Total Pageviews

Monday 13 April 2020

तुम्ही कोण आम्हाला प्रश्‍न विचारणारे? तुम्ही कोण आम्हाला “संशयित’ ठरवणारे? आम्ही कुठेही जाऊ, कुणालाही भेटू. आम्हाला एवढी तपशीलवार माहिती आमच्या घरची मंडळीसुद्धा कधी विचारत नाहीत.-abhat

अबाऊट टर्न: कृतघ्न- तुम्ही कोण आम्हाला प्रश्‍न विचारणारे? तुम्ही कोण आम्हाला संशयितठरवणारे? आम्ही कुठेही जाऊ, कुणालाही भेटू. आम्हाला एवढी तपशीलवार माहिती आमच्या घरची मंडळीसुद्धा कधी विचारत नाहीत.


हिमांशू
तुम्ही कोण आम्हाला प्रश्‍न विचारणारे? तुम्ही कोण आम्हाला संशयितठरवणारे? आम्ही कुठेही जाऊ, कुणालाही भेटू. आम्हाला एवढी तपशीलवार माहिती आमच्या घरची मंडळीसुद्धा कधी विचारत नाहीत. आमचा असा जाहीर पंचनामा करणारे तुम्ही कोण? कसले कागद आणलेत तुम्ही सोबत? कसले फॉर्म? नाही देणार भरून. काय करायचं ते करा! आम्हाला काहीही झालेलं नाही आणि होणारसुद्धा नाहीजीवावर उदार होऊन करोनाग्रस्त विभागात फिरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही वाक्‍यं ऐकून बरं वाटत असेल ना? आपण एवढा धोका पत्करतो, त्याचं मनाजोगं फळ मिळालं म्हणून हे कर्मचारी स्वतःला कृतकृत्य समजत असतील.
ज्यांच्या रक्षणासाठी परिसरात पसरलेल्या विषाणूंची पर्वा न करता आपण उन्हातान्हात वणवण भटकतोय, तेच लोक नोंदणीसाठी नेलेल्या कागदाचे बोळे करून आपल्याच तोंडावर फेकतात, हे पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना आपली सेवा सार्थकी लागल्यासारखं वाटत असेल ना? असे काय प्रश्‍न विचारतात हे आरोग्य कर्मचारी? गेल्या आठ-पंधरा दिवसांतल्या प्रवासाचा तपशील, कुणाला कधी भेटलो याची माहिती, परगावाहून किंवा परदेशातून आलो असल्यास त्याचा तपशील, एवढंच ही मंडळी घरोघर जाऊन विचारतायत. मग त्यामुळे जणूकाही आपल्याला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जातीय, असा भास लोकांना का होतोय? गोपनीयता आपला हक्‍कच; पण हक्‍क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू ना?
अनेक शहरांमध्ये आज करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. पाश्‍चात्य देशांच्या तुलनेत रुग्णसंख्येचा आलेख एकदम चढलेला दिसत नाही; पण त्यामागे आपल्या यंत्रणेची धडपड हेच प्रमुख कारण आहे. अफाट लोकसंख्या आणि त्या तुलनेत आरोग्य सुविधांची असलेली कमतरता या पार्श्‍वभूमीवर रुग्णच वाढू द्यायचे नाहीत, हाच आपल्यापुढील राजमार्ग आहे. एखादा रुग्ण आढळतो, तेव्हा त्याच्या संपर्कात कोण-कोण आले होते, याची माहिती घेतली जाते. थेट परदेशातून आलेल्या लोकांची विशेष माहिती घेतली जाते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये असलेला सहभाग तपासला जातो. दाट लोकवस्ती असलेल्या भागांत अधिक काटेकोरपणे माहिती घेतली जाते, तर त्यात गैर काय? लोकांचा राग अनावर होण्याचं कारण काय? इंदूरसारख्या शहरात वृद्ध महिलेला तपासायला आलेल्या डॉक्‍टरांवर दगडफेक झाली.
अनेक राज्यांत आरोग्य कर्मचाऱ्यांशी लोकांनी उद्धट वर्तन केलं. ठेवणीतल्या शिव्या देऊन त्यांना पिटाळून लावलं. पुण्यासारख्या राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या गेलेल्या शहरातही असेच प्रकार घडावेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. विचारलेल्या प्रश्‍नांना प्रतिसाद मिळणं दूरच; उलट आम्हाला माहिती द्यायची नाही,’ असं सांगून लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हातातले कागद फाडले. काहीजण नर्सच्या अंगावर धावून गेले.

खरं तर सर्वेक्षण हा एक प्रकारचा औषधोपचारच. आज मुंबई-पुण्यात ही प्रक्रिया सुरू आहे, उद्या कदाचित राज्याच्या अनेक शहरांमध्ये तपशील बारकाईने तपासावे लागतील. पण आपल्याकडे क्वारंटाइन करणेसुद्धा लोकांना स्थानबद्ध केल्यासारखे अपमानास्पद वाटले. ही मान-अपमानाची भावना आली कुठून? चला, गंभीर होऊ. दाखवून देऊलॉकडाउन वाढवण्यामागचे गांभीर्य न कळण्याइतका हा महाराष्ट्र मागासलेला नाही. धोक्‍याची पर्वा न करता जे आपल्या हितासाठी घराबाहेर पडलेत, त्यांचाच अवमान करण्याइतका कृतघ्न तर नाहीच!

No comments:

Post a Comment