Total Pageviews

Saturday, 29 September 2018

SURGICAL STRIKE

https://youtu.be/OJzXoNwQsWU


भारताने पाकिस्तानच्या या दुटप्पी धोरणावर आक्षेप घेत आगामी चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. लष्कराच्या हातातले बाहुले असलेल्या इमरान खान यांनी भारताच्या याच निर्णयावर टीका करत कोत्यानकारात्मक मनोवृत्तीची माणसे भारताच्या सर्वोच्चपदी बसल्याचे वक्तव्य केले. खान यांचे हे बेताल बोल म्हणजे हजार छिद्रे असलेल्या चाळणीसारखेच!

देश चालवण्यासाठी म्हशी विकण्याची वेळ आलेल्या दिवाळखोर पाकिस्तानच्या पंतप्रधानाने नुकतेच भारतात कोत्या मनोवृत्तीच्या व्यक्ती सर्वोच्चपदी बसल्याचे तारे तोडले. इमरान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून ते त्यांचे अभिनंदन करेपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतल्याचे सर्वांना माहितीच आहे. नरेंद्र मोदी यांनी आपण पाकिस्तानशी अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चा करण्याच्या बाजूचे असून दोन्ही देशांतील संघर्षाच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच मनोगताला अनुसरून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बातचीत होईलअसेही ठरले. इमरान खान यांनीही त्यास होकार दर्शवला. जवळपास तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्याच नापाक कारवायांमुळे दोन्ही देशांतील थांबलेला संवाद या माध्यमातून सुरू झाल्यास शांततेच्या, तोडग्याच्या दिशेने पुढची पावले उचलता येतील, असेही वाटले. मात्र, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, या उक्तीप्रमाणे पाकिस्तानने आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा प्रत्यय यावेळीही दिला. चर्चेची घोषणा झाल्याचा ध्वनी विरतो न् विरतो तोच पाकिस्तानी लष्कराने आपली औकात दाखवत आयएसआयच्या मदतीने एका भारतीय जवानाची गळा चिरून अमानुष आणि निर्घृण हत्या केली. १९४७ पासून भारताला छळणाऱ्या या देशाने आतापर्यंत शेकड्याने भारतीय जवानांचापोलिसांचा आणि निष्पाप नागरिकांचा आपल्या मतलबासाठी बळी घेतल्याचे सर्वश्रुत आहेच. दहशतवादाचा राक्षस पोसणाऱ्या या देशाने गेल्या ३० वर्षांत तर जम्मू-काश्मीरचे वातावरण नासविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पृथ्वीवरचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरचा नरक करण्याचे पाप पाकिस्तानी सरकार, लष्कर,आयएसआय आणि पाकिस्तानने रसदपुरवठा केलेल्या दहशतवाद्यांनी संगनमताने केले. परिणामीभारतीय नागरिकांची पाकिस्तानबाबतची भावना नेहमीच तीव्र असल्याचे पाहायला मिळाले. अर्थातभारताने वेळोवेळी पाकिस्तानला आपल्या लष्करी सज्जता आणि क्षमतेच्या जोरावर त्याची लायकी दाखवून दिलीहेही खरेच.
 
आता मात्रसुरक्षा दलाच्या जवानाच्या हत्येनंतर आणि तीन पोलिसांचे अपहरण करून हत्या झाल्या प्रकरणात आयएसआयचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर भारतात त्याचे तीव्र पडसादप्रतिक्रिया उमटल्या आणि भारताने पाकिस्तानबरोबरची चर्चा रद्द करत असल्याचे जाहीर केले. भारताच्या या पवित्र्याने गडबडलेल्या इमरान खान यांनी लगेच यावर प्रतिक्रिया देत चर्चेला नकार देण्याचा भारताचा निर्णय हा उद्दामपणाचा आणि भारताची नकारात्मक भूमिका स्पष्ट करणारा आहेअसे ट्विट केले. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या ट्विटनंतर दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ पाहणाऱ्या आणि स्वतःच्या डोळ्यातले मुसळ न दिसणाऱ्या नमुन्यांत इमरान खान यांचा पहिला क्रमांक लागेल, असेच म्हणायला हवे. कारण, एकीकडे भारताशी वाटाघाटीच्या पुड्या सोडायच्या आणि दुसरीकडे भारतीय जवानांच्या नरडीचा घोट घ्यायचाहा जुनाच नापाक शिरस्ता इमरान खान यांनीही चालवला. भारताने पाकिस्तानच्या या दुटप्पी धोरणावर आक्षेप घेत आगामी चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. लष्कराच्या हातातले बाहुले असलेल्या इमरान खान यांनी भारताच्या याच निर्णयावर टीका करत कोत्या,नकारात्मक मनोवृत्तीची माणसे भारताच्या सर्वोच्चपदी बसल्याचे वक्तव्य केले. इमरान खान यांचे हे बेताल बोल म्हणजे हजार छिद्रे असलेल्या चाळणीसारखेच! शिवाय कोण कोते आणि कोण व्यापक हे दर्शविणारेही! स्वतःच्या देशात दहशतवादाचेनापाक कारवायांचे, अमानुषतेचे, विध्वंसाचे जोमदार पीक येऊ द्यायचे आणि आरोप करायचा कोणावरतर ज्या देशाने पाकिस्तानच्या जन्मापासून घातपाताला,दहशतवादाला तोंड दिले त्याच्यावरही पाकिस्तानची आजवरची रीत. इमरान खान यांनीही याच रितीचे पाईक होण्यात धन्यता मानली. यावरूनच इमरान खान यांना भारताच्या पंतप्रधानांवर अशाप्रकारे बेछूट आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीहेच स्पष्ट होते. आतापर्यंत शांततेची कबुतरे उडवणाऱ्या भारतीयांनीही यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. आपण अशा देशाकडून अपेक्षा बाळगतोय, ज्याला आपले शेपूट सरळ करण्याची अजिबात इच्छाच नाही, जो कायम वाकड्यातच शिरतो. अर्थात शेजारी बदलता येत नसल्याने त्या देशाबरोबर बोलणी करणे भाग आहेच, हेही बरोबरच!
 
पाकिस्तानातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात जगातील बलाढ्य देशांचा हात होताहे तर नक्कीच. आपल्या स्वार्थासाठी अमेरिकेनेही पाकिस्तानला वेळोवेळी चुचकारले, आंजारले, गोंजारले. जॉर्ज डब्ल्यू. बुश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना २००६ साली त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. बुश यांच्यानंतर आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने पाकिस्तानला भेट दिली नाही. मधल्या काळात बराक ओबामा यांनीही पाकिस्तानच्या कारवायांकडे कानाडोळा करत त्या देशाला हवे तसे उंडारू दिले. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायचे चांगलेच मनावर घेतल्याचे दिसते. पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत कपात करण्यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची चुणूकही दाखवू दिलीपरंतु जॉर्ज बुश यांनी अमेरिकन अध्यक्षपदी असताना दिलेल्या पाकिस्तान भेटीनंतर २०१० साली ‘डिसीजन पॉईंट्स’ नावाचे एक पुस्तक लिहिले. ज्यात त्यांनी म्हटले की, “पाकिस्तान कोणत्याही प्रकारे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणार नाही. पाकिस्तानच्या आयएसआयमध्ये तालिबानशी जवळीक साधणारी माणसे आहेत.” बुश यांच्या या निरीक्षणावरून आपल्याला पाकिस्तानमधली परिस्थिती कशी आहे, हे लक्षात येते. आजही परवेझ मुशर्रफ हुकूमशाही वा नवाझ शरीफ यांचे सरकार जाऊन पाकिस्तानात इमरान खान सत्तेवर आल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्या देशातली परिस्थिती अगदी पहिल्यासारखीच आहे. उलट आता तर इमरान खान हे पाकिस्तानी लष्कराच्याच पाठिंब्यावर पंतप्रधानपदी विराजमान झालेत आणि त्यांना जनरल कमर बाज्वा यांच्या इशाऱ्यावर गोलंदाजी करण्यावाचून पर्याय नाही. इमरान तेच करताना दिसतातम्हणूनच भारताने चर्चेसाठी पुढाकार घेऊनही त्या देशाने आपला हलकटपणा दाखवून दिला. येत्या काही काळात जम्मू-काश्मिरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत पृष्ठभूमीवर भारतविरोधी पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांच्या साहाय्याने अडथळे आणण्याचे प्रकार केले जातीलच. नुकत्याच झालेल्या भारतीय जवानांच्यापोलिसांच्या हत्या पाकिस्तानच्या याच कपटकारस्थानाची रंगीत तालीम. भारताने पाकिस्तानचा एक डाव हाणून पाडत चर्चा तर रद्द केलीपण विघ्न अजूनही संपलेले नाही. त्यामुळेच पुढच्या काही दिवसांत अधिक सज्ज राहणेहाच हे विघ्न दूर करण्याचा उपाय असू शकतो, असे म्हणावे लागेल




No comments:

Post a Comment