Total Pageviews

Friday, 6 March 2020

‘हिंदूफोबिया’चे जनक माध्यमेच!-tarun bharat

पन्नासपेक्षा अधिकांचा बळी घेणाऱ्या दिल्लीतील दंगलीत सर्वाधिक नुकसान हिंदूंचे झाले व सर्वाधिक धुमाकूळ मुस्लिमांच्या दहशतवादी गटाने घातला. तरीही डाव्या डबक्याची पैदास असलेल्यांनी हिंदूंवरच निशाणा साधण्याचे काम केले. तसेच कितीतरी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या हिंदूंना ‘मारेकरी’ आणि मुस्लिमांना ‘मासूम’ ठरवण्यासाठीच राबल्या.
“दुर्दैवाने ‘हिंदूफोबिया’ अस्तित्वात असून काँग्रेस आणि राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारी अभियानातही मला त्याचा प्रत्येकवेळी अनुभव आला. आपल्या देशात हिंदूंना काय भोगावे लागते, हे दर्शवणारे इथे केवळ एक उदाहरण दिसत आहे. परंतु, आपले राजनेते आणि प्रसारमाध्यमे याला (हिंदूफोबियाला) केवळ सहनच करत नाही तर चिथावणी देतात,” असे ट्विट अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड यांनी केले. मात्र, तुलसी गॅबार्ड यांच्यावर अमेरिकेसारख्या उदारमतवादी देशातील हिंदू धर्मद्वेषी वास्तव जगासमोर आणण्याची वेळ का आली? असे काय घडले की, अमेरिकेतील अन्यधर्मीयांत ‘हिंदूफोबिया’ ची भावना बळावू लागली? अमेरिकन जनतेत ‘हिंदूफोबिया’ पसरविण्यात सर्वाधिक हातभार नेमका कोणी लावला? तर अमेरिकेतील एका महिलेने तिला आलेला अनुभव फेसबुकच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला असून तिची पोस्ट सायकिअॅट्रिस्ट असलेल्या डॉ. शिनी अम्बार्डर यांनी आपल्या ट्विटर खात्यावर सामायिक केली आहे. तुलसी गॅबार्ड यांनी डॉ. शिनी अम्बार्डर यांच्या याच पोस्टवर आपले मत व्यक्त केले आणि ‘हिंदूफोबिया’ चे सत्य नागरिकांसमोर आणले.

ज्या पीडित महिलेने ही पोस्ट आपल्या फेसबुक खात्यावर लिहिली, तिने एके ठिकाणी जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली होती व टॅक्सीचालकानेदेखील ती भारतीय असल्याची खात्री केली होती. नंतर निर्धारित वेळेत टॅक्सी आलीदेखील व पीडिता त्यात बसलीही. मात्र, ती टॅक्सीत बसल्या बसल्या चालकाने दिल्लीतील दंगलीचा विषय काढला व तो हिंदूंनाच गुन्हेगार ठरवू लागला. दिल्लीतील दंगलीवेळी हिंदूंनी मुस्लिमांना लक्ष्य केले, मुस्लिमांचा बळी घेतला, मुस्लिमांच्या मशिदी पाडल्या, असे आरोप यावेळी उबेरचालकाने केले. पुढे संबंधित महिलेने चालकाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्याला दिल्लीतील दंगलीची पुरेशी माहिती नसल्याचे सांगत हिंसाचाराचे वास्तव कथनही केले. मात्र, महिलेचे उत्तर ऐकून शांत बसण्याऐवजी चालकाने उलट तिच्यावरच सगळा राग काढला व हिंदूंचा बचाव करण्यावरून तो तिला अद्वातद्वा बोलू लागला. तसेच प्रवासी महिलेला व तिच्या बहिणीलाही त्याने टॅक्सीतून उतरायला सांगितले. नंतर, संबंधित महिलेने उबेरचालकाचे आक्रस्ताळे वर्तन पाहून पोलिसांना बोलावले, तेव्हा कुठे तो शांत झाला. आपला हाच अनुभव पीडितेने फेसबुकवर लिहिला असून या सगळ्याला आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले एकतर्फी व खोटारडे वार्तांकन जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.

तथापि, हिंदूंबद्दल घृणा, द्वेष, तिरस्कार आणि अफवा पसरवणारे वृत्तांकन केवळ अमेरिका, ब्रिटनच नव्हे, तर भारतातील अनेक माध्यमांनीही केले. ब्रिटनमधील ‘द गार्डियन’, ‘बीबीसी’, अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, कतारमधील ‘अल जझिरा’ सह कितीतरी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या हिंदूंना ‘मारेकरी’ आणि मुस्लिमांना ‘मासूम’ ठरवण्यासाठी राबल्या. धक्कादायक म्हणजे दिल्ली दंगलीचे आंतरराष्ट्रीय माध्यमांतील सर्वाधिक एकांगी आणि खोटारडे वार्तांकन भारतीय पत्रकारांनीच आपल्या विषारी शब्दांत केले व त्यासाठी त्यांना हजारो डॉलर्सच्या रूपात घसघशीत बिदागीही मिळाली. अनेक स्तंभलेखकांनी पैसा कमावण्याची ‘हीच ती वेळ’ असा विचार करत हिंदूंविरोधात पिसाळल्यागत दुष्प्रचारही केला. पत्रकारितेची सगळीच तत्त्वे मुस्लिमांच्या शेरवानीला चिकटवणारी भारतीय माध्यमे व पत्रकारही यात अजिबात मागे नव्हते. ‘एनडीटीव्ही’, ‘अल्ट न्यूज’, ‘द प्रिंट’, ‘द क्विंट’, ‘द वायर’ आणि ‘बीबीसी’ तसेच रवीश कुमार, राणा अय्युब, शेखर गुप्ता, सिद्धार्थ वरदराजन, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, आरफा खानम शेरवानी यांपासून ते मराठीतल्या हिंदूद्वेष्ट्या माध्यमांनीही यावेळी आपला कंड शमवून घेतला. उल्लेखनीय म्हणजे, संबंधित माध्यमांच्या युट्युब, फेसबुक, ट्विटर वगैरे खात्यांवरील अशा एकतर्फी वार्तांकनावर वाचकांनी टीकेचा भडिमारही केला. परंतु, गटारात डुंबण्याची हौस असलेल्या वराहांना आपल्या अंगाखांद्यावरची घाणच सुसह्य वाटत असते, त्याप्रमाणे वाचकांकडून शिव्या खाऊनही आपले निर्ढावलेपण या माध्यमांनी व पत्रकारांनी जोपासले.
वस्तुतः दिल्लीतील दंगल कोणी घडवली, भडकावली याची संपूर्ण माहिती तथ्यांसह सर्वांसमोर आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल आणि आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या कोणी केली, तेदेखील उजेडात आलेले आहे. तसेच पिस्तुलातून गोळ्या झाडणाऱ्या शाहरुख मोहम्मदलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहीर हुसेन, काँग्रेसची स्थानिक नेता इशरत जहाँ यांनाही अटक केली. सोबतच सोनिया गांधींपासून शरजील इमाम, उमर खालिद, वारिस पठाण आणि भाजप नेत्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या हर्ष मंदेरचे हिंसेला प्रवृत्त करणारे व्हिडिओही सार्वजनिक झाले. पन्नासपेक्षा अधिकांचा बळी घेणार्‍या या दंगलीत सर्वाधिक नुकसान हिंदूंचे झाले व सर्वाधिक धुमाकूळ मुस्लिमांच्या दहशतवादी गटाने घातला. तरीही डाव्या डबक्याची पैदास असलेल्यांनी हिंदूंवरच निशाणा साधण्याचे काम केले. रवीश कुमारसारख्या निर्लज्जाने मोहम्मद शाहरुखला वाचवण्यासाठी अन्य एका हिंदू तरुणालाच हल्लेखोर ठरविण्याचा उद्योग केला. परंतु, पोलीस तपासणीत तो शाहरुखच असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे आता रवीश कुमार यांनी खोटा प्रचार करण्यावरून स्वतःचे तोंड काळे करून घ्यावे. ‘द वायर’ने तर एक पाऊल पुढे जात ताहीर हुसेनच्या बचावासाठी मैदानात उतरत त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘द प्रिंट’ नेही असेच काम केले आणि म्हणूनच कपिल मिश्रा यांनी त्या माध्यमाला मुलाखत द्यायला नकार दिला. पत्रकारितेतील शतवर्षीय वारसा सांगणार्‍या ‘बीबीसी’ नेदेखील दंगलकाळात एकच हिंदूविरोधी व मुस्लीमप्रिय बाजू लावून धरली, त्यामुळेच प्रसार भारतीच्या सीईओंनी ‘बीबीसी’ च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण धुडकावून लावले. म्हणजेच ही विशिष्ट विचारसरणी घेऊन चालणारी माध्यमे आपल्या हिंदूद्रोही अजेंड्यासाठीच काम करत असल्याचे दिसते आणि त्याचाच प्रभाव आंतरराष्ट्रीय माध्यमांवरही पडला.


अर्थात छद्म धर्मनिरपेक्षतावादी जमात-ए-पुरोगाम्यांची न्यायिक सक्रियता सदासर्वकाळ हिंदूंवर अन्याय करणारी आणि मुस्लिमांचे मुके घेणारीच असते. कधी ही मंडळी बुद्धीजीवी, विचारवंत, अभ्यासकांच्या रूपात आपल्यासमोर येतात तर कधी पत्रकार, स्तंभलेखकाच्या रूपात! जिथे पाहावे, तिथे हिंदूंविरोधात बेधडकपणे घृणास्पद बातम्या पेरण्याचे, बनावट कहाण्या प्रसारित करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. जेणेकरून सर्वसामान्य पापभिरू हिंदूंच्या मनात अपराधगंडाची भावना निर्माण व्हावी आणि मुस्लिमांसकट इतरांतही हिंदूविरोधाची लागण व्हावी. दंगल वा हिंसाचाराच्या घटनाक्रमावेळी खरे म्हणजे माध्यमांची जबाबदारी वास्तव समोर आणण्याची, निष्पक्ष वृत्तांकन करण्याची असायला हवी. परंतु, मुस्लिमांचे लांगूलचालन केवळ राजकारण्यांनीच नव्हे, तर माध्यमांनीही सुरू केल्याने ते आपली व्यवसायनिष्ठाही विसरले आणि त्यांनी आगीत तेल ओतण्याचे कामही केले. मात्र, माध्यमांच्या या चुकीच्या वार्तांकनामुळे भारताची जितकी बदनामी होत आहे, तितकेच हिंदूंना खलनायक ठरवण्याचे कामही सुरू आहे. परिणामी, आपल्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही अन्य धर्मीयांवर आक्रमण न करणार्‍या, सर्वांच्या सर्वप्रकारच्या ईश्वरोपासनेला मान्यता देणार्‍या सहिष्णू हिंदू धर्माविरोधातच लोक आक्रमक होताना दिसतात. तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकेतील हिंदू महिलेला आलेला जो अनुभव सामायिक केला, तो याचाच दाखला. अशावेळी हिंदूंनीच आपल्या एकीच्या बळावर चुकीच्या बातम्या देणाऱ्या, खोटे-नाटे आरोप करणाऱ्यांना वैध मार्गाने धडा शिकवायला हवा. दुसरीकडे एकांगी प्रचार करणाऱ्या माध्यमांच्या कळपात सामील न होता काही वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या वस्तुनिष्ठ वृत्तांकनही करत आहेतच. परंतु, अशा माध्यमांच्या आणि हिंदूहिताची भाषा करणाऱ्या राजकारण्यांच्या मागे हिंदूंनीच एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे. जेणेकरून फायदा नाही तर हिंदूंचे नुकसान तरी होणार नाही, हिंदूंना कोणी विनाकारण आरोपी, दोषी ठरवणार नाही नि हिंदूंना कोणी जाणूनबुजून लक्ष्य करणार नाही.


No comments:

Post a Comment