कारवायांत वाढताना दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या काही दिवसांत ज्यांना ताब्यात घेतले त्यात सुशिक्षित तरुणांचा भरणा जास्त आहे. उच्चशिक्षित मुस्लिम तरुण-तरुणींना धर्माच्या, जिहादच्या नावाने भडकवायचे, त्यांचे ब्रेन वॉशिंग करून जिहादीबनवायचे आणि दहशतवादी कारवायांत ओढायचे ही इसिसया दहशतवादी संघटनेची जुनीच मोडस् ऑपरेंडी आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील
एका अल्पवयीन मुलीचा
असाच किस्सा बाहेर आला होता. मानसोपचारतज्ञांकडून तिचे नंतर कौन्सिलिंग करण्यात आले. कल्याणमधील चार तरुणदेखील इसिसमध्ये सहभागी झाले होते. तीन वर्षांपूर्वी या प्रकरणाने देशभरातच खळबळ माजवली होती. ठाणे जिल्हय़ाशिवाय मराठवाडय़ातही इसिसने हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी येथे सिमीचे जाळे होते. आता इसिसतोच प्रयत्न करीत आहे. मराठवाडय़ातील परभणी येथून तीन वर्षांपूर्वी नासीर याला एटीएसने अटक केली होती. त्याशिवाय शाहीद खान हा तरुणही एक किलो स्फोटकासह एटीएसच्या जाळय़ात सापडला होता. या दोघांवरही इसिसशी संबंध असल्याचा संशय होता. रिझवान खान याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले होते. तो ठाणे जिल्हय़ात इसिसचे भरती केंद्रचालवीत असल्याचा संशय होता. ठाणे जिल्हा आणि इसिस हे कनेक्शन नवीन नाही, जुनेच आहे. किंबहुना, मंगळवारी ज्या अटका मुंब्रा, कौसा येथून झाल्या त्याचे मूळ या जुन्या कनेक्शनमध्येच आहे. इसिसला देशात फार समर्थन मिळणार नाही, येथील मुस्लिम तरुण या दहशतवादी संघटनेकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित होणार नाहीत असे सरकारपासून सर्वच सांगत होते. मात्र तो अंदाज पूर्ण खरा ठरलेला नाही असेच
एकंदर चित्र
दिसत आहे. महाराष्ट्रातून इसिसमध्ये मोठय़ा प्रमाणावर मुस्लिम तरुण गेले नसले तरी हे कनेक्शन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाही. महाराष्ट्र एटीएसच्याच म्हणण्यानुसार त्यांनी किमान 86 तरुणांना इसिसमध्ये जाण्यापासून परावृत्त केले आहे. ही संख्याही तशी लक्षणीयच आहे. ही मुले तिकडे गेली नाहीत हे आपल्या यंत्रणांचे यशच आहे, पण हिंदुस्थानी मुस्लिम तरुणांमधील इसिसचे आकर्षण संपलेले नाही हेच मुंब्रा, कौसा, संभाजीनगर येथील एटीएसच्या अटकसत्रांमुळे दिसून आले आहे. मध्यंतरी राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही उत्तर प्रदेश, दिल्ली येथे छापे टाकून इसिसशी संबंधित संशयितांना अटक केली होती. मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाया संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे इसिसचेच अपत्य आहे. ती इसिससाठी स्लीपर सेलचे काम करते आणि या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहे. इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे

No comments:

Post a Comment