Total Pageviews

Thursday 12 March 2020

छत्रपती शिवाजी महाराज बलशाली युगपुरुष-कर्नल अनिल आठल्ये -NAVSHAKTI

छत्रपती शिवाजी महाराजांची युध्दनीती ही त्याआधीच्या इतिहासाला ङ्गारकत देणारी, यशस्वी अशी युध्दनीती होती. जगाच्या इतिहासात छोट्या सैन्याने मोठ्या सैन्याचा पराभव करण्याच्या मोजक्या उदाहरणांमध्ये महाराजांच्या लढायांचा आवर्जून समावेश होतो. याशिवाय महाराजांच्या शारीरिक सामर्थ्याचा पैलू ङ्गारसा चर्चिला गेला नसला तरी अभ्यासण्याजोगा आहे. जयंतीनिमित्त घेतलेला या बलशाही युगपुरुषाच्या पैलूंचा वेध…
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं कार्य आणि विशेषत: त्यांची युध्दनिती या बाबी आजही तितक्याच प्रेरक आणि आचरणात आणण्याजोग्या आहेत. त्यात शिवाजी महाराजांची युध्दनिती ही त्याआधीच्या इतिहासाला ङ्गारकत देणारी आणि यशस्वी अशी युध्दनिती होती. महाराजांनी कधीही शत्रूनं ठरवलेल्या वेळी किंवा ठिकाणी युध्द केलं नाही. प्रत्येक युध्दामध्ये शत्रूला त्यांनी ठरवलेल्या जागी आणि वेळी युध्द करण्यास भाग पाडलं. अगदी प्रतापगडच्या युध्दापासून अनेक लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यानं शत्रूपेक्षा संख्येनं कमी असूनसुध्दा विजीयश्री मिळवली. जगाच्या इतिहासात छोट्या सैन्याने मोठ्या सैन्याचा पराभव करण्याची जी काही मोजकी उदाहरणं आहेत, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांच्या आवर्जून समावेश होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरूवातीच्या काळात तोङ्गखाना आणि हत्ती तसंच इतर दारूगोळा नसतानासुध्दा शत्रूवर भौगोलिक परिस्थितीचा ङ्गायदा घेऊन, योग्य अंगाने हल्ले करून विजय मिळवला. देशाच्या इतिहासात राजपूत कालखंडापासून हिंदू सैन्य हारण्याची जी परंपरा सुरू झाली, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा खंडित केली. हे सुध्दा लक्षात घेण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. जन्म शिवनेरीचा. भोसले कुटुंब मुळचं मराठवाड्यातलं. असं असूनसुध्दा नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी कोकणात हलवली. याचं कारण भविष्यात मुघलांचं आक्रमण होणार हे गृहीत धरून मुघल सैन्य, त्यांचा तोङ्गखाना आणि घोडदळ कुचकामी ठरेल, असा प्रदेश त्यांनी राजधानीसाठी निवडला. त्याचबरोबर सागरी व्यापार आणि त्याचं महत्त्व ओळखून मराठ्यांच्या नौसेनेची मुहुर्तमेढही रोवली.
सुरतेहून मिळालेला पैसा हेच आरमार निर्माण करण्यात आणि समुद्रकिनार्‍यावर सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग यासारखे किल्ले बांधण्यात खर्च केला. यातून शिवरायांची सागरीदूरदृष्टी किती होती, याचा अंदाज येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची क्षमता चार हजार सैनिकांना वाहून नेण्याची होती. आज 21 व्या शतकात भारतीय आरमाराची क्षमताही तेवढीच आहे. यावरूनही त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी दूरदृष्टी आणि नियोजनाचा खरा ङ्गायदा त्यांच्या मृत्यूनंतर झाला. शिवाजी महाराजांच्या हयातीत औरंगजेब दक्षिणेकडे यायला धजावला नाही. याचं कारण शायिस्तेखानाची काय गत झाली होती, हे त्याला माहीत होतं. परंतु आपल्यानंतर मुघल आक्रमणाचा सामना करताना सैन्याला माघार घ्यावी लागू शकते, याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यांनी दक्षिणेकडे चेन्नईच्याही दक्षिणेला जिंजीच्या किल्ल्यामध्ये आपली दुसरी राजधानी निर्माण केली होती. तिथं पुरेसा खजिनाही साठवला होता. त्यामुळेच मुघल आक्रमणाच्या काळात छत्रपती राजाराम महाराज जिंजीला जाऊन मुघलांविरूध्द लढा सुरू ठेवू शकले.
इतकी दूरदृष्टी, त्याप्रमाणे नियोजन हे अर्वाचिन इतिहासातसुध्दा सापडत नाही. खरं तर एक योध्दा, मुत्सद्दी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरंच काही लिहिलं जातं. परंतु हिर्‍याचे जसे अनेक पैलू असतात, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी विशेष न चर्चिला गेलेला पैलू म्हणजे त्यांचं शारीरिक सामर्थ्य. इतिहासातल्या नोंदींनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची देहयष्टी ङ्गार उंच किंवा धिप्पाड असल्याचा उल्लेख नाही. उलट त्यांची शरीरयष्टी किरकोळ आणि उंची पाच ङ्गूट काही इंच असल्याचा दाखला आहे. परंतु बालवयात आणि तरूण वयात पध्दतशीरपणे व्यायाम करून छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तम शरीरयष्टी कमावल्याचा उल्लेख आढळतो.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचं शारीरिक सामर्थ्य आणि काटक प्रकृती याचा ङ्गार मोठा वाटा आहे. उदाहरण द्यायचं तर प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या युध्दाच्या प्रसंगी आपल्या शरीरयष्टीपेक्षा दुप्पट आकाराच्या अङ्गझलखानाशी शिवाजी महाराजांनी दोन हात केले होते. या व्यक्तिगत द्वंद्वात ते विजयी झाले. यावरून एक निष्कर्ष काढता येतो की, शारीरिक चपळता आणि शक्तीबाबतीत शिवाजी महाराज सहा ङ्गूट उंचीच्या अङ्गझलखानालाही पुरून उरले. हे साधेसुदे काम नव्हतं. या लढाईत शिवाजी महाराजांना बंधक बनवण्यात अङ्गझलखानाला यश मिळालं असतं तर आज महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास ङ्गार वेगळा झाला असता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे पुण्यातील लाल महालावर मूठभर सैनिकांसह त्यांनी केलेला हल्ला. आधुनिक भाषेत हा एक कमांडो हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक मानता येईल. या हल्ल्याकरता शिवाजी महाराज सिंहगडाहून पुण्यापर्यंत पायी आले असणार. कारण ते गुप्त वेेशात लग्नाच्या वरातीबरोबर आले होते. मध्यरात्री शाहिस्तेखानाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात स्वत: भाग घेऊन त्यानंतर रातोरात शिवाजी महाराज सिंहगडावर गेले होते. थोडक्यात, त्या दीड एक दिवसाच्या कालखंडात जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर पायी जाऊन आणि दोन तास लढून शिवाजी महाराज यशस्वीरित्या परत पोहोचले होते. याची आधुनिक कमांडो हल्ल्यांशी तुलना केली तर अशा हल्ल्यात कोठेही दहा ते 15 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापलं जात नाही, हे लक्षात घ्यायला हवं. तसंच परत ङ्गिरताना कमांडोजना अनेकदा हेलिकॉप्टरद्वारे उचललं जातं.
मी स्वत: एक कमांडो प्रशिक्षित सैनिक असल्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये शारीरिक क्षमतेची किती कसोटी लागते, याची पूर्ण कल्पना आहे. या कसोटीवर पारखून पाहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज आजच्या कमांडोंना सुध्दा सुपरमॅन वाटतात. त्यादृष्टीने शिवाजी महाराजांचं युध्दकौशल्य हासुध्दा एक अभ्यासाचा विषय राहिला आहे. आग्य्राला मुघलांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली. तेव्हाही ते साधूंच्या वेषात आधी पूर्वकडे काशीला गेल्याची आख्यायिका आहे. तिथून मग मजल दरमजल करत साधूंच्या तांड्याबरोबर ते महाराष्ट्रात पोहोचले होते. या संपूर्ण घटनेत छत्रपती शिवाजी महाराज हजार ते दीड हजार मैल चालले असावेत. भारताच्या इतिहासात काय किंवा जगाच्या इतिहासात सुध्दा इतके शारीरिक कष्ट घेऊन तगलेला राजा मिळणं विरळाच. या सर्व धकाधकीच्या आयुष्यात कोणाचीही प्रकृती वयाच्या 40-50 नंतर ढासळली तर नवल नाही. त्या काळच्या कर्तबगार पुरूषांमधील बहुतेकजण असेच अल्पायुषी ठरले.
अल्पायुषी जीवन जगूनसुध्दा या महापुरूषांनी केलेलं कार्य अलौकीक ठरलं. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं एकंदर आयुष्य आणि त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा पाहिल्यानंतर वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे नवलाची गोष्ट नाही. शरीरयष्टी कमावणं आणि कुस्ती, मल्लखांब तसंच व्यायामावर भर देणं हे एके काळी महाराष्ट्राचं वैशिष्ट्य होतं. समर्थ रामदास स्वामींनी ही गरज ओळखून गावोगावी मारूतीची मंदिरं आणि त्याला जोडून कुस्तीचे आखाडे, तालिमी तयार केल्या. या व्यायामशाळांमधून तयार झालेल्या मराठा सैनिकांनी अटकेपार झेंडे रोवले. परंतु दुर्दैवाने आज खेड्यापाड्यात व्यायामशाळा दिसणं दुरापास्त झालं आहे. खरं तर हीसुध्दा काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना गावोगावी व्यायामशाळा उभारून बलशाली सैनिक घडवण्याचा निर्धार करणं उचित ठरणार आहे.
                                                                                                                                  (नि.

No comments:

Post a Comment