Total Pageviews

Monday, 2 October 2017

जिहादींचा स्वर्ग! भारतात कट्‌टरवादी व धर्मांध जिहादींच्या दृष्टीने दोन स्वर्गभूमी आहेत- एक, देशाचा मुकुटमणी असलेले काश्मीर आणि दुसरे केरळ


October 3,
भारतात कट्‌टरवादी व धर्मांध जिहादींच्या दृष्टीने दोन स्वर्गभूमी आहेत- एक, देशाचा मुकुटमणी असलेले काश्मीर आणि दुसरे, थेट अगदी त्याच्या विरुद्ध टोकाला असलेले देशाचे शेवटचे टोक म्हणजे केरळ! या दोन्ही टोकांवर असलेल्या जागा मुस्लिम कट्‌टरवाद्यांच्या दृष्टीने स्वर्गाप्रमाणे असाव्यात, ही खरोखरच अभूतपूर्व गोष्ट आहे. अल् कायदा आणि इसिस या दोन धोकादायक संघटनांना अतिरेक्यांचा पुरवठा करणारी केंद्रे म्हणून या दोन राज्यांची गृहमंत्रालयाच्या दफ्तरी नोंद झाली आहे. सध्या केरळमधील १५ ते २० उच्च शिक्षित मुस्लिम युवकांनी तेथील कम्युनिस्ट सरकारची तसेच केंद्र सरकारचीही झोप पार उडविली आहे. हे सर्व युवक जगातील सर्वाधिक धोकादायक संघटना असलेल्या इसिसमध्ये सहभागी झाले असावेत, अशी दाट शक्यता आहे. इस्लामी दहशतवादाने जगात सर्वत्र हैदोस घातला असताना, इसिसचा मुख्य शत्रू असलेला भारत याच्यापासून कसा मुक्त राहू शकतो? डॉ. झाकिर नाईक, खा. ओवैसी यांच्यासारखी कट्‌टरवादी मंडळी आपल्या विखारी भाषणांनी मुस्लिम युवकांच्या भावना भडकवत असतील, तर केरळसारख्या संवेदनशील व मुस्लिमांची प्रचंड लोकसंख्या असलेल्या राज्यात त्याचे परिणाम होणारच आहेत. मध्यंतरी केरळमधील संघस्वयंसेवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमागे जिहादी कनेक्शन आढळून आले. तेथे कम्युनिस्ट शासन असल्याने ते जिहादींची पाठराखण करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्या राज्यात जिहादींचा अक्षरश: हैदोस सुरू आहे. तेथील ग्रामीण मुस्लिमबहुल भागाचे विश्‍लेषण केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येईल की, स्थानिक जनता भारतीय भाषा (मल्याळम्), संस्कृती, परंपरेपासून कशी दुरावेल आणि तेथील युवक कट्‌टर इस्लामी अस्मिता कशी जोपासतील, याचे पद्धतशीर शिक्षण मदरशाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेला महत्त्वाची संवेदनशील माहिती मिळाली आहे. व्ही. एस. अच्युतानंदन मुख्यमंत्री असताना केंद्र व राज्याच्या गुप्तचर यंत्रणांनी मदरशातील कट्‌टरवादी शिक्षणामुळे धर्मांध वृत्ती कशी फोफावत आहे, याचा विस्तृत अहवाल दिला होता. मात्र, नेहमीप्रमाणे मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणामुळे कुठल्याही सरकारने मदरशांवर कारवाई केली नव्हती. आज त्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसत आहेत. केरळमधील मल्लापुरम् जिल्हा १०० टक्के मुस्लिमबहुल कसा होईल, यासाठी इंडियन युनियन मुस्लिम लीगने सातत्याने प्रयत्न केले होते. तेथील अल्पसंख्य हिंदूंची हकालपट्‌टी करून किंवा त्यांना त्रस्त करून संपूर्ण जिल्हा मुस्लिमबहुल करण्यात आला आणि नंतर या जिल्ह्याला अल्पसंख्यकांचा जिल्हाम्हणून वेगळा दर्जा देण्याची मागणीही केली. केरळमधील इस्लामी दहशतवादाचे हे बीजारोपण होते. केरळात कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांनी मुस्लिमांचा अनुनय करण्याचेच धोरण अवलंबले. मूळचा केरळचा असलेला कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व कुख्यात दहशतवादी अब्दुल नासेर मदनीला तामिळनाडूत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, या मदनीचा कॉंग्रेस व कम्युनिस्टांना इतका पुळका आला की, १६ मार्च २००६ रोजी होळीच्या सुट्‌टीच्या दिवशी केरळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मानवतेच्या आधारेअब्दुल नासेर मदनीच्या सुटकेसाठी सर्वसंमतीने प्रस्ताव पारित करण्यात आला होता. राष्ट्रद्रोही गुन्हेगाराला पाठीशी घालणारी केरळची विधानसभा हे जगातील एकमेव उदाहरण असेल! ही अशी पार्श्‍वभूमी असताना तेजिहादी युवक इसिसकडे गेले, यात आश्‍चर्य ते का

No comments:

Post a Comment