Total Pageviews

Wednesday, 1 June 2011

INDIA POSITIVE

इंग्लंडमध्ये एमबीए केल्यानंतरही जम्मू आणि काश्मीरमधील आपल्या गावाचा सरपंच होणार्‍या तरूणाचा आदर्श..
काही दिवसांपूर्वी राजस्थानातल्या एमबीए महिला सरपंच छवी राजावत यांचे छायाचित्र वर्तमानपत्रात झळकले होते. मोठय़ा पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्या आपल्या जन्मगावी आल्या. आता असेच आणखी एक उदाहरण समोर आले आहे. जम्मू विभागातील कांग गावाचे सरपंच गुरूमित सिंग बाजवा यांनीही इंग्लंडच्या डर्बिशायर येथून एमबीएची पदवी घेतली आहे. परदेशात नोकरी करावी आणि आयुष्याचे कल्याण करावे, ही आपल्या पालकांची इच्छा नाकारून गुरूमित आपल्या गावी आले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या 28 वर्षाचे गुरूमित बहुमाने सरपंच ाहे. वडील त्रिलोक सिंग पिपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते आहेत. ते राज्यसभेचे खासदारही होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे तिकिट त्यांना आरामात मिळू शकले असते. या विभागात त्यांचे कुटुंब वजनदार असल्यामुळे ते आमदारही होऊ शकले असते. पण गावाचा विकास करायचा, हा ध्यास घेतला असल्यामुळे सरपंच होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. देशाचा विकास साधायचा असेल, तर पहिल्या पायरीपासून सुरूवात केली पाहिजे असे गुरूमित यांचे मत आहे. या भागातल्या 90 टक्के सधन लोकांनी आपली नोंद दारिद्रयरेषेखाली केली आहे. त्यामुळे खरे गरीब वंचितच राहतात. ही पद्धत मोडून काढणे हे माझ्यासमोरचे पहिले आव्हान आहे, असे गुरूमित सांगतात. हे ऐकल्यावर छवी, गुरूमितसारखे तरूणच देशाचे भविष्य घडवू शकतात, याची खात्री पटते.

No comments:

Post a Comment