Total Pageviews

Saturday, 21 March 2020

जनता कर्फ्यूचे पालन करा दिनांक :22-Mar-2020 अभिजित वर्तक-TARUN BHARAT


धोकादायक कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.
जनता कर्फ्यू म्हणजे काय?
‘जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी सकारात्मक वृत्तीने आणि स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला पाहिजे. कारण जनता कर्फ्यूला वैज्ञानिक आधार आहे. खुद्द इंडियन मेडिकल असोसिएशनने यावर शिक्कामोर्तब केले आहे. रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासीयांना जनता कर्फ्यूचे पालन करायचे आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मोदींनी केले आहे. हा प्रयोग आपला आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पार पाडण्याच्या संकल्पाचे एक मजबूत प्रतीक असेल, असेही मोदींनी सांगितले आहे.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेवढा आपण सार्वजनिक संपर्क टाळू तसेच कमीत कमी लोकांशी संपर्कात येऊ तेवढा विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंत संपूर्ण जगात 10 हजारांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णसं‘या 281 पर्यंत पोहोचली आहे तर चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ही सं‘या कमी दिसत असली तरी धोका पत्करण्यात काहीही अर्थ नाही.
कारण भारतातील अपुरी डॉक्टरांची सं‘या, कमी परिचारिका, अपुरे बेड तसेच अपुर्‍या प्रयोगशाळा आणि मर्यादित वैद्यकीय संसाधने यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी भारताला प्रचंड अडचणी येणार आहेत. इटली, स्पेन, इंग्लंड, अमेरिकेसार‘या बलाढ्य देशांना कोरोनाशी लढता लढता नाकी नऊ आले आहे. तेव्हा 130 कोटी लोकसं‘या असलेल्या भारताची स्थिती कशी होऊ शकते याची कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा सध्यातरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांशी संपर्क टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळेच रविववारच्या जनता कर्फ्यूचे पालन आपण कटाक्षाने केले पाहिजे.
 कोरोनाचे एकूण एकूण 4 टप्पे
पहिला टप्पा
चीनमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा विषाणू वेगाने जगभरात पसरत आहे. कोराना विषाणू संक‘मित असलेल्या देशांमध्ये वास्तव्य असल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही अधिक असते. तसेच त्याचा संसर्ग झाल्यास इतरांना देखील तो होण्याचा धोका अधिक आहे. भारतात कोरोना विषाणू हा बाहेरून आला आहे. पहिल्या टप्प्यात हा विषाणू एखाद्या ठिकाणी शिरकाव करतो.
दुसरा टप्पा
सध्या भारतात दुसर्‍या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक‘मित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे.
तिसरा टप्पा
तिसर्‍या टप्प्यात कोरोना हा देशात असलेल्या व्यक्तींमुळे पसरतो. म्हणजेच स्थानिक व्यक्तींकडून जेव्हा हा आजार दुसर्‍या व्यक्तींना होण्यास सुरुवात होते. भारतात सध्या दुसर्‍या टप्प्यात आहे. मात्र संसर्ग झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढत राहिला तर तो तिसर्‍या टप्प्यात जाईल आणि त्यासोबतच नियंत्रण मिळवण कठीण होईल. तिसर्‍या टप्प्यात सरकारला मॉल, दुकाने, शाळा आणि गर्दीची ठिकाणे सक्तीने बंद करावी लागतात. सुदैवाने सरकाने हा निर्णय आधीच घेतला आहे. मात्र, त्यात सरकारला पूर्णपणे यश आलेले नाही. कारण सर्वसामान्य लोकांच्या बेजबाबदारपणा आणि बेफिकीर वृत्तीमुळे लोक हॉटेल, पानटपर्‍या किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीतच आहेत. म्हणूनच जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक आहे.
चौथा टप्पा
सध्या अनेक देशांमध्ये कोरोना हा वेगाने पसरला असून मृतांची सं‘या देखील सातत्याने वाढत आहे. त्या देशात कोरोना चौथ्या टप्प्यात आहे. जेव्हा व्हायरस हा अत्यंत वेगाने देशात भौगोलिकरित्या पसरतो तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचतो. चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरस हा चौथ्या टप्प्यात आहे.
टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद अवश्य करा
टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करून कोरोनाविरुद्ध लढणार्‍यांना प्रोत्साहन देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टर्स व परिचारिका, सरकारी कर्मचारी, पोलिस, माध्यमे यांचे मनोधैर्य वाढते. तेव्हा या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता पाच मिनिटे लोकांनी गॅलरीत, गच्चीत, दरवाजे, खिडक्यात उभे राहून अवश्य टाळ्या, थाळ्या वाजविल्या पाहिजेत आणि घंटानाद केला पाहिजे. सरकारबरोबरच लोकांची इच्छाशक्ती, मनोबल आणि धैर्य या गुणांच्या बळावर आपण भारतीय नक्कीच कोरोनाला परतवून लावू आणि याची खात्री प्रत्येकाने बाळगली पाहिजे

No comments:

Post a Comment