Total Pageviews

Wednesday 15 June 2011

OSAMA BIN LADEN AN INTERVIEW ON THAR TV

अमित सामंत , रविवार , १२ जून २०११ओसामा बिन लादेनचा खातमा झाल्यानंतर अनेक रहस्यमय गोष्टी बाहेर पडत आहेत. त्यापैकीच ही एक -
अमेरिकेच्या सी.आय.ए. या संस्थेची जुळी बहीण असणारी सी.आय.बी. ही संस्था कुणालाच माहिती नाही, पण तिनेच लादेनची भेट घेऊन त्याचा खातमा करण्याचा दिवस, वेळ व मुहूर्त ठरविला होता. त्या वेळी हजर असणारा ‘ठार टी.व्ही.’चा मूळ भारतीय व सध्या अनिवासी (वनवासी) भेडचाप मायकेल याने लादेनची घेतलेली मुलाखत.
मायकेल : आपल्या बालपणीच्या आठवणी सांगा.
लादेन : आम्ही मित्र संगीतखुर्ची, क्रिकेट खेळत असू, त्यामध्ये हरणाऱ्या सहकाऱ्यांना किंवा संघाला गोळ्या मारायच्या, असा नियम होता. लपाछपी खेळताना तर गोळ्या खाव्या लागू नयेत म्हणून मी तोराबोरा पर्वतातही लपत असे. मला शोधण्यासाठी माझे वडील, आया, भावंडे व सहकाऱ्यांना कित्येक महिने लागत.
मायकेल : म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे; बरं, तुम्ही ‘दहशतवाद’ हेच ‘करिअर’ निवडण्याचे कारण?
लादेन : माझ्या ‘अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट’मध्ये माझा कल दहशतवादाकडे होता, पण या करिअरसाठी मला अमेरिकेची फार मदत झाली.
मायकेल : मग तुम्ही दहशतवादी हल्ल्यासाठी अमेरिकेऐवजी भारतासारख्या देशाची निवड का केली नाहीत?
लादेन : अमेरिकेत खूपच उंच इमारती आहेत, तसेच अमेरिकेची विमाने वेळेवर सुटतात व ती आदळण्यापूर्वी बंद पडणार नाहीत, याची खात्री असते आणि भारताविषयी बोलायचे तर भारतात गरिबी, भ्रष्टाचार, फुटिरतावाद व नक्षली यांनीच इतकी माणसे मरतात. मग मी माझे ‘स्कील’ काय दाखविणार? उरलेले डिपार्टमेंट ‘पाकिस्तान’ योग्य सांभाळत आहेच.
मायकेल : मरताना कसे वाटेल?
लादेन : पाकिस्तानवर विश्वास ठेवून फसल्यासारखे वाटतेय. येथे कोणीही सुरक्षित नाही. मी जर कसाबसारखा भारतात पकडलो गेलो असतो, तर आरामात १०० वर्षे बिर्याणी खात जगलो असतो.
वरील मुलाखत सी.आय.बी.च्या परवानगीने ‘ठार न्यूज’वर प्रक्षेपित केली जाईल आणि मुलाखतीदरम्यान ‘प्रेक्षक मरेपर्यंत’ जाहिराती दाखविण्यात येतील.
ता. क. लादेनला मारण्यासाठी सी.आय.ए.ने महाशक्तिमान ‘रजनीकांत’ची मदत घेतली होती काय, याचा आय.एस.आय. तपास करीत आहे

No comments:

Post a Comment