ON AN AVERAGE 100 INNOCENT PEOPLE GET KILLED BY ACCIDENTAL FIRING BY POLICE
मलबार हिलवर खळबळ...‘वर्षा’वर चुकून गोळी सुटलीमुख्यमंत्री
रेल्वे स्टेशनवर चहा विक्री करणा:या विजय भारत गायकवाड (वय 26, रा. न्यू धोंडिबावस्ती, रामवाडी) याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, रेल्वे सुरक्षा बल आरक्षकाच्या चार पोलीस शिपायांविरुद्ध रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, विजय गायकवाड हा दि. 30 मे रोजी रात्री 8 वाजता विजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजरमध्ये प्रवाशांना चहाची विक्री करीत होता. तेव्हा रेल्वे सुरक्षा बल आरक्षकाचे पोलीस शिपाई शिंदे, कपिल, चौगुले, पगारे (पूर्ण नाव नाही) हे रेल्वेत फिरत होते. विजय गायकवाड याला पाहताच त्यांनी तू येथे चहा विक्री का करतोस असे विचारले. व तू आमच्या सोबत चल म्हणून मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला असून, डोक्याला दुखापत झाली आहे.
तपास पो.हे.कॉ.नंदुरे करीत आहेत. विजय गायकवाड हा प्रवाशांना त्रास देत होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस स्टेशनमध्ये आणले असता स्वत: डोक्यात लोखंडी पट्टीने मारून घेतले आहे, अशी माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ यांनी दिली आहे
पृथ्वीराज चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलकडून नजरचुकीने हवेत गोळीबार होण्याची घटना काल रात्री घडली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला. दरम्यान, या प्रकाराची सहाय्यक आयुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे.
मलबार हिल पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेला कॉन्स्टेबल श्याम सोनवणे काल रात्री वर्षा बंगल्यासमोर डय़ुटीला होते. पावणेअकराच्या सुमारास त्यांच्या हातातील एसएलआर रायफलमधून अचानकपणे गोळी सुटली.
त्याच्या आवाजामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या इतरांनी त्या ठिकाणी धाव घेत रायफल ताब्यात घेतली. सोनवणेंना रात्री पोलीस ठाण्यात नेऊन त्याबाबत जबाब नोंदविण्यात आला. सहाय्यक निरीक्षक विश्वास कश्यप यांनी सोनवणे याने रायफल साफ करीत असताना चुकून गोळी सुटल्याचा जबाब दिला असल्याचे सांगितले.
मलबार हिल परिसरात अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती राहतात. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकाराची चौकशी गावदेवी विभागाचे सहाय्यक आयुक्तांकडून करण्यात येणार असल्याचे परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले

No comments:
Post a Comment