Total Pageviews

Tuesday 14 June 2011

government for vips

२० टक्के मुंबई पोलीस 'VIPरक्षणाय'मुंबापुरीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा का वाजलेत, यामागचं एक ठोस कारण समोर आलंय. सामान्य मुंबईकरांकडे पोलिसांचं दुर्लक्ष होण्यास राजकीय नेते आणि व्हीआयपी मंडळीच कारणीभूत ठरली आहेत, ठरत आहेत, असं म्हणता येईल. कारण, नेतेमंडळी आणि हायप्रोफाइल व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात केल्या जाणा-या पोलिसांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत तब्बल ३४० टक्क्यांनी वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय.
व्हीआयपी ड्युटीसाठी २००७ मध्ये ,२१३ पोलीस नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर दरवर्षी ही संख्या झपाट्यानं वाढत गेली आहे. २००८ मध्ये ,१७१ पोलिसांकडे व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली, २००९ मध्ये हे काम करण्यासाठी ,०८७ पोलिसांना धाडण्यात आलं आणि गेल्या वर्षी, २०१० मध्ये ,७३५ पोलीस मुंबईकरांऐवजी बड्या मंडळींच्या सुरक्षेत व्यग्र होते. चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच, ‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणायअसं ब्रीद मिरवणा-या मुंबई पोलिसांपैकी २० टक्के पोलीस फक्तव्हीआयपीरक्षणायअसल्याचंच चित्र आहे.
मुंबईची लोकसंख्या आज . कोटींच्या घरात आहे. त्यात गेल्या तीन-चार वर्षांत प्रचंड वाढ झाली. पोलिसांची संख्या मात्र अजूनही ४४ हजारच आहेत. पण, गुन्ह्यांच्या तपासाखेरीज व्हीआयपींच्या सुरक्षेचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडतोय आणि त्याचा परिणाम मनोधैर्यावर होतोय. एखाद्या केसवर पोलीस काम करत असतात. तेव्हाच व्हीआयपी ड्युटी लागते आणि ती पूर्ण करून येईपर्यंत केस बरीच पुढे गेलेली असते, त्याला वेगळं वळण लागलेलं असतं. तसंच, नव्या व्यक्तीला केस समजावून सांगणंही अत्यंत किचकट असतं. या सगळ्याचा परिणाम स्वाभाविकच तपासाच्या वेगावर होतो, याकडे एका पोलीस अधिका-यानं लक्ष वेधलं.
व्हीआयपी ड्युटीवरच्या पोलिसांना वर्षभरात सरासरी ३० ते ४० बंदोबस्ताची कामं असतात. त्यात त्यांचा पूर्ण दिवस जातो. कुठलाही नेता हमखास ते तास उशिरा येतो आणि सगळं वेळापत्रकच विस्कटून जातं, अशी नाराजी प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. काही पोलिसांनी तर एका वर्षात ८०-९० बंदोबस्ताच्या ड्युटी केल्याचं त्यांनी सांगितलं.
२०१० मध्ये अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांना मुंबईला भेट दिली. त्यावेळीही पोलिसांवर प्रचंड ताण पडला. पण विदेशी नेते कधीतरीच येतात, दिल्लीतली नेतेमंडळी दर आठवड्याला मुंबईत धडकत असतात. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या सुरक्षेसाठी २०१० मध्ये ,२६८ पोलीस तैनात करावे लागले होते. या ड्युटीशिवाय काही हायप्रोफाइल मंडळींना वैयक्तिक सुरक्षाही पुरवली जाते. २०१० मध्ये २१२ व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी ३६७ पोलिसांवर देण्यात आली होती. त्याआधीच्या वर्षांमध्ये हे प्रमाण आणखी जास्तच होतं. सुदैवानं, त्यावर गृहखात्यानं बंधनं आणली. अशीच कार्यवाही त्यांनी व्हीआयपी ड्युटीबाबतही करावी किंवा नुसत्या घोषणा करता पोलिसांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करताहेत. पण मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत सरकार किती गंभीर आहे, हे तुम्हा-आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे, नाही का

No comments:

Post a Comment