पाकिस्तानी नागरिकांचा इमरान
खानवरप्रचंड विश्वास असून ते पाकिस्तानात बदलाचेवारे आणतील, अशी त्यांची आशा आहे.
पण, इमरान खान रुढीप्रिय आणि मूलतत्त्ववादी
मंडळींच्या गोतावळ्यातच वावरताना दिसतात. इमरान खान एक चतुर राजकारणी असले तरी
त्यांच्यात चिकाटी मात्र नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तानातील
अल्पसंख्यांकांच्या हिताची अपेक्षा करणे हे भाबडेपणाचे लक्षण ठरेल.
दि. ५ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या कायदेमंडळातील
सदस्यांनी नवनियुक्त पाकिस्तानी सरकारला जनजातीय आणि धार्मिक अल्पसंख्याकांना
समानता आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी प्रयत्नशील
राहण्याचा मोलाचा सल्ला दिला. ‘साऊथ एशिया मायनॉरिटिस
अलायन्स फाऊंडेशन’ आणि ‘वॉईस ऑफ कराची’
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द मायनॉरिटिस डे
ऑन हिल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमेरिकेतील कायदेमंडळाच्या सदस्यांनी
इमरान खान सरकारला कराची, बलुचिस्तान,खैबरपख्तुनख्वा
प्रांतांसह देशभरातील अल्पसंख्याकांच्या मानवी अधिकारांचे हनन थांबविण्याची सूचना
केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविलेल्या
अमेरिकन काँग्रेसचे ज्युनिअर थॉमस गॅरेट यांनी पाकिस्तानसह जगभरातील राष्ट्रांना
त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांना सन्मानपूर्वक, प्रतिष्ठेची
वागणूक आणि समान मानवाधिकार प्रदान करण्यासंबंधी आवाहन
केले. ते म्हणाले की, “मुहाजिरांनी
(१९४७ च्या फाळणीवेळी भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले मुस्लीम) एक
चांगले आयुष्य मिळेल म्हणून त्यांचे घरदार आणि सगळे काही मागे सोडले. पण, नवीन मायभूमीमध्ये मात्र त्यांचे अजिबात स्वागत करण्यात आले नाही.”
दुसरी एक घटनाही पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर
होणाऱ्या अत्याचारांची साक्ष देते. पाकिस्तानवर कोसळलेल्या विविध आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी आर्थिक
सल्लागार मंडळाची स्थापना याच महिन्यात इमरान खान सरकारने केली होती. या १८ सदस्यीय आर्थिक सल्लागार मंडळात धर्माने अहमदीया मुस्लीम असलेल्या
प्रिन्स्टन विद्यापीठातील आतीफ मियान यांची मात्र सल्लागारपदावरून कालांतराने
हाकालपट्टी करण्यात आली. मुस्लीम कट्टरपंथी विचारधारेच्या ‘तेहरिक-ए-लब्बाईक’ (टीएलपी) या पक्षानेही मियान
यांच्या नियुक्तीला विरोध केला. आतीफ मियान अहमदीया या
अल्पसंख्याक जातीसमूहातील मुस्लीम असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीविरोधात रस्त्यावर
उतरून तीव्र निदर्शनेही करण्यात आली. ‘टीएलपी’ हा इस्लामिक कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातत्याने आग्रही राहिलेला पाकिस्तानमधील एक राजकीय आणि कट्टरपंथी
विचारांना खतपाणी घालणारा पक्ष. पण, या प्रकरणावरून टीका होताच इमरान खान सरकारने घुमजाव करत मियान यांची
सल्लागारपदी पुन्हा नियुक्ती केली. त्यामुळे निवडणूक
प्रचारात अहमदीया-विरोधी भावनांना हवा देणारेइमरान खान एक सहिष्णू सरकार चालवतील
आणि या मुस्लीमबहुल देशात कट्टरवादाला थारा देणार नाहीत, अशी किमान अपेक्षा तरी करायला हरकत नाही.
पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या हीन
वागणुकीचे आणखी एक उदाहण पाहूया. नोकरीसाठीच्या जाहिराती वाचून सहसा लोकांना आनंदच होतो. पण, ‘पाकिस्तानी रेंजर्स’च्या
एका जाहिरातीने लोकांची उत्सुकता अधिकच वाढवली. जिनांनी
स्थापन केलेल्या ‘डॉन’ या पाकिस्तानी
दैनिकात ‘पाकिस्तानी रेंजर्स’ (सिंध)
यांनी २६ ऑगस्ट, २०१८ रोजी वेगवेगळ्या पदांसाठी एक नोकरीविषयक
जाहिरात प्रसिद्ध केली. पण, या जाहिरातीतील सफाई
कामगारांच्या पदासमोरील तपशीलांनीच इतर नोकरीपदांपेक्षा सर्वांचेच लक्ष वेधून
घेतले. या जाहिरातीच्या तपशीलात ‘केवळ
मुस्लीमेत्तरांसाठी’ असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला होता. या जाहिरातीमुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्या असून
त्यांनी ‘डॉन’वर वर्णभेदी आणि
अमानवी मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सणसणीत टीकाही केली आहे.
पाकिस्तानातील
अल्पसंख्यांकाची आकडेवारी
ख्रिश्चन, हिंदू, अहमदीया, अनुसूचित जाती आणि इतर (शीख आणि पारशी मिळून) यांना पाकिस्तानात ‘अल्पसंख्याक’ म्हणून दर्जा देण्यात आला आहे.
२०१७च्या पाकिस्तानच्या जनगणनेनुसार, एकूण
लोकसंख्येपैकी १.५९ टक्के ख्रिश्चन, १.६०
टक्के हिंदू, अहमदी ०.२२ टक्के आणि अनुसूचित जाती ०.२५ टक्के यांचा अल्पसंख्याक म्हणून समावेश केला जातो. त्यातच इमरान खान हे इस्लामचे कडवे समर्थक आहेत. निवडणूक
प्रचारादरम्यानही खान यांनी उच्चरवाने ईश्वरनिंदाविषयक कायदे अधिकाधिक कडक
करण्याचा मुद्दा छेडल्याने अल्पसंख्याक समुदायांमध्येही आधीच काहीसे चिंतेचे
वातावरण निर्माण झाले होते. त्यातच मागील महिन्यात नेदरलँड्समधील गीर्ट विल्डर्स यांनी
प्रेषित मोहम्म्दांच्या चित्ररेखाटनासंबंधी एका स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली
होती. पण, कट्टर इस्लामसमर्थकांनी रस्त्यावर उतरून निदर्शन
करून पाकिस्तानला नेदरलँड्स सरकारला कडक शब्दांत या विरोधात समज देण्यास प्रवृत्त
केले. अखेरीस विल्डर्स यांनी सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा रद्द करणेच उचित
समजले.
असुरक्षित अल्पसंख्याक
कलाशा : या अल्पसंख्याक
जातीची संस्कृती जवळपास कालस्मृतीत गडप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्राल जिल्हा, खैबर पख्तुनख्वा तसेच हिंदूकूश
पर्वतरांगांच्या जवळपासवर्षभर बर्फाच्छिद क्षेत्रात या जातीच्या एकूण चार हजार
लोकांची वस्ती आहे. पण,त्यांच्या
शेजारी अफगाणिस्तानातील कफरिस्तानमधील सिया-पोश, जे ‘नुरसितन’ म्हणूनही ओळखले
जातात, त्याप्रमाणे कलाशा जातीसमुदायाने इस्लाम धर्म
स्वीकारलेला नाही.
झोरास्ट्रियन्स (पारशी): पाकिस्तानातील हा समृद्ध-संपन्न आणि तितकाच प्रभावशाली अल्पसंख्याक समाज. फाळणीनंतर १९५१ साली या
पारशींची लोकसंख्या वाढून ५ हजार १८ पर्यंत पोहोचली, पण
त्यानंतर ती सातत्याने घसरतच गेली. १९६१ साली ४ हजार
६८५ आणि १९९५ साली केवळ २ हजार ८२४ पारशी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असल्याचे आकडेवारी
सांगते.
शीख : आजघडीला शीख
समुदायाचे २० हजार नागरिक पाकिस्तानात वास्तव्यास असले तरी त्यांच्या
पाकिस्तानातील हेरिटेज वास्तुंचे प्रमाण दखलपात्र आहे. ननकना
साहिब, पेशावर आणि हसान अबदाल या जिल्ह्यात
प्रामुख्याने पाकिस्तानमधील शिखांची लोकसंख्या एकवटलेली आढळून येते. जातीधर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाच्या अनेक घटना पाकिस्तानात
प्रत्ययास येतात. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास,
दि. १३ जून, २०१८ साली पेशावरमधील
अल्पसंख्याक शीख समाजाविरुद्धच्या हल्ल्यांमुळे अनेक शिखांनी पाकिस्तानातील इतर
भागात स्थलांतराचा निर्णय घेतला.
बहाय : पाकिस्तानातील
अल्पसंख्याक समुदायातील हिंदू आणि ख्रिश्चनांनंतर तिसरा मोठा अल्पसंख्याक समुदाय
म्हणून बहाय समाजाकडे पाहिले जाते. माध्यमांमधील माहितीनुसार,
पाकिस्तानमध्ये या समुदायाचे ३३ हजार ७३४ नोंदणीकृत मतदार आहेत. १९७९ साली अयातुल्लाह खोमेनींच्या इराणमधील क्रांतीनंतर बहाय समुदायाचे
लोंढेच्या लोंढे पाकिस्तानमध्ये येऊन थडकले. एका अनिश्चित
अहवालानुसार, तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया-उल-हक
यांनी बहाय समुदायाला गैरमुस्लीमही ठरविले होते.
बौद्ध : पाकिस्तानी सरकारने
आतापर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात फार कमी प्रमाणात बौद्ध
धर्मियांची लोकसंख्या आढळून येते. २०१२च्या
माध्यमांमधील एका अहवालानुसार, केवळ १५०० बौद्धधर्मीय
पाकिस्तानात वास्तव्यास आहेत. २०१८ साली हा आकडा १ हजार ८८४ पर्यंत वाढला. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील बौद्ध
समुदाय हा केवळ पाकव्यापत काश्मीरमध्ये नावापुरता उरला असून पाकिस्तानातील एकमेव
बौद्ध मंदिर हे इस्लामाबादेतील राजनयीक क्षेत्रात आहे.
ख्रिश्चन : पाकिस्तानच्या एकूण
लोकसंख्येपैकी दीड टक्के इतके प्रमाण असलेले ख्रिश्चन धर्मीय मध्य पंजाबमध्ये
मुख्यत्वे वास्तव्यास आहेत. पाकिस्तानमध्येच इतर
प्रांतांत सध्या राहणाऱ्या ख्रिस्ती समुदायाची मूळंही मध्य पंजाबमध्येच आहेत.पाकिस्तानातील ईश्वरननिंदाविषयक कायद्यांचा सर्वाधिक त्रास हा
ख्रिश्चनधर्मियांना सहन करावा लागला आहे.
हिंदू : १९४१च्या जनगणनेनुसार,
२१ टक्के ‘जाती’ किंवा
उच्चवर्णीय हिंदू वास्तव्यास होते, तर ५.६ टक्के अनुसूचित
जातीतील हिंदू सिंध प्रांताचे निवासी होते. परंतु, १९५१च्या
पाकिस्तानच्या जनगणनेनुसार, जाती हिंदुंचे प्रमाण २१
टक्क्यांवरुन थेट तीन टक्क्यांवर आले. कारण,फाळणीच्या वेळी
तब्बल ७५ लाख हिंदुंनी भारतात स्थलांतर करणेच जीवंत राहण्याच्या दृष्टीने पसंत
केले. पाकिस्तानचा जनगणना विभाग‘हिंदू’
आणि ‘अनुसूचित जाती’ यांना
एकत्र न मानता स्वतंत्र दर्जा देतो. अनुसूचित जातीतील
समुदायही हिंदू धर्माचे पालनकर्ते असले तरी कडव्या इस्लामिक विचारधारेलाते मान्य
नाही. १९५१च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानात
एकूण ३ लाख ६९ हजार अनुसूचित जाती, तर एक लाख ६२ हजार
उच्चवर्णीय हिंदू पश्चिम पाकिस्तानात वास्तव्यास होते, तर
पूर्व पाकिस्तानात ५० लाख ५२ हजार (पूर्व बंगालच्या १२ टक्के लोकसंख्येइतके)
इतकी अनुसूचित जातींची, तर ४१ लाख ८७ हजार
(पूर्व बंगालच्या १० टक्के लोकसंख्येइतके) इतकी हिंदुंची लोकसंख्या अस्तित्वात
होती. म्हणूनच हिंदू आणि अनुसूचित जाती मिळून पूर्व
पाकिस्तानची लोकसंख्या २२ टक्के इतकी होती.
निष्कर्ष
पाकिस्तानात सरकारी तसेच गैरसरकारी
समाजकंटकांकडून अल्पसंख्यकांचा प्रचंड छळ होत आहे. अल्पसंख्याकांना मुद्दाम लक्ष्य करून
त्यांच्या हत्येचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये तालिबान,
इसिस, सुन्नी दहशतवादी गटांचा
प्रामुख्याने समावेश आहे. एकूणच पाकिस्तान फाळणीपासून हिंदू,
शीख, ख्रिश्चन, अहमदीया
किंवा इतर कोणत्याही अल्पसंख्याक जातीसमुदायासाठी असहिष्णू देशच ठरला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा इमरान खानवरप्रचंड
विश्वास असून ते पाकिस्तानात बदलाचेवारे आणतील, अशी त्यांची
आशा आहे. पण, इमरान खान रुढीप्रिय आणि मूलतत्त्ववादी
मंडळींच्या गोतावळ्यातच वावरताना दिसतात. इमरान खान एक चतुर राजकारणी असले तरी
त्यांच्यात चिकाटी मात्र नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तानातील
अल्पसंख्यांकांच्या हिताची अपेक्षा करणे हे भाबडेपणाचे लक्षण ठरेल.
No comments:
Post a Comment