Total Pageviews

Thursday 19 October 2017

भारताने रोहिंग्या हिंदूंची जबाबदारी घ्यावी नित्तेन गोखले


रोहिंग्या मुसलमानांच्या बाजूने सतत बोलणारे आपल्या देशातील सेक्‍युलर घटक रोहिंग्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर शांत आहेत. संकटग्रस्त रोहिंग्या मुसलमानान विषयी सध्या खुपकाही लिहिले जात आहे. हे लोक म्यानमार सोडून बांगलादेश, भारत, नेपाळ, मलेशिया, आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे युरोपला देखील पळून जात आहेत.
रोहिंग्या मुस्लिम म्यानमार मधील रखिने राज्यातील रहिवासी आहेत. आता, प्रश्न असा पडतो की प्रसार माध्यम त्यांना रोहिंग्या मुसलमानान म्हणुन का संबोधतात? हे सर्व लोक संकटात आहेत, त्यांच्या बद्दल बोलताना त्यांच्या धर्माचा उल्लेख करायची काय आवश्‍यकता? या दोन प्रश्नांची उत्तरे खूप महत्वाची आहेत आणि दुर्दैवाने प्रसार माध्यमाने या विषयाला खुप कमी महत्व दिले आहे.
रोहिंग्या हिंदूंना निर्दयीपणे मारण्यात आलं
म्यानमार मधील रखिने राज्यात मुसलमान, हिंदू व बौद्ध धर्माचे लोक राहतात. रोहिंग्या मुस्लिम म्यानमार मधून पळून चालले आहेत हे जगजाहीर आहे, परंतु, रखिने राज्यामधून हिंदू देखील पलायन करत आहेत व त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार होत आहेत.
ए-एफ-पी न्यूज आणि बीबीसीच्या वृत्तानुसार, रोहिंग्या दहशतवाद्यांनी उत्तर रखिने मधील हिंदू गावांवर हमले करुन अनेक लोकांना मारले आहे. शंभर हून अधिक लोकांना मारून गावाजवळ खड्डे खणून दफन करण्यात आले. म्यानमार आर्मीने देखील याची पुष्टी केली. यातील काही आतंकवादी नुकतेच पकडले गेले आहेत. यांना पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी प्रशिक्षण दिले आहे असे म्हटले जाते. हिंदू रहात असलेल्या गावांवर हमले झाले, आणि हल्ला करणाऱ्या लोकांनी चेहरे झाकले होते. पुरुषांना मारून टाकण्यात आले, महिलांवर बलात्कार देखील झाले. या आतंकवादी लोकांनी जिवंत सोडलेल्या महिलांना या हल्यामागे म्यानमार आर्मी आहे असे इतरांना सांगायला सांगितले. या हल्यांमुळे आम्हाला म्यानमार सोडण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता,असे वक्तव्य बांगलादेश मधील निर्वासित छावणी मध्ये राहणाऱ्या रोहिंग्या हिंदूं महिलेने बीबीसीच्या पत्रकारांशी बोलताना केले.
जगायचे असेल तर इस्लाम स्वीकारा
साधारण एक हजार हिंदू म्यानमार सोडून बांगलादेश मध्ये आले आहेत. आपले घर आणि आयुष्य सोडून बांगलादेश मध्ये आल्यावर देखील वाईट नशिबाने रोहिंग्या हिंदूंचा पिच्छा सोडला नाही. निर्वासित छावणी मध्ये रोहिंग्या हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे राहतात. धक्कादायक म्हणजे यातील हिंदू महिलांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावून धर्मपरिवर्तन करून त्यांना रोहिंग्या मुस्लिम छावणी मध्ये बंधक बनवून ठेवण्यात आले. सुदैवाने, काही महिला या जाळ्यातून सुटल्या आणि त्यांनी बाकी हिंदू महिलांना या बाबतीत सावध केले.
इंडिया टूडे समूहातील पत्रकारांशी बोलताना बांगलादेश मधील कॉक्‍स बाजार जवळील निर्वासित छावणीत राहणाऱ्या पूजा मुळीकहिने तिच्या बरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिली. तिला पळवले गेल्या नंतर तिच्या हातातील बांगड्या तोडण्यात आल्या, तिला तिचे कुंकू पुसायला लावले व तिला बुरखा घालायला लावला. त्या नंतर तिला दिवसातून पाच वेळा नमाज वाचायला लावली. जगायचे असेल तर इस्लाम स्वीकारायला लागेल असे तिला सांगण्यात आले होते. तिकडे अनेक हिंदू महिला अडकल्या होत्या. पहिली पळायची संधी मिळताच तिने त्या छावणीतून पलायन केले, असे पूजाने पत्रकारांना सांगितले.
बांगलादेशने आपली चूक कबूल केली
बांगलादेश अवामी लीगचे नेते मोहिबूल हसन यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. बांग्लादेशमधील निर्वासित शिबिरात राहणारे रोहिंग्या मुस्लिम समूहातील काही लोक म्यानमार मधुन आलेल्या हिंदू लोकांना लक्ष्य करतात याची त्यांनी कबुली दिली.
बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्री हसनुल हक इनू हे देखील भारतीय पत्रकारांशी बोलले. हिंदू आणि मुसलमान निर्वासित छावण्यांवर पोलिसांचे व आर्मीचे लक्ष आहे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, जबरदस्तीने हिंदूना धर्मपरिवर्तन करायला लावणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी आश्वासन दिले. बांगलादेश सरकार ने नुकतेच म्यानमार मधून आलेल्या (वीस) रोहिंग्या मुस्लिम दहशतवाद्यांना पकडून बांगलादेशचे येणाऱ्या सर्व शरणार्थी लोकांवर लक्ष आहे हे सिद्ध केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी बांगलादेश सरकारला होणाऱ्या घटनांवर प्रश्न विचारल्यामुळे काहीदिवस तरी रोहिंग्या हिंदू सुखरूप राहतील. पण, बांगलादेश आणि पाकिस्तान सारख्या इस्लामिक देशात हिंदूचे भविष्य चिंताजनक आहे हे सत्य कोणी फेटाळू शकत नाही.
हिंदूंना भारत सोडून हक्काचा दुसरा देश आहे तरी कोणता?
बीबीसी व इतर वृत्त वाहिन्यांवर म्यानमार आणि बांगलादेश मध्ये हिंदू लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या येताच मोदी सरकारने सूत्रे हलवली. म्यानमार तसेच बांगलादेश सरकारला रोहिंग्या हिंदू लोकांना संरक्षण देण्यास सांगण्यात आले.
यापुढे म्यानमार सोडून बाहेर पडणाऱ्या हिंदूनबाबत भारत सरकारने काय भूमिका घ्यावी या वर लेखक व आंतरराष्ट्रीय विषयांवरील तज्ज्ञ संदीप सिंग आणि मुंबईस्थित वकील आनंद पांडे यांच्याशी आम्ही नुकतीच चर्चा केली.
रोहिंग्या मुसलमानांना पुनर्वसन करण्यासाठी चाळीस हून अधिक इस्लामिक देश आहेत, यापेकी कुठेही जाण्याचा त्यांच्या समोर पर्याय आहे. मात्र, हिंदूनसाठी फक्त भारत हक्काचा देश आहे. मोदी सरकारनी हा मानवी हक्कांचा विषय असल्यामुळे सर्व रोहिंग्या हिंदूंना भारतात आणून त्यांना गरज पडल्यास नागरिकत्व देण्याचा विचार करावा,असे मत सिंग यांनी मांडले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून, गेल्या सत्तर वर्षांत संसदेत अनेक मुद्दे मांडले गेले. दुर्दैवाने, या कालावधीत कॉंग्रेस अथवा भाजप केंद्रात सत्तेत असताना बांग्लादेश, पाकिस्तान आणि इतर देशांमधून त्यांच्यावरील झालेल्या अत्याचारांमुळे भारतात येणाऱ्या हिंदूंना मदत करण्यासाठी कोणता ही कायदा बनवला गेला नाही. अशा निर्वासितांना भारतात आल्यावर वैद्यकीय सुविधा, शाळा (मुलांसाठी), नोकरी आणि इतर अंतरिम सुविधांची देखील गरज लागते. वर्तमान नागरिकत्व कायदाआश्रयाच्या शोधात भारतात येणाऱ्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळे पर्यंत सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांना सोडवण्यास असमर्थ आहे. सध्या, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशातून आलेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. त्यांची मुले शाळेमध्ये नावनोंदणी करू शकत नाहीत, कागदपत्रांवर परदेशीअसल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ देखील मिळू शकत नाही. त्यामुळे, विशेष शरणार्थी कायद्याची गरज आहे,” असे मत मुंबईस्थित वकील आनंद पांडे यांनी व्यक्त केले.
तसेच, भारतीय संविधानाच्या कलम मध्ये देखील काही गोष्टींमध्ये बदल करण्याची किंवा काही अटी व शर्ती अंतर्भूत करण्याची गरज आहे. कारण सध्या देशात अवैध पणे शिरलेले गैर हिंदू शरणार्थी या कलमाचा गैरवापर करून भारतात आश्रय मिळवायला भारतीय न्यायालयात याचिका दाखल करतात. देशामध्ये वाढत्या गुन्हेगारी वर ताबा ठेवायला आय. पी. सी मध्ये वेळेनुसार बदल केले गेले, पण दुर्दैवाने संविधानाच्या कलम कडे दुर्लक्ष झाले,” असे मुंबईस्थित वकील श्री आनंद पांडे म्हणाले. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आलेल्या पाच हजार हिंदू आणि शिख शरणार्थींना नागरिकत्व बहाल केले आहे. त्यामुळे संभाव्यतया, ते या दीर्घ प्रलंबित समस्येचे निराकरण करण्याबाबत गंभीर आहेत असे वाटत आहे.


No comments:

Post a Comment