Total Pageviews

Wednesday, 15 April 2020

*निष्क्रीय भविष्याकडे*-दहा रुपयांत जेवण-100 यूनिट्स मोफत वीज-सरसकट कर्जमाफी--डॉ तुषार घाटे

सध्याच्या सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.
देशात सध्या जवळपास 67% लोकसंख्या तरुणांची आहे,हेच प्रमाण महाराष्ट्रातही आहे. ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाथी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महीना 600 रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी.... अशाने त्याची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे, ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े mobile, bike तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार ट्रम्प कसा चुकतो पासून गावातलया फ्लेक्सवर आपला फ़ोटो कोणत्या पोज़मध्ये टाकायचा याच चर्चेत असते...

आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या पक्षांच्या सतरंजया उचलायला उपलब्ध होणार. 

फुकट जेवण, फुकट वीज, सरसकट कर्जमाफी याने एक आख्खी पिढी बर्बाद होणार आहे. आणि अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा राहणार.....

कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे 5-6 टक्के करदाते आहेत ते भरणार......

स्विट्जरलैंडमध्ये 3-4 वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती, तेव्हा 77% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल, असे सांगून याला विरोध केला....

आपल्याला स्विट्जरलैंडचे सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द, कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो....

आपल्याला जर खरच स्वतःला आणि देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर
फुकटची मानसिकता सोडा
आणि अशी अफू देणाऱ्या व्यावस्थेला दूर करा

मी स्वतः ग्रामीण शेतकरी कुटुंबात जन्मलो आहे, तिथेच शिक्षण घेतले आहे, अन्न खाण्यासाठी पैसे नाहीत, 100 units चे बिल भरण्याचे पैसे नाहीत अशी अवस्था अपवाद सोडता कुठेही नाही, 
मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया , जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल करण्याचा धोका आहे.....

No comments:

Post a Comment