जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी चीनच्या पाठिंब्यावर मे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत WHO चे महासंचालक हे पद जिंकले.
चीनमुळे उद्भवलेल्या कोरोना व्हायरसची जबाबदारी चीन घेऊ इच्छित नाही आणि त्यांच्या या कृत्याला टेड्रोस यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्र संघटनेचा भरवसा असलेली जागतिक आरोग्य संघटना आपले समर्थन देतेय.
उलटपक्षी सर्व पुरावे असूनही, आपण त्यातले नाहीच असे चीन भासवत आहे. चीनमध्ये हा व्हायरस दुसऱ्या देशातून आला असल्याची चीन बोंब मारतोय. परदेशी विषाणूला चीन बळी ठरला असून त्यावर चीनने नियंत्रण मिळवले असल्याचे चीन सांगतोय.
चीनच्या या पारदर्शकतेचं टेड्रोस यांनी कौतुक केले आहे. एवढेच नाही तर चीनचा आपण सर्वानी आदर्श ठेवला पाहिजे असेही ते म्हणाले. चीनने जगापासून सत्य परिस्थिती लपवली असली तरी त्यावर भाष्य न करता पडदा टाकण्याकडेच त्यांचा कल आहे.
tedros_1 H x W
ज्या शास्त्रज्ञांनी डिसेंबरमध्ये या विषाणूचा शोध लावला त्या शास्त्रज्ञावर चिनी सरकारने दबाव टाकून या विषाणूविषयी सगळे पुरावे नष्ट करण्यास भाग पाडले. या विषाणूने सगळीकडे थैमान घालायच्या खूप आधी या शास्त्रज्ञाने लोकांना सावध करायचा प्रयत्न केला होता. त्याने याविषयी ऑनलाईन काही पुरावे दिले होते ते पुरावे चिनी सरकारने नष्ट केले. चीन सरकारवर टीका करणारा रिअल इस्टेट मधील एक मोठा माणूस तेव्हापासून गायब आहे.
२२ जानेवारीला चीनने वुहानमधील लोकांना प्रवास करण्यावर बंदी घालण्यापूर्वी जवळजवळ ७ दशलक्ष चिनी लोकांनी वुहान सोडून चीन आणि जगातील इतर ठिकाणी प्रवास करून या रोगाचा प्रसार केल्याचे द न्यूयॉर्क टाइम्स ने म्हटले आहे.
एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा रोग पसरत नाही किंवा एकमेकांना स्पर्श केल्याने हा रोग होत नाही अशी बतावणी सुरुवातीच्या काळात चीनने केली. आणि WHO ने त्याचीच री ओढली. आणि १४ जानेवारीला त्यांनी तसेच ट्विट केले. "चीनने या भयंकर आपत्तीला किती धीराने तोंड दिले आणि ज्याप्रकारे आपत्तीचे निवारण केले याकरिता चीन कौतुकास पात्र आहे. संपूर्ण जगाला चीनने उत्तम उदाहरण घालून दिले आहे." अश्या शब्दात टेड्रोस यांनी चीनचे जाहीर कौतुक केले.
चीनमधील भयंकर परिस्थितीकडे टेड्रोस यांनी डोळेझाक केली आणि जानेवारीमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग याना भेटून आल्यानंतर तर त्यांनी तेथील विषाणूच्या उद्रेकांविषयी चकार शब्दही न काढता चीनचे कौतुकच सुरु ठेवले असे द हिल वृत्तपत्राने म्हटले आहे.
टेड्रोस यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. टेड्रोस यांनी वेळेवर यात लक्ष घातले असते आणि योग्य तीच माहिती लोकांपर्यंत आली असती तर आज लोकांचे प्राण वाचले असते. निदान हा रोग साथीचा आहे किंवा तो एका माणसाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होणार आहे असे जरी त्यांनी जगाला सावध केले असते तरी हा रोग एवढा फैलावला नसता.
वुहान मधील परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आली असल्याचे चीन सांगत आहे आणि आता WHO तीच गोष्ट लोकांच्या मनावर ठसवत आहे. परंतु चिनी अधिकारी पुन्हा एकदा जगाला फसवत असल्याचे वुहान येथील डॉक्टरांनी जपानी मीडियाला सांगितले.
टेड्रोस यांचे चीनशी संबंध ही काही नवीन बाब नाही. इथिओपियाचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी चीन सोबत काम केले आहे. इथिओपियामध्ये आरोग्यमंत्री म्हणून काम पाहत असताना तीन वेगवेगळ्या कॉलराच्या साथींकडे त्यांनी निवडणुकीच्या धामधुमीत लक्ष न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या साथी पसरलेल्या असतानाही त्यांनी त्या नियंत्रित करायच्या ऐवजी WHO च्या निवडणुकीवर भर दिला. WHO चं प्रमुख पद केवळ पब्लिक हेल्थ मध्ये पीएचडी मिळवलेल्या माणसालाच मिळते. असे असूनही टेड्रोस हे डॉक्टर असूनही हे पद त्यांना मिळाले.
WHO चा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यात टेड्रोसने संयुक्त राष्ट्रसंघाचे गुडविल अँबॅसिडर म्हणून झिम्बाब्वेचे माजी हुकूमशहा रॉबर्ट मुगाबे यांची नियुक्ती करावी म्हणून आग्रह धरला. मुगाबे हे मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे कुख्यात नेता म्हणून ओळखले जातात. नंतर आंतरराष्ट्रीय प्रक्षोभामुळे त्यांना त्यांचा आग्रह मागे घ्यावा लागला. मुगाबेच्या नाव ही एक राजकीय चाल होती. मुगाबेचे अनेक वर्ष चीनशी मित्रत्वाचे संबंध होते. पन्नास किंवा त्याहून अधिक आफ्रिकन राज्यांनी टेड्रोसच्या नेमणुकीला पाठिंबा दिला होता.
वॉशिंग्टन पोस्टच्या स्तंभलेखक फ्रिडा घिटिस यांनी म्हटलेय," टेड्रोस यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या डेव्हिड नाबारो या इंग्लंडच्या उमेदवाराला हरविण्यासाठी चीनने पडद्यामागून खूप सूत्रे हलविली. टेड्रोस जिंकून यावेत म्हणून चीनने अथक परिश्रम केलेत. टेड्रॉसचा विजय हा बीजिंगसाठीही विजय होता ज्याद्वारे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आपली जगावरील पकड घट्ट करण्यास मदत झाली."
एवढेच नाही तर अमेरिका आणि इतर देशांनी आपल्या सीमा चीन साठी बंद केल्या तेव्हा टेड्रोस यांनी त्या देशांना खडे बोल सुनावले.
" आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवास यांच्याबाबतीत असे निर्बंध लादण्याची काही गरज नाही. आम्ही सर्व देशांना पुराव्यावर आधारित कृती करण्यासाठी आवाहन करतो," असे ते म्हणाले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या विषाणूला " परदेशी विषाणू" असे संबोधले तेव्हा WHO ने त्यांना फटकारले. लगेचच १७ मार्चच्या आपल्या ट्विट मध्ये WHO ने ," व्हायरस कोणत्याही एका राष्ट्राचा नसतो हे लक्षात ठेवा." असे ट्विट केले. आणि त्यांचे हे ट्विट चीनच्या मीडियाने उचलून धरले.
डब्ल्यूएचओचे एक संचालक माईक रायन म्हणाले, “विषाणूंना कोणतीही सीमा नसते, तो कोणत्याही एका वंशाचा नसतो, तुमच्या त्वचेचा रंग किंवा तुमच्याकडे किती पैसे आहे हे तो पाहत नाही. सर्वानी एकत्र येऊन या विषाणूशी लढण्याची गरज आहे. इथे कुणा एकालाच दोषी ठरविता येणार नाही."
चीनने आपलं एक बाहुलं WHO च्या संचालक पदी बसवलं आहे. चीन जसं नाचवेल तसं ते नाचणार आहे. यापुढे WHO च्या रिपोर्ट्स वर विश्वास ठेवताना नीट विचार करण्याची गरज आहे.
- प्राची चितळे जोशी.
No comments:
Post a Comment