Total Pageviews

Wednesday 15 June 2011

india fourth most dangerous country in the world for women


महिलांसाठी धोकादायक देशांत भारत चौथा
लंडन - स्त्रीभ्रूण हत्या आणि मानवी तस्करी यामुळे महिलांसाठी धोकादायक असणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर पोचला असून, अफगाणिस्तान या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

"थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन'ने पाहणी करून ही यादी जाहीर केली आहे. अफगाणिस्तान हा महिलांसाठी सर्वांत धोकादायक देश ठरला आहे. त्यानंतर कॉंगो प्रजासत्ताक, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया यांचा क्रम आहे. या पहिल्या पाचमध्ये दक्षिण आशियातील तीन देश आहेत. पाच खंडांतील 213 तज्ज्ञांना महिलांसाठी जगातील कोणते देश धोकादायक आहेत याची क्रमवारी करण्यास सांगण्यात आले होते. महिलांना असणारा धोका, शारीरिक इजा, लैंगिक अत्याचार, समाजातील तसेच धर्मातील अनिष्ट प्रथा- रूढी- परंपरा, आर्थिक सहभाग आणि मानवी तस्करी या निकषांवर ही क्रमवारी करण्यात आली. स्त्रीभ्रूण हत्या, बालमृत्यू आणि मानवी तस्करी यामुळे भारत चौथ्या स्थानावर असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. वारंवार होणारे हिंसाचार, अपुऱ्या आरोग्यसुविधा आणि गरिबी यामुळे अफगाणिस्तान महिलांसाठी धोकादायक बनला आहे. हुंड्यासाठी होत असलेल्या महिलांच्या हत्या, ऑनर किलिंग आणि बालविवाह यामुळे पाकिस्तान यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतातील किमान दहा कोटी लोक मानवी तस्करीत अडकले आहेत, असे केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता 2009 मध्ये म्हणाले होते, असा उल्लेखही या पाहणीत करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 2009 मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 90 टक्के मानवी तस्करी देशांतर्गत आहे. देशात 30 लाख वेश्‍या असून त्यात 40 टक्के लहान मुली आहेत. जबरदस्तीने काम करायला लावणे आणि लग्न करायला लावण्याचे प्रकार घडत आहेत. देशात गेल्या शतकात पाच कोटी मुली स्त्रीभ्रूण हत्या व इतर कारणांमुळे जन्म घेऊ शकल्या नाहीत. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारतातील स्त्रियांची ही अवस्था पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"सोमालिया या यादीत पहिल्या स्थानावर नाही याचे मला आश्‍चर्य वाटते. इथल्यापेक्षा वाईट परिस्थिती कोणत्याच देशात असू शकत नाही.'
: मरयान कासीम, सोमालियाच्या महिला मंत्री

No comments:

Post a Comment